दुपारी चार वाजेच्या सुमारास लक्ष्मी ताई ची गाडी जंगम वकिलाच्या घरासमोर उभी राहिली. गाडीतून उतरतांनाचं ताईला त्या जागेचा संशय यायला लागला. तिथं काहितरी चुकीचं असल्याची त्यांना जाणीव झाली. शोध घायला आता वेळ नव्हता. ऍड जंगम त्यांच्याकडेचं बघत उभा होता. तो नुकताच कामावरून परत आल्याचे दिसत होते. कुठलीही औपचारिकता न पाळता लक्ष्मीताई आणि राजेश जंगम वकिलाच्या कार्यालयात दाखल झाले. राजेश आणि त्याच्यासोबत आलेल्या बाईला बघून ऍड. जंगमच्या चेहऱ्यावर नापसंतीची आठी आली. त्याची पर्वा न करता ताई थेट विझीटिंग चेअरवर जाऊन बसल्या.
जंगम काही बोलणार किंव्हा राजेश त्यांची ओळख करुन देण्यासाठी तोंड उघडणार; त्याआधीच लक्ष्मीताईंनी जंगमच्या वर्मावर थेट प्रश्नाचा घाव घातला!
“जंगम, तुम्ही तर शिकले-सवरलेले! तुम्ही कसे काय पटवर्धनांच्या नांदी लागलात.. तुम्ही लागला ते लागलात. पण, या राजेशला त्यात का अडकवलंत?”
लक्ष्मीताईच्या प्रश्नाने जंगमच्या चेहऱ्यावर क्रूर भाव उमटले.. दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरत त्याने गोंधळुन जाण्याचा आव आणला. नाराजीनेच तो ताईंच्या समोरील त्याच्या खुर्चीवर येऊन बसला. काहीच न कळल्यासारखे करत त्याने उत्तर दिले.
“आपण काय म्हणताय, ते मला काही कळत नाही..! आणि, तुम्ही कोण? तुमचा काय संबंध..? (राजेश कडे पाहत) माणुसकीच्या नात्याने मी तुला काही काही गोष्टी सांगितल्या, मदत केली. ही कोण बाई..? तू हिला काय सांगितलेस? आणि ही माझ्यावर असले भलते आरोप का करतेय..?”
स्पष्टीकरण देण्यासाठी राजेश तोंड उघडणार होता.पण, ताईंनी पुन्हा त्याला थांबण्याची खूण करत स्वतः बोलायला सुरुवात केली.
“जंगम, तुझ अडाणीपणाचं सोंग माझ्यासमोर चालायचं नाही.. तू लोकांना फसवू शकतोस, पण मला नाही. तू पटवर्धनाचा साथीदार होतास.. त्याच्या सगळ्या काळ्या उद्योगात तुझा सहभाग राहिला आहे. वाड्यात तुम्ही केलेल्या कुकर्माचे काही पुरावे माझ्या हाती लागले आहेत..!आता तो पटवर्धन आणि त्याची ती अघोरी शक्ती तुला खडी फोडायला जाण्यापासून वाचवू शकनार नाही..!”
ऍड जंगम आता पूर्णपणे विचलित झाल्याचे दिसत होते..तरीही त्याने बोलण्याचा आवेश ओसरू दिला नाही.
“ मी कोणतेही गैरकृत्य केलेलं नाही. आणि, तुम्ही कोण? तुम्हला माझ्यावर असले आरोप करण्याचा काय अधिकार? लक्षात ठेवा, मी वकील आहे दोन मिनिटात मी याठिकाणी पोलिसांना बोलावू शकतो.."
पोलिसांचे नाव ऐकताच ताईंच्या चेहऱ्यावर स्मितहाष्य आले..!
“पोलीस काय?..बोलावं पोलिसांना. त्यांनाही मुलींचे अपहरण करणारा गुन्हेगार अजून मिळलेला नाही..! इथं येऊन त्यांचा तरी शोध पूर्ण होईल..!”
‘‘तुम्हाला नाही वाटत तुमचा आता अतिरेक होतो आहे?’’
‘‘नाही.’’
ताईंचा आवाज उग्र झाला, ‘‘जंगम, हा उंदरा-मांजराचा खेळ पुरा झाला..! पटवर्धन प्रकरणात तू पूर्णपणे अडकला आहेस, याची आता मला पक्की खात्री झाली आहे.. तेंव्हा लपवा छपवी करण्यात काही अर्थ नाही.”
काहीच न सुचल्याने जंगम नुसत्या रागात ओरडला...
"तुम्हाला आता येथून जावे लागेल..! सामोपचाराने निघा, नाहीतर तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल.’’
जंगमच्या एका हाताची टेबलाच्या ड्रावरमध्ये असलेल्या रिव्हॉल्वरच्या दिशेने सूचक हालचाल झाली.
“तू मला बंदुकीचा धाक दाखवतो..!”
लक्ष्मी ताईंचा कठोर आणि भेदक आवाज ऑफिसमध्ये घुमला. कितीतरी वेळ तो प्रतिध्वनीसारखा घुमत राहिला..
त्यांची तप्त नजर जंगमवर रोखल्या गेली. कुणीतरी डोक्यावर घणाचे घाव घालतय, हजारो इंगळ्या अंगाला डसत असल्याची वेदना जंगमच्या चेहऱयावर प्रकट झाली. ताईंच्या नजरेत अशी काही आग होती की यात आपण भस्म होणार! जंगम गर्भगळीत होऊन नुसता बघत बसला. असाह्य झाल्यावर अखेर त्याने आपले हात टेकले..!
‘‘नाही नाही ! तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो- आय अॅम सॉरी! मला माफ करा! ताणाखाली कधीकधी माणसाचा तोल जातो- मला माफ करा !’’ गोंधळल्यासारखी स्वत:शीच मान हलवत जंगम बोलत होता.
“जंगम, आता खूप झालं; राजेशला यात गोवण्याचा तुझा उद्देश काय?”
शेवटी जंगमची सहनशीलता संपली. समोर बसलेल्या ताईंचा दाहकपणा इतक्या दुरुनही त्याला असह्य होत होता. शेवटी त्याने हार मानली..दोन्ही हात जोडत त्याने विनवणीच्या सुरात बोलायला सुरुवात केली..
“माझा काहीही उद्देश नाही, मी त्याचा बांधील आहे.. त्यानेच मला हे सगळं करायला लावलं... मी स्वतःहुन काहीही केलेलं नाही... त्याने मला वश करुन घेतलं..त्यानेच माझं सर्व आयुष्य बरबाद केलं..!”
ऍड. जंगमच्या डोळ्यात खरोखरीचे अश्रू उभे राहिले.
“सगळं पहिल्या पासून सांग..!”
ताईंनी त्याच भेदक आवाजात आज्ञा दिली..आणि जंगम पोपटासारखं बोलू लागला..!
“पटवर्धन ला भेटण्याचे टाळून मी त्यादिवशी थेट कोर्टात गेलो..तेथूनच परस्पर पार्टीला गेलो. रात्रीच्या सुमारास माझी गाडी अचानकपणे वाड्याकडे वळली. त्याठिकाणी तो अभद्र प्रकार बघितला हे सगळं खरं आहे..! खरं तर त्या घटनेमुळे मी खूप भ्यालो होतो. परंतु त्याबद्दल मला एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली. पटवर्धनकडे नक्कीच कोणतीतरी शक्ती होती. तिचा वापर करुन ते बेमालूमपणे गुन्हे करत होता. त्याचं कुणीच काही वाकडं करु शकत नव्हतं. पटवर्धनचं आणि त्याच्या त्या शक्तीचं मला आकर्षण वाटू लागलं..! पटवर्धनचा वापर करून मी माझ्या मनातल्या सुप्त इच्छा पूर्ण करण्याचा विचार करत होतो...! ' किती मूर्खपणाचा विचार होता तो !' पण त्यावेळी मला काहीच सुचत नव्हतं! मला फक्त माझा फायदा करून घ्यायचा होता..!
माझ्या मनातले विचार त्या पटवर्धनला कसे समजले काय माहीत? सकाळीचं तो माझ्या घरी हजर झाला.
“गाडी काढ, आपल्याला बाहेर जायचे आहे..!" त्याला मी नाही म्हणू शकलो नाही. गाडीत बसल्यावर त्यानं मला सांगितलं "शक्ती अशी मिळत नसते, त्यासाठी साधना करावी लागते" मी नवलाने त्याच्याकडे बघत होतो. मात्र, त्याला काहीच फरक पडला नाही. मी गाडी चालवत होतो. कुठं जायचं? हे मला माहित नव्हतं. शेवटी एक खेडेगावाच्या सीमेवर येऊन आम्ही उभे राहिलो. पटवर्धन खाली उतरला. त्याने हाताने खून करुन मला गावातील मंदिर दाखविले. "त्या मंदिराच्या पायरीवर फुलं विकणारी एक मुलगी बसते..मला ती मिळवून दे !’ माझा स्वतःवर विश्वास बसेना. पटवर्धन मला अपहरण करण्यास सांगत होता. तो गंभीर आवाजात सांगत होता. ‘जंगम, जर ती मुलगी मला तू मिळवून दिलीस तर पैसा अन सिद्धीचं काय, तुला सगळं सुख मिळवून देईन! तुझ्या मनात काय आहे..हे मला चांगल्याप्रकारे माहित आहे. आणि जे तुझ्या मनात आहे ते चुटकीसरशी मी तुझ्या पुढ्यात उभं करू शकतो ! माझ्याकडे वशीकरणची सिद्धी आहे.. त्या विद्येद्वारे तुला हव्या त्या स्त्रीला उपभोगता येईल!,‘गुप्त धनाचा खजिना’ तुझ्या पायाशी असेल! ‘अरे ती सुलक्षणी आहे. अशा सुकुमार सुलक्षणी कन्येचा जर बळी चढवला तर माझं कार्य सिद्धीला जाईल.. मी अजिंक्य होईन ! आले लक्षात तुझ्या ?’ नुसत्या कल्पनेनेच तो उत्तेजित झाला होता ! मी विचार करत असतांना तो पुन्हा म्हणाला... ‘ तुझे काम फक्त एवढेच की तू तिला माझ्या समोर आणून उभे करायचे ! बस्स ! पुढचे सारे माझ्यावर सोपव !’
इथेच मी लालसेने आंधळा झालो.. गाडीत बायको बेशुद्ध पडल्याचे कारण देऊन त्या मुलीला मी मदतीच्या नावाखाली गाडीपर्यंत आणलं आणि पटवर्धनने तिला आपल्या नजरेच्या कैदेत वश केलं. आम्ही वाड्यात आलो. वाड्यात त्याची एक गुप्त खोली आहे. त्यात त्याने तिला बंद केले. त्यादिवशी पटवर्धन खूप खुश होता..! "बोल, तुला काय पाहिजे?, 'तुझी कोणतीही इच्छा मी पूर्ण करू शकतो..!'
मला नवल वाटलं, त्याची प्रचिती घ्यायची म्हणून मी त्याला माझी सहकारी वनिताचे नाव सुचविले. तिने नुकतेच काम जॉईन केले होते. एका गर्भश्रीमंत व्यापार्याची ती मुलगी.. कुणीही पुरुषाने पाहीले तर त्याला वेड लागेल अशीचं ती.. तिचं आकर्षण सगळ्यांनाचं होतं, तसं मलाही होतं. पटवर्धनने तिला वश करण्यासाठी मला तिच्या खासगी वापराची काहीतरी वस्तू आणायला सांगितली. दुसऱ्या दिवशी मी तिचा हातरुमाल चोरून आणला. त्याने त्यावर काय केलं माहीत नाही. पण, संध्याकाळी वनिता त्याच्यामागोमाग वाड्यावर हजर झाली. काळ्या स्लीव्हलेस ब्लाऊज आणि साडीमधे तिचं प्रमाणबद्ध शरीर बघून मला धीर धरवला नाही. मागचा पुढचा विचार न करता मी तिला एका खोलीत नेलं आणि सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. ती रात्र माझ्यासाठी स्वप्नासारखी होती.
“ज्याची फक्त स्वप्नात कल्पना करायची, ते त्याने माझ्या पुढ्यात टाकलं होतं..! वनिता प्रकरणानंतर मी पटवर्धनवर मनापासून खुश होतो..तो सांगेल ते काम कुठलाही प्रश्न न विचारता मी पार पाडत गेलो. बदल्यात मी सांगेल ती स्त्री मला उपलब्ध होत होती. एका रात्रीची सोबती..रात्री काय झालं, हे सकाळी तिला आठवायचं नाही. मी मात्र त्या सुखाच्या अनुभवात बुडुन जात असे. दररोज नवनवी फर्माईश मी पटवर्धन कडे करत होतो. माझ्या मनातला आजवर झोपलेला विकृतीचा राक्षस जागा झाला होता. समोरचे सात दिवस मी माझ्या मनाला वाटेल तसं करत राहिलो. आठव्या दिवशी सकाळी मी पटवर्धनच्या वाड्यावर गेलो, तेंव्हा तो कसल्यातरी गहन विचारात गढून गेला होता. मी त्याच्यासमोर जाऊन बसलो. स्वगत बोलावे तसे तो बोलत होता..!
“ सात वर्षे झालीत..सात वर्षांपासून मी या दिवसाची वाट बघत आहे..आज ग्रहण आहे..आज रात्री मी तो विधी करणार आहे..त्या सुलक्षणी कन्येचा आज इथं बळी दिल्या जाईल! जंगम, तू जे मागितलं ते तुला मिळालं, आज तुझी परीक्षा आहे. या विधीसाठी तुला माझी मदत करावी लागेल. आजचा विधी जर यशस्वी झाला तर मी अजिंक्य होईल! अमर होईल!”
मी पटवर्धन साठी काहीही करायला तयार होतो. त्याने मला रात्री बरोबर आठ वाजता हजर राहण्याचे सांगितले. आठच्या ठोक्याला मी वाड्यात हजर झालो. पटवर्धनची सगळी तयारी झालेली दिसत होती. त्या विशेष खोलीत होम पेटलेला दिसत होता. विधीच अनेक साहित्य त्याने जमा करुन ठेवलं होतं. आम्ही अपहरण करून आणलेली ती फुलं विकणारी मुलगी होमाच्या एक बाजूला बसलेली होती. त्याने मला खोलीत बोलवलं.!
"जंगम, मी आजवर ज्या शक्तीची उपासना केली, त्या महाशक्तीवान शक्तीचा एक अंश आज इथं प्रत्यक्ष अवतरणार आहे... या विधीत थोडंही माग पुढं झालं तर काहीही होऊ शकतं! तेंव्हा लक्षात ठेव. काही होईलचं असं नाही! पण, जर काही झालंच! तर पुढची जबाबदारी तुझ्यावर आहे..!”
त्याने माझ्या हातात एक लिफाफा दिला. त्यात त्याचं सही केलेलं मृत्यूपत्र होतं.
“ या विधीत माझं काही बरं वाईट झालं तर मी माझा उत्तराधिकारी नेमला आहे..त्याचं नाव यात लिहलं आहे. तू त्याचा शोध घ्यायचा आणि माझी सर्व मालमत्ता त्याच्या स्वाधीन करायची. मात्र त्याच्याकडून काही गोष्टी कबूल करुन घ्यायच्या..नव्हे तशी शपथचं घ्यायची!"
त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ हाष्य उमटले! शून्यात पाहत तो काहीबाही बरळत होता!
“ उत्तराधिकारी सापडला! सगळे गणितं जुळून आले! सुलक्षणी कन्याही गवसली!किती दिवसाचा शोध पूर्ण झाला..! तूही आता पक्यात आला आहेस..तुला अधिकार आहे..तू शपथ दिली म्हणजे त्याला मोडता यायची नाही..! नाही, मोडताचं यायची नाही! माझा परत येण्याचा मार्ग तयार झाला आहे..मी परत येणार! गणित चुकायचं नाही! मी परत येणारचं! अजिंक्य होऊन! अमर होऊन!”
त्याने मला निघण्याचा इशारा केला. मी तसाच वाड्याबाहेर आलो. नंतर वाड्यात काय झालं, मला माहित नाही. मी वाड्यात येऊ नये, अशी सूचना माझ्या मनाला मिळाली. मी राजेशचा शोध घेतला. ठरल्याप्रमाणे सर्व शपथा घेऊन त्याला पटवर्धनची संपत्ती दिली. दर महिन्याच्या अमावस्येला मला त्या वाड्यात जावे लागते.. बरोबर रात्री बारा वाजता त्या विशेष खोलीचा दरवाजा उघडतो..आणि.. आणि तो अजून तिथं आहे! त्या वाड्याच्या बाहेर तो येऊ शकत नाही. मात्र मला कळसूत्री बहुलीसारखे नाचवतो..! मला यातून वाचवा! त्याला पुन्हा एक बळी हवा आहे! मला यातून सोडवा! मला सोडवा! जंगम गयावया करत लक्ष्मीताईच्या पायावर पडला. पण, ताईने त्याला भीक घातली नाही..!
जंगमच्या कार्यालयातुन बाहेर निघताच ताईंची गाडी त्यांच्या घराकडे वळली.
‘राजेश,’ आता सांग; या वकील महाशयांबद्दल तुझं काय मत झालं?’
‘मला तो काही मोठ्या भरवशाचा माणूस वाटला नाही.’
‘राजेश,’ ताईंचा आवाज एकदम गंभीर झाला होता. ‘हा पटवर्धन अत्यंत वाईट, मोठा खतरनाक माणूस होता. अत्यंत वाईट मार्गाच्या साधकांपैकी एक. आणि हा जंगम वकील सुद्धा त्याच मार्गाने निघाला आहे..! त्यांनी काहीतरी संधान बांधून तुझ्याविरुद्ध काहीतरी घातकी कट रचला आहे.'
'पण, तुम्हला जंगमचा संशय कसा आला?'
'अरे, तिथे कितीतरी खुणा होत्या-कितीतरी खुणा.’ ‘जाऊ दे, तू तुझा प्रांत नाही.'
मला यातलं काहीच कळत नाही; ‘पण आपण या जंगमविरुद्ध योग्य त्या ठिकाणी तक्रार का नाही नोंदवीत?’
‘पोलिसांकडे म्हणतोस? तुला असं वाटतं, माझ्या या सांगण्यावर कोणाचा विश्वास बसेल? आणि बसला समजा, आपल्या आरोपाला पुरावा काय आहे? नाही, राजेश, हे लोक कायद्याच्या कक्षेत येत नाहीत...त्यांचा बंदोबस्त आपल्यालाच करावा लागेल..!'
‘पण त्यांना मी कशासाठी हवा आहे?’ न राहवून शेवटी राजेशने विचारलं..!
ताई काही वेळ काहीच न बोलता गप्प बसल्या. त्याला अशी शंका आली की, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहीत आहे; पण सांगायची इच्छा नाही. दोन मिनिटं शांत राहिल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली..!
‘राजेश, ही माणसं फार वाईट आहेत. मी तुला एवढंच सांगते की, त्या पटवर्धनने कोणतं तरी अतिप्राचीन अघोरी दैवत जागृत केलं आहे. तुझा वापर करुन पटवर्धनला या जगात पुन्हा यायचं आहे..कदाचित त्यासाठी त्याला तुझ्या शरीराची गरज असेल!' कदाचित एकदा विशेष विधी त्याला तुझ्या हातून करून घ्यायचा असेल..! कदाचित जंगम सांगतो तास तू त्याच्या दूरच्या फार दूरच्या नात्यातला असशील ! त्याच्या कुळातला म्हणून तुला काह्ही विशेष महत्व असेल ! काहीही असू शकत !
राजेशच्या अंगावर काटा उभा राहिला.
'पण, मीच का?'
'त्याचं कारण मला माहित नाही. त्यांचे मापदंड मला सांगता यायचे नाही. पण, एक मात्र खरं, जसं त्यांनी तुझी निवड केली. तशीच ईश्वरी शक्तीनेही तुझी निवड केली आहे. त्यांचा खात्मा करण्यासाठी. तुझी माझी भेट हा नुसता योगायोग नाही. याही घटनाक्रमाला एक अर्थ आहे. त्यामागेही काही संकेत आहेत.'
काय काय भयंकर गोष्टी ऐकाव्या लागतील याची काही शाश्वतीच राहिली नव्हती. त्यामुळे आणखी काही विचारायची राजेशची छातीच झाली नाही. त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती.
""तू तयार आहेस ना?"
ताईंच्या प्रश्नांने राजेश चमकून गेला.
'पण, ताई मी एक सर्वसामान्य माणूस आशा गोष्टींची मला काय माहिती..मी त्यांचा कसा मुकाबला करणार?"
“बरोबर आहे, तू त्यांच्याशी मुकाबला करु शकणार नाहीस! पण, राजेश- सामान्य माणसाच्या मनात एक असामान्य ताकत असते. तिचा वापर केला तर माणूस सामान्य राहत नाही. अर्थात, तुला जास्त किचकट प्रवचन देत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव वाड्यातील शक्तीशी आमना-सामना होईल तेंव्हा अनेक मोहाचे क्षण तुझ्यापुढे उभे राहतील! जंगमला जशी भुरळ घातली तशी अनेक मार्गानी तुला अमिश दाखवलं जाईल! पैसा, संपत्ती, स्त्री, शक्ती सर्वकाही तुझ्यासमोर उभं केल्या जाईल!. त्याक्षणी तू कशाची निवड करतो, यावर तुझं भविष्य अवलंबून राहणार आहे. जंगम सारखं तू त्या शक्तीच्या आहारी गेलास तर तुझ्या वाट्याला कोणतं आयुष्य येईल, हे मला सांगता येणार नाही. एक गोष्ट मात्र खरी की, सर्व मोहमायाला लाथ मारुन जर तू ईश्वरी मार्गावर कायम राहिलास, तर निश्चितच तुला मदत मिळेल!..जोवर तुझ्या मनात ईश्वरी अधिष्ठान आणि त्यावरील श्रध्दा कायम राहील, तोवर तरी तुला धोका होणार नाही..!"
"दैवी शक्तीवर माझी संपूर्ण श्रद्धा आहे..पण, मी पूजा-अर्चा वगैरे काही केलेलं नाही..मला न देवांचे स्रोत माहीत आहे, ना देवाची आरती..!"
ताईंनी हसत उत्तर दिलं!
“ त्याची काही जरुरी नाही..फक्त मनात विश्वास पाहिजे, निस्सीम विश्वास ! ”
क्रमशः
छान !!!
छान !!!
मस्त!! अपेक्षेपेक्षा लवकर
मस्त!! अपेक्षेपेक्षा लवकर पुढचा भाग आला. पु.ले.शु.
मस्तच !! पुभाप्र
मस्तच !!
पुभाप्र
वाचतेय
वाचतेय
चांगली चालु आहे कथा.
चांगली चालु आहे कथा.