कधीपासून कानांमध्ये एकच आवाज येतोय ... टू ss क .... टू ss क .... टू ss क .... काय आहे हे ? . डोळ्यांत पाणी जमा झालेय की डोळ्यांची पाहण्याची शक्ती निघून गेलीय कळत नाही. डोळ्यांसमोर धूसर दिसत आहे ... काहीतरी हलताना दिसतंय . संबंध शरीरभर होत असलेल्या वेदना कमी झाल्यात की , माझं शरीरच बधिर होत चाललं आहे , कळत नाही . घसा कोरडा झालाय . पाणी प्यायचंय पण ते सांगायची ताकद उरली नाही . खोकल्याची उबळ येतेय पण तेवढे त्राण नाहीत. डोळे आपोआप मिटत आहेत . त्यात पापण्यांमध्ये जमा झालेलं पाणी डोळ्यांच्या कडांनी थेंबाथेंबाने ओघळून कानापाशी जात आहे . त्या उष्ण पाण्याचा स्पर्श होतोय . चेहऱ्याला कसलातरी स्पर्श होतोय . बहुतेक कोणीतरी डोळ्यांतून ओघळलेलं पाणी टिपून घेतंय . कोण असेल ते ? काहीच दिसत नाही . मेंदूला ताण देऊन विचार करतोय ,पण काही फायदा नाही . मेंदूतल्या पेशींनी आपलं काम करणं थांबवलेलं दिसतंय ? कोण आहे मी ? माझं नाव काय ? अरे देवा ... हेही आता आठवत नाही . शरीरातले एकेक अवयव त्यांचं काम थांबवत आहेत . नाही , कदाचित त्यांचं काम बंद पडत चाललं आहे . आधी आजूबाजूला कुजबुजलेलंही ऐकू येत होतं , पण आता काहीच ऐकू येत नाही . तो . टू ss क .... टू ss क .... टू ss क .... आवाजही आता क्षीण होत चालला आहे . श्वास जड होतोय ... नव्हे जोरात घ्यावा लागतोय . कोणीतरी बोलतंय असा भास होतो . अचानक अंगभर मुंग्या आल्यासारख्या वाटतात , आणि परत नाहीशा होतायत . लहरी जातायत शरीरातून असं वाटतंय . हळूहळू वेदना कमी होत आहेत . हलकं झाल्यासारखं वाटतंय . डोळे मिटल्यावर पिवळट केशरी रंगाचा पडदा दिसतोय ... पण त्याचा फिकट रंग हळूहळू गडद होत चाललाय , इतका गडद की समोर काळोख झालाय असं वाटतंय . शरीरातून एकदम सर्वत्र कंपने जाणवतायत , श्वास चढलाय आणि त्याच बरोबर एकदम हलकंही वाटतंय . अगदी पिसासारखं ... समोरून तीक्ष्ण प्रकाशाचा झोत अंगावर येतोय आणि एकदम पुन्हा नाहीसा होतोय . असेच वारंवार झोत अंगावर येतायत ... त्यांचा वेग वाढत चालला आहे , कुठेतरी वेगाने जात असल्यासारखं वाटतंय ... हे काय होतंय ? अचानक पुन्हा काळोख , मिट्ट काळोख ... निरव शांतता . इतकी शांतता यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती . असं वाटतंय ही शांतता अशीच राहावी .... कायम . अचानक पुन्हा कंपने .... त्याचा वेग आणि तीव्रता वाढलीय . डोळ्यांसमोरचा काळोख हळूहळू फिकट होतोय , लालसर रंग त्यात मिसळलाय ... हळूहळू तो प्रखर होतोय . लालसर रंग फिकट होत होत केशरी पिवळसर झालाय . प्रखर प्रकाश जाणवतोय . अचानक काहीतरी झालं आणि वेदनेचा आगडोंब उसळला . संबंध शरीरातून झिणझिण्या गेल्यासारख्या वाटल्या . डोळे अर्धवट उघडले तोच तीव्र प्रकाश बाणासारखा डोळ्यांत शिरला आणि डोळ्यांची आग ... आग ... झाली . सबंध शरीरभर वेदनेच्या एकामागून एक लहरी ... असह्य होतंय . जोरात ओरडतोय , पण त्या वेदना काही थांबायचं नाव घेईनात , आणखी वेदना , भयंकर वेदना , नकोत त्या वेदना , जोरजोरात ओरडून मी व्यक्त होतोय , पण आजूबाजूला हर्षोल्हासित उद्गार आणि हसण्याचा आवाज येतोय . ओह नो ... परत !
संक्रमण
Submitted by मिलिंद महांगडे on 4 August, 2019 - 06:42
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मृत्यु आणी मग जन्म.
मृत्यु आणी मग जन्म.
मृत्यु आणि मग जन्म.>>> हे असं
मृत्यु आणि मग जन्म.>>> हे असं असतं तर!
छानेय.
सुरेख
सुरेख
मस्त कल्पना. पण हे असं नसतं..
मस्त कल्पना. पण हे असं नसतं...
मग कसं असत??
मग कसं असत??
आवड्लं लेखन.
आवड्लं लेखन.
अहो पण जन्म घेण्या आधी अर्भक
अहो पण जन्म घेण्या आधी अर्भक श्वास घेत नाही.
भारी आहे!
भारी आहे!
परत परत वाचल्यानंतरही समजत
परत परत वाचल्यानंतरही समजत नाहीये !
छान कल्पना !
छान कल्पना !
जमलीये
जमलीये
शेवटची २ वाक्ये मस्त आहेत.
शेवटची २ वाक्ये मस्त आहेत. एकदम हसु आले.
शेवटची २ वाक्ये मस्त आहेत.
शेवटची २ वाक्ये मस्त आहेत. एकदम हसु आले.