सेक्रेड गेम्स-२. वेळेचा अपव्यय !

Submitted by आकाशानंद on 16 August, 2019 - 11:39

सेक्रेड गेम्स-२. वेळेचा अपव्यय !
पहिला सिझन बघून अपेक्षा खूप उंचावल्या मुळे बहुप्रतीक्षित दुसरा सिझन सेक्रेड गेम्स-२ काल नेटफ्लिक्स वर प्रदाशित झाला.
पहिले तीन भाग आवडले, पण पुढच्या तीन भागांनी पूर्ण निराशा केली!
भरपूर कलाकारांचा भरणा करून कुठल्याच व्यक्तिरेखेला न्याय न देता आल्याने वेळेचा अपव्यय झाल्यासारखे वाटले.
रणवीर शौरी सारख्या कलाकाराला तर अगदी थोडासा रोल देऊन वाया घालवला आहे.
मायबोली करांनी हा दुसरा सिझन बघितला असल्यास त्यांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

<<< पहिले तीन भाग आवडले, पण पुढच्या तीन भागांनी पूर्ण निराशा केली! >>>
धन्य आहात. मी तर पहिल्या तीन भागातच कंटाळलो, पुढे गेलोच नाही. Lol

टोटल बकवास सिझन...

काही सिन तर मुद्दाम घुसवल्यासारखे आहेत आणि हा पूर्ण सिझन
हिंदु विरोधीच आहे असं वाटलं..

जनसमुदायात हिंदु धर्माविषयी कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय..

आणि आपलेच लोक हे सगळं कौतुकाने पाहतात ह्याच आश्चर्य वाटत मला..

एखादीच अशी कथा असू शकते हे जरी गृहीत धरलं तरी लैला ह्या वेबसिरीज मध्येसुद्धा असाच प्रयत्न केलेला दिसतो..

अजुन बरचं काही लिहायचं होत पण इथे लिहणं योग्य नाही...