---------
संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते.
रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे.
सौंदर्याचा साक्षात्कार व मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे.
त्यानिमित्ताने केशवसुतांची 'रांगोळी घालताना पाहून' नावाची एक सुंदर कविता आठवली.
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!
सण, उत्सव, मंगल समारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कार विधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे.
प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे. देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशी यांच्याजवळ रांगोळी काढली जाते. एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पाटा खालीही रांगोळी काढतात. दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात.
रांगोळीसाठी रंगीत तांदूळ, कोरडे पीठ, रंगीत वाळू, फुलांच्या पाकळ्या, हळद, कुंकू, गुलाल,रंग यांचाही वापर केला जातो.
तर या वर्षीसाठीची आपली रांगोळी स्पर्धा आहे - गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवसापासून संपूर्ण उत्सवात तुम्ही स्वत: किंवा घरातल्या इतर सदस्यांनी गणेशोत्सवासाठी काढलेली रांगोळी.
स्पर्धेसाठी नियम-
१. रांगोळीमध्ये फुला पानांचा समावेश असणे आवश्यक आहे. बाकीचे साहित्य तुम्ही आपापल्या सोयीनुसार वापरू शकता.
२. ही रांगोळी स्पर्धा आहे. या स्पर्धेचे परीक्षण संयोजक मंडळ करणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
- गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवसापासून संपूर्ण उत्सवात तुम्ही स्वत: किंवा घरातल्या इतर सदस्यांनी गणेशोत्सवासाठी काढलेल्या रांगोळीचे प्रकाशचित्र इथे द्यायचे आहे.
(No subject)
फोटो दिसत नाहीये..
फोटो दिसत नाहीये..
(No subject)
काहीतरी चुकतय
काहीतरी चुकतय
गणपती बाप्पांस्वागतासाठी पानाफुलांनी पण सजला रांगोळीत
(No subject)
गणपती स्वागता हा गणपती
छान आहे
छान आहे
vijaya kelkar - छान रांगोळी
vijaya kelkar - छान रांगोळी आहे.
ही स्पर्धा फक्त आजसाठी आहे का
ही स्पर्धा फक्त आजसाठी आहे का? आजचे सांस्कृतीक कार्यक्रम मध्ये आहे, म्हणून विचारतोय..!
फक्त आजसाठी नाही. पुढील ९
कृपया अपडेट पहावे ही विनंती.
फक्त आजसाठी नाही. पुढील ९
आपल्या शंकांचे समाधान कारक उत्तर दिले जाईल.
विजयाताई छान आहे रांगोळी.
विजयाताई छान आहे रांगोळी.
याची मुदत वाढवा.
याची मुदत वाढवा.
गणपती स्वागतासाठी काढलेलि रांगोळी. ऊशीरा टाकतोय. माफी असावी.
छान आहे
छान आहे