विलक्षणाचा आनंद: दिल ढूँढता है फिर वही.....
मौसम आणि Judas Tree
विलक्षण काही तरी गवसल्याचा आनंद काही औरच. तो आपला आपल्यालाच गवसतो, बाकीच्यांना तो कळेलच अस नाही. आज असच काहीतरी झालं. मौसम चित्रपटातल, दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन.... हे गाणं ऐकलं आणि दुसरं काही सुचेनासं झालं. घरी जाऊन मग ते अनेक वेळा ऐकलं तरी काही समाधान होत न्हवत. आपल्या प्रियकराबरोबर / प्रेयसीबरोबर निरनिराळ्या ऋतूत वेळ कसा व्यतीत करावा याच फार रोमँटिक वर्णन केलंय. अर्थात शब्द आहेत साक्षात गुलजार साहेबांचे. त्यामुळे त्यातले बारकावे, भावना व शब्दांची निवड यात कसली कसरच उरली नाही आणि स्वर्गीय आवाज लाभलाय लताबाई आणि भूपिंदरजींचा. सगळंच सोन्याहून पिवळं.
आता जरा मौसम चित्रपटाविषयी, हा १९७५ चा गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, The Judas Tree या A.J. Cronin याच्या कादंबरीवर काहीसा आधारित. एक उमदा तरुण, महत्वाकांक्षी डॉक्टर, एका दौऱ्यावर गेल्यावर तिथल्या एका पहाडी मुलीच्या प्रेमात पडणं, प्रेमाच्या आणाभाका, तिला तिथंच सोडून परतणं, कालांतराने पुन्हा तिच्याच मुलीशी एका विदारक वास्तवात भेट, अपराधीपणाची भावना..... शर्मिला टॅगोर व संजीव कुमार यांचा अप्रतिम अभिनय.
जेंव्हा Judas Tree वर शोधल तेव्हा अस सापडलं की Judas हा येशूचा अनुयायी, परंतु त्याने येशूचा विश्वासघात केला (Kiss of Judas), आणि अपराधी भावनेमुळे त्याने एका झाडाला फास घेऊन आत्महत्या केली. येशूचा विश्वासघात करणाऱ्याने आपल्याच झाडावर आत्महत्या केली हे पाहून मूळची पांढरी फुले शरमेने लाल झाली आणि तेच झाड Judas Tree म्हणून ओळखलं जाऊ लागल. अश्याप्रकारे मैत्री-प्रेम-विश्वासघात यातून निर्माण झाली A.J. Cronin ची The Judas Tree हि कादंबरी आणि त्यावर निघाला मौसम - मानवी मनाचे विविध कंगोरे उलगडून दाखवणारा चित्रपट.
Judas Tree- Cercis siliquastrum
दक्षिण युरोप व पश्चिम आशियात आढळणारा एक, पानझडी, गुलाबी फुलांचा वृक्ष. याच्या लांबट खोडाला लगडलेल्या शेंगा जुडास च्या आत्महत्येची आठवण करून देणाऱ्या. ह्याच परागीभवन कीटकांपासून होत.
दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वुर-ए-जानाँ किये हुए
ह्यातलं तसव्वुर-ए-जानाँ म्हणजे प्रियेच्या आठवणीत गुंगून जाणे, माशूक़ के ख़यालों में खो जाना.
ह्यात प्रत्येक कडव्यात ऋतूंच वर्णन इतकं सुंदर केलंय की त्यावर काय बोलावं.
दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वुर-ए-जानाँ किये हुए
दिल ढूँढता है...
जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर
आँखों पे खींचकर तेरे आँचल (दामन) के साये को
औंधे पड़े रहें कभी करवट लिये हुए
दिल ढूँढता है...
या गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें
ठंडी सफ़ेद चादरों पे जागें देर तक
तारों को देखते रहें छत पर पड़े हुए
दिल ढूँढता है...
बर्फ़ीली सर्दियों में किसी भी पहाड़ पर
वादी में गूँजती हुई खामोशियाँ सुनें
आँखों में भीगे-भीगे लम्हें लिये हुए
दिल ढूँढता है...
नक्की ऐका
https://www.youtube.com/watch?v=2RL0XVbs3Us
संदर्भ व फोटो साभार : विकिपीडिया आणि आंतरजाल
अरे वाह! मस्तच!
अरे वाह! मस्तच!
या झाडाची कहानी माहीत नव्हती.
आपल्याकडीलही झाडांच्या अशा कहाण्या असतील ना? रंगावरुन किंवा आकारावरुन? त्यावरही लिहिना.
धन्यवाद शालीदा. नक्कीच
धन्यवाद शालीदा. नक्कीच लिहिण्याचा प्रयत्न करीन
खरं तर ते गाणं ऐकून दुसरं काही सुचेना, मग शोधता शोधता हे सगळं सापडलं. तेच इथे लिहिलं बस्स.
छानच! हे गाणं खूप आवडतं.
छानच! हे गाणं खूप आवडतं. झाडाची कहाणीही सुरस आहे.
१०-१२ वर्षांपूर्वी पुण्यात आर. डी. बर्मन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक कार्यक्रम होता. स्वतः गुलजार आणि भूपिंदर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 'दिल ढूंढता है' या गाण्याची फास्ट ( द्वंद्वगीत) आणि स्लो (सोलो) अशी दोन व्हर्जन्स आहेत. मला तोपर्यंत फास्ट गाणंच आवडायचं. पण तेव्हा भूपिंदर यांचं लाईव्ह सोलो गाणं ऐकलं आणि तेही प्रचंड आवडायला लागलं. नंतर सूत्रसंचालकाच्या विनंतीवरून त्यांनी द्वंद्वगीतही गायलं सुवर्णा माटेगावकरांबरोबर
छानच! हे गाणं खूप आवडतं.
छानच! हे गाणं खूप आवडतं. झाडाची कहाणीही सुरस आहे.
१०-१२ वर्षांपूर्वी पुण्यात आर. डी. बर्मन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक कार्यक्रम होता. स्वतः गुलजार आणि भूपिंदर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 'दिल ढूंढता है' या गाण्याची फास्ट ( द्वंद्वगीत) आणि स्लो (सोलो) अशी दोन व्हर्जन्स आहेत. मला तोपर्यंत फास्ट गाणंच आवडायचं. पण तेव्हा भूपिंदर यांचं लाईव्ह सोलो गाणं ऐकलं आणि तेही प्रचंड आवडायला लागलं. नंतर सूत्रसंचालकाच्या विनंतीवरून त्यांनी द्वंद्वगीतही गायलं सुवर्णा माटेगावकरांबरोबर Happy>>>> प्लिज लिन्क मिळेल का?
छान ! झाडाची कहाणी आवडली.
छान !
झाडाची कहाणी आवडली.
बापरे, लिंक मिळणं अवघड आहे हो
बापरे, लिंक मिळणं अवघड आहे हो. कार्यक्रमाचं नावही लक्षात नाही आता. पण पंचमदांना श्रद्धांंजली होती हे नक्की. बहुतेक यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाला असावा कार्यक्रम. सूत्रसंचालकांचं आडनाव पंचवाडकर होतं. अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन केलं होतं. भूपिंदरजी पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी मोजकी २-३ च गाणी गायली होती.
अरे वा, सुंदरच लिहिलंय...
अरे वा, सुंदरच लिहिलंय...
मौसम तर आवडता सिनेमा आहेच...
छान लिहिलय.
छान लिहिलय.
झाडाची काहानी देखिल मस्त.
मौसम पाहीला नाही.... बघेन.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=B_NC5apKsCo
ओह !छान आहे कहाणी ..
ओह !छान आहे कहाणी ..
भुपिंदरचं सोलो वर्जन बेस्ट
भुपिंदरचं सोलो वर्जन बेस्ट आहे. हे गाणं ऐकताना शेवटंच्या कडव्यात 'आँखों में भीगे-भीगे लम्हें लिये हुए' हे ऐकताना का कोण जाणे पण डोळे टच्कन ओले होतात. गुलजारचे शब्द, मदनजींची चाल आणि भुपिंदरचा आवाज.. सगळंच जब्बरदस्त!
सगळ्यांचे धन्यवाद!!
सगळ्यांचे धन्यवाद!!
१०-१२ वर्षांपूर्वी पुण्यात आर. डी. बर्मन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक कार्यक्रम होता. स्वतः गुलजार आणि भूपिंदर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 'दिल ढूंढता है' या गाण्याची फास्ट ( द्वंद्वगीत) आणि स्लो (सोलो) अशी दोन व्हर्जन्स आहेत. मला तोपर्यंत फास्ट गाणंच आवडायचं. पण तेव्हा भूपिंदर यांचं लाईव्ह सोलो गाणं ऐकलं आणि तेही प्रचंड आवडायला लागलं. नंतर सूत्रसंचालकाच्या विनंतीवरून त्यांनी द्वंद्वगीतही गायलं सुवर्णा माटेगावकरांबरोबर >>>>>> भाग्यवान आहात वावे
@ अज्ञानि , लिंक बद्दल धन्यवाद
अज्ञानी, येस, हाच असणार तो
अज्ञानी, येस, हाच असणार तो कार्यक्रम. तुमच्या लिंकमुळे नाव तरी आठवलं.. कतरा कतरा
भुपिंदरचं सोलो वर्जन बेस्ट
भुपिंदरचं सोलो वर्जन बेस्ट आहे.+१
ॠतुराज, खूप छान लिहिलंय
ॠतुराज, खूप छान लिहिलंय तुम्ही..
आणि रोचक माहितीही छान जी आधी कधी ऐकली/वाचली नव्हती...
तुमच्या पुढील लिखाणास शुभेच्छा...
प्रतिसादकांचे प्रतिसादही सुंदर..
छान लेख आणि छान गाण्याची आठवण
छान लेख आणि छान गाण्याची आठवण!
भूपिंदर चे आणखी एक असेच गाणे जे सोलो आणि डुएट आहे आणि सोलो खास आहे. "एक अकेला इस शहर मे"
https://www.youtube.com/watch?v=EpbjO-Qdfuc
vt220, लिंक बद्दल धन्यवाद.
vt220, लिंक बद्दल धन्यवाद. "एक अकेला इस शहर मे" हे गाणं हि मस्तच.
@ चिवट, "मदनजींची चाल" >>>>> हो त्यांचंही श्रेय आहेच. लेखात लिहिलं नाही. क्षमस्व. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
झाडाची कहाणीमस्त आहे.झाडाची
झाडाची कहाणी मस्त आहे.झाडाची कहाणी आणि गाणं,एकत्र मस्त गुंफलंय!
झाडाची कहाणी मस्त आहे. झाडाची
झाडाची कहाणी मस्त आहे. झाडाची कहाणी आणि गाणं,एकत्र मस्त गुंफलंय! >> +१
झाड मस्तय. झाडाची गोष्टदेखील
झाड मस्तय. झाडाची गोष्टदेखील छानेय.
दोन्ही गाणी चांगली आहेत.
पुस्तकाची, सिनेमाची कथा काही खास नाही.
लेख प्रतिसाद आवडले.
या गाण्याची अजून दोन कडवी
या गाण्याची अजून दोन कडवी आहेत.
Galiyon mein baarishon mein, bach kar chalo jo tum
Hans dein hum, dhaani chunri pe chheente uchhaal kar
Dekha karein, aankhein teri shikwe liye hue
Phir gungune patjhadon mein, shaakhein chuna karein
Yaaron ke beech baith ke; yaadein buna karein
Chuskiyon mein chaai ki, ghul kar hanste hue
Dil dhoondhta hai, phir wahi, fursat ke raat din.........
मस्तच. झाड आहाहा अगदी.
मस्तच. झाड आहाहा अगदी.
झाडाची गोष्ट माहिती नव्हती, कारुण्यमय आहे. मौसम शाळेत असताना tv वर बघितलेला. जसाच्या तसा आठवतो जवळजवळ. त्यातली सगळी गाणी आवडतात.
या गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें
ठंडी सफ़ेद चादरों पे जागें देर तक
तारों को देखते रहें छत पर पड़े हुए
दिल ढूँढता है...
हे कडवे जास्त आवडतं ह्या गाण्यातले आणि पुरवाईया हा शब्द फार आवडतो लहानपणापासून, तेव्हा काही एवढं समजत नव्हतं हिंदी.
या गाण्याची अजून दोन कडवी
या गाण्याची अजून दोन कडवी आहेत.
Galiyon mein baarishon mein, bach kar chalo jo tum
Hans dein hum, dhaani chunri pe chheente uchhaal kar
Dekha karein, aankhein teri shikwe liye hue...
Phir gungune patjhadon mein, shaakhein chuna karein
Yaaron ke beech baith ke; yaadein buna karein
Chuskiyon mein chaai ki, ghul kar hanste hue
Dil dhoondhta hai, phir wahi, fursat ke raat din.........>>>>अहाहा.... खुप खुप खुप धन्यवाद त्रिशंकू जी...
सगळ्यांचे धन्यवाद!!
सगळ्यांचे धन्यवाद!!
खूप नवी माहिती मिळतेय
त्रिशंकू जी खूप खूप धन्यवाद. अप्रतिम शब्द आणि कल्पना ....
वाह अप्रतिम!!! ललित आवडले.
वाह अप्रतिम!!! ललित आवडले.
सुरेख लिहिलं आहे. ह्या मागची
सुरेख लिहिलं आहे. ह्या मागची आख्यायिका आणि गाण्यामागची गोष्ट माहिती नव्हती.
मी दिलेला फोटो बहुतेक 'जुडास ट्री'चाच आहे.
खुप सुंदर लिहिलेय….
खुप सुंदर लिहिलेय….
चित्रपट पाहिलाय, हे गाणे तर खुपच आवडते आहे. कॉफी मग हातात घेऊन शांतपणे गाणे ऐकत डोळ्यासमोरुन एकेक ऋतु बदलताना पाहात बसायचे..
ya song ch Abhijeet ne
ya song ch Abhijeet ne gaylele version suddha chan aahe . Rhythm thoa fast kela aahe
https://www.youtube.com/watch?v=nQU2E4BDkMI
सुंदर! हे माहीत नव्हतं.
सुंदर! हे माहीत नव्हतं. ऋतुंच्या गाण्याची माहिती द्यायला स्वतः ऋतुराज यावा हे माबोचं भाग्यच.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
खरं तर हा लेख लिहिला तोपर्यंत कधी Judas Tree पाहिला नव्हता. परंतु गेल्यावर्षी Judas Tree भरभरून फुललेला पाहिला आणि मौसम आठवला
हर्पा _/\_