बहुसंख्य भारतीय लग्न करतात आणि वैवाहिक जीवन जगतात. आता लग्न म्हणजे तडजोड आलीच. प्रेम, संवाद, वाद, कलह हेही या जीवनाचे पैलू. जे लोक विवाह दीर्घकाळ यशस्वी करतात त्यांच्या बाबतीत एक बाब जाणवेल. ती म्हणजे - जोडीदाराच्या नसलेल्या पण स्वतःच्या असलेल्या एखाद्या आत्यंतिक आवडीला मुरड घालणे. हे पती-पत्नीत दोघांकडून होत असते. यात खाणे- 'पिणे', छंद, अस्तिकता- नास्तिकता, खर्च / काटकसर ….असे अनेक मुद्दे असू शकतात. पण आपले वैवाहिक जीवन यशस्वी करायचे या उद्देशाने असे लोक यांसारख्या छोट्यामोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कधीमधी जोडीदाराला न आवडणारी आपली एखादी आवड चोरून देखील पुरी करतात !
आपल्यापैकी बरेच जण विवाहित असतील. आपलीही अशा प्रकारे काही बाबतीत कुचंबणा होत असेल. आता एका अटळ सत्याला आपणा सर्वांनाच कधीतरी सामोरे जायचे आहे आणि ते म्हणजे मृत्यू. आता आपल्या बाबतीत दोन शक्यता संभवतात :
१. स्वतःचा मृत्यू प्रथम होणे, किंवा
२. आपल्या जोडीदाराचा मृत्यू आधी होणे .
आता वरील मुद्दा आपल्या संदर्भात पाहू. आपली एखादी अत्यंत आवडीची गोष्ट आपल्याला जोडीदाराच्या नावडीमुळे मुक्तपणे करता येत नसेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे कधीतरी आपल्या मनात असा विचार येऊ शकतो, " जर का आपला जोडीदार आपल्याआधी 'गेला', तर त्याच्यामागे आपण ती गोष्ट अगदी मुक्तपणे करू शकू !"
( मात्र जर का आपणच आधी मरण पावलो, तर हा प्रश्नच उद्भवत नाही.)
मला खात्री आहे की प्रत्येक विवाहिताच्या मनात अशी एखादी तरी इच्छा नक्की असते. फक्त आपण ती बोलून दाखवत नाही.
एव्हाना या धाग्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला असावा. समजा, वर उल्लेखिलेल्या दोन शक्यतांपैकी दुसरी आपल्या बाबतीत खरी झाली, तर पुढे आपण अशा कुठल्या आवडी/इच्छा मनसोक्त पूर्ण करू, हे इथे लिहावे. केवळ स्वप्नरंजन म्हणून लिहा; कुठलाही अपराधी भाव मनात न आणता. भविष्यात पुढे काय होईल हा भाग वेगळा, पण आता तर थोडी गंमत म्हणून लिहा.
जे लोक इथे टोपण नावाने आहेत आणि ज्यांचा जोडीदार इथे फिरकतही नाही, त्यांनी तर बिनधास्त लिहावे !
जर तुमच्या सर्व इच्छा अगदी मनसोक्त पुऱ्या झाल्या असतील तर तसेही लिहा !
इच्छा आहेत पण दुसऱ्या
प्रकाटाआ.
( मात्र जर का आपणच आधी मरण
( मात्र जर का आपणच आधी मरण पावलो, तर हा प्रश्नच उद्भवत नाही.)>>>> आपल्यासाठी
प्रकाश घाटपांडे >> +१
प्रकाश घाटपांडे >> +१

मानवी भावनांचा जटिल पना असा
मानवी भावनांचा जटिल पना असा वरवर विचार करून समजून घेता येत नाही
मनात असा विचार, नाही येत साद
मनात असा विचार, नाही येत साद. माझं म्हणायचं तर, नवरा मला अक्षरक्षः 'कमी खाणे व व्यायाम' याकरता जाच करतो. त्याचा उद्देश अगदी चांगला असतो पण मला जाच होतो ना

असे वाटते. (डोळ्यात पाणी तरळते आहे!)
पण जर यदाकदाचित (गॉड फॉर्बिड) .... तर मी मुद्दाम व्यायाम व कमी खाणे हे पथ्य पाळेन. त्याची लेगसी म्हणुन
आता पन्नाशी जवळ आली तसं फार भयाण वाटतं - कमी वर्षं राहीली. आधी इतका संघर्ष करण्याऐवजी, मिळवुन जुळवुन घेतलं असतं तर
आता पन्नाशी जवळ आली तसं फार
आता पन्नाशी जवळ आली तसं फार भयाण वाटतं - कमी वर्षं राहीली>>>>> नाही ग अजिबात नाही.नव्याने जन्म घेतलाय असे मान.
कमी वर्षं राहीली.>>>> जी काही
कमी वर्षं राहीली.>>>> जी काही राहिली असतील ती आनन्दाने घालवायचा प्रयत्न करावा. माबो हे एक आउट्लेट आहेच कि.
@देवकी आणि प्रघा -
@देवकी आणि प्रघा - दोघांनाही खूप धन्यवाद!!! कोणी सांगावं (ईश्वराच्या मनात असेल तर) दोघंही सुस्थितीमध्ये शंभरी पाहू
हाहाहा ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह 
पण हे मन मारणे प्रकार
पण हे मन मारणे प्रकार जोडीदारासाठीच होतो असे नव्हे,
घरातील मोठे, विशेषतः पुरुषांसाठी आई वडील (जर बरोबर राहात असतील तर) बाई साठी आई वडील सासू सासरे या सगळ्यांसाठी आपल्या काही गोष्टी मागे ढकलायला लागतात
त्या सगळ्याच इकडे लिहु दे की!!!
>>> सुस्थितीमध्ये शंभरी पाहू
>>> सुस्थितीमध्ये शंभरी पाहू >>>
जरूर गाठा ! त्यासाठी शंभर शुभेच्छा !!
>>जोडीदाराच्या नसलेल्या पण
>>जोडीदाराच्या नसलेल्या पण स्वतःच्या असलेल्या एखाद्या आत्यंतिक आवडीला मुरड घालणे. हे पती-पत्नीत दोघांकडून होत असते.<<
कबुल, पण कालांतराने त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि एखादी आत्यंतिक आवड खरोखरंच असेल तर जोडिदाराला पटवा, नाहिच जमलं तर जोडिदार बदला; त्याची/तिची मरणाची वाट का बघताय?..
राजसाहेब,
राजसाहेब,
अहो, जोडीदार बदलणे लई महागात जातं ओ, नाय परवडत !
जोडीदाराशी जी भावनिक गुंतवणूक
जोडीदाराशी जी भावनिक गुंतवणूक होते त्यातून जोडीदार गेल्यानंतर कितीही स्वातंत्र्य मिळाले आणि अतृप्त इच्छा पूर्ण करायचे ठरवलं तरी प्रतारणा केली अशी भावना छळणारच असे वाटते.
असतानाच give and take करा.
असतानाच give and take करा. तोही आपल्यामुळे काही इच्छा मारत असेल, त्याला त्या पूर्ण करू द्या. स्वतःच्या इच्छाही पूर्ण करा.
या दुनियेत अनंत मित्या आहेत.
या दुनियेत अनंत मित्या आहेत. मी नुकताच एक पॉडकास्ट ऐकला त्यात हे गणिती सिद्धांताच्या आधारे सिद्ध केलं होतं. आपल्याला 3 मित्या माहीत आहेत. आपण तिसऱ्या मितीत राहतो. जे जीव जंतू पहिल्या मितीत राहतात त्यांना दुसऱ्या मितीबद्दल माहिती नसते, दुसऱ्या मितीत राहतात त्यांना तिसऱ्या मितीबद्दल माहिती नसते, आपल्याला चौथ्या मितीबद्ल माहिती नाही. जर वरच्या मितीतून एखादी वस्तू खालच्या मितीत आली तर ती त्या मितीत प्रकट झाल्यासारखी वाटते. माणूस मरतो तेव्हा तो ज्या मितीत मारतो त्याच्या पुढच्या मितीत जातो अशी एक संकल्पना आहे. आपल्या पुराणातसुद्धा लिहिलंय की मागचा जन्म किडा मुंगीचा असतो त्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो, म्हणजेच दुसऱ्या मितीतून आपण तिसऱ्या मितीत येतो. त्यामुळे मरण हे पूर्णविराम नसून अर्धविराम आहे असं मला वाटतंय.
हे म्हणजे मेल्याशिवाय स्वर्ग
हे म्हणजे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसं मिती बदलत नाही असं आहे.
>>> त्यामुळे मरण हे
>>> त्यामुळे मरण हे पूर्णविराम नसून अर्धविराम आहे असं मला वाटतंय.>>> सुंदर!!! नेहमी च्या चेष्टेखोर सदस्याकडून (जो की उत्तम गुण आहे.) असे काही सखोल ऐकायला मिळाले की सुखद धक्का बसतो.
मला हा विनोद आठवला.
मला हा विनोद आठवला.
एक भारतीय अमेरिकेत फिरायला गेलेला असतो. कबरस्तानापासून चालला असताना एक स्री कबरीला पंख्यानं वारा घालत असते. भारतीय एकदम भारावून जात तिकडे जाऊन तिला विचारतो. कोणाची कबर आहे? ती म्हणते माझ्या मृत नवऱ्याची.
भारतीय माणूस रडायच्या बेतात येतो. तो विचारतो, तुम्ही इतकं प्रेम करत होतात एकमेकांवर?
ती म्हणते, तूझा गैरसमज झाला आहे. माझा नवरा म्हणाला होता की त्याची कबर सुकेपर्यंत मी दुसरं लग्न करू नये. म्हणून मी कबर लवकर सुकावी म्हणून वारा घालत आहे.
भारतीय खरंच रडायला लागला.
( अवांतराबद्दल क्षमस्व!)
हाहाहा
हाहाहा
सोमा,
सोमा,
विनोद छान !
अवांतर नाही, योग्यच !
धन्यवाद.
धन्यवाद.
>>अहो, जोडीदार बदलणे लई
>>अहो, जोडीदार बदलणे लई महागात जातं ओ, नाय परवडत !<<
रिमेंबर, यु हॅव ओन्ली वन लाइफ टु लिव...
मीम्हंतो जोडीदार करायचाच नै.
मीम्हंतो जोडीदार करायचाच नै. कामापुरता भाड्याने घ्यायचा. कसं राहील मंग?
"कधीतरी आपल्या मनात असा विचार
"कधीतरी आपल्या मनात असा विचार येऊ शकतो, " जर का आपला जोडीदार आपल्याआधी 'गेला', तर त्याच्यामागे आपण ती गोष्ट अगदी मुक्तपणे करू शकू !".... तर पुढे आपण अशा कुठल्या आवडी/इच्छा मनसोक्त पूर्ण करू, हे इथे लिहावे. केवळ स्वप्नरंजन म्हणून....."
=> इतके थिल्लर आणि अपरिपक्व विचार? जोडीदार काही काळासाठी जाणे आणि त्यामुळे मिळणारी क्षणिक रिलीफ हा एकवेळ विनोदाचा विषय होऊ शकतो हे अनेकदा वाचले आहे. जसे कि बायको माहेरी गेल्यानंतर, किंवा नवरा परदेशी गेल्यानंतर वगैरे येणारे विनोद. परंतु जोडीदाराच्या मृत्यूनंतर कशी "मजा" करणार? आणि त्याचे स्वप्नरंजन? एकतर (मानसिक) वयाने फार कमी वाटता किंवा तसे नसेल तर वैवाहिक जोडीदार हि कल्पना तुम्हाला समजलेली नाही. लग्न झाले नसेल तर करू नका. आणि झाले असेल तर घटस्फोट घेऊन जोडीदाराला मोकळे करा म्हणजे हवे तितके मजा करायला तुम्ही रिकामे.
हाच विचार मी अमर असताना
हाच विचार मी अमर असताना पहिल्या प्रतिसादात लिहिला होता. पण आवडणार नाही म्हणून खोडला होता.
कैच्या काही लेख. अशी कुठली
कैच्या काही लेख. अशी कुठली आवड/इच्छा आहे की जी मनसोक्त पूर्ण करण्यासाठी जोडीदाराच्या मरणाची वाट बघावी लागेल? बराच वेळ डोकं खाजवून पण मला काही सुचत नाहीये. बहुधा माझी आकलनक्षमता कमी आहे.
राज, भरत, इनामदार +१.
राज, भरत, इनामदार +१.
घटस्फोट घ्या की इतकं मन मारुन जगायला लागतंय तर! कठिणच आहे!
घटस्फोट सगळ्या प्रश्नाचे
घटस्फोट सगळ्या प्रश्नाचे उत्तर कसे असेल? अनेकदा आर्थिक परिस्थिती, मुलांच्या जबाबदार्या, आजारपण, व्यवसाय नोकरी च्या निमित्ताने बांधले जाणे अशी जोडीदारा सबंधित कौटुंबिक कारणे असू शकतात. म्हणजे जोडीदाराने आडकाठी केली असे नाही जोडीदार सोबत असताना टाळता न येण्यासारखी जी व्यवधाने पाठी लागतात ती जोडीदार सोडून गेल्यानंतर न उरल्याने छंद, स्वप्ने जोपासण्यासाठी संधी उपलब्ध झाली असे होऊ शकते.
हे असे काहीतरी करायचे असू शकते. ईच्छा असल्यास शक्य आहे.
जोडीदाराचे आजारपण/ व्यवसाय
जोडीदाराचे आजारपण/ व्यवसाय नोकरीमुळे एकवेळ समजू शकतो.
बाकी मुलं आणि इतर जबाबदार्या जोडीदार्याच्या मृत्युने टिपिकल केस मध्ये फार बदलणार नाहीतच. सांगायचा उद्देश इतकाच की जे काय करायचं ते आत्ता करा. मनात मांडे खाऊन इच्छापूर्तीची आस धरलीत तर अपयश येण्याची शक्यता जास्त.
जी लोकं एक नॉर्म म्हणून लग्न
जी लोकं एक नॉर्म म्हणून लग्न-मुलं करतात (किंवा त्यांचं लग्न लावून दिलं जातं) त्यांना लेखातल्यासारखं वाटू शकतं. 'नवरा मेल्यावर निम्नवर्गातल्या स्त्रीला आनंद होतो' अशा अर्थाच कोणीतरी लिहलं होत की पूर्वी. त्यात न पटण्यासारखं किंवा थिल्लर वाटण्यासारखं काही नव्हतं, या लेखातदेखील नाहीय.
केवळ सामाजिक दबावामुळे किंवा आर्थिक स्वातंत्र्य नसल्यामुळे किती संसार रेटले जातात कुणाला म्हायती! भारताततरी भरपूर असावेत.
Pages