Submitted by प्रिंसेस on 10 December, 2007 - 05:54
ही कविता माझ्या पपांची... त्यांच्याच एका इंग्रजी कवितेचा त्यांनीच केलेला अनुवाद. ऍक्सिडेंट नंतर बरेच महिने माझे वडिल कोमात होते ("न संपणारी गोष्ट" मध्ये सांगितलय कदाचित मी.) त्यामुळे बर्याच गोष्टी करायच्या राहुन गेल्यात, तेच सांगितलय यात..
दिवसामागुन दिवस गेले
उदया जगेन म्हणतांना
माझे जगायचे राहुन गेले...
सुटले होते काही हात
काळाच्या प्रवाहात
उद्या शोधेन म्हणतांना
ते कायमचे हरवुन गेले
उडायचे होते काही क्षण
स्वतःच्याच आकाशात
उद्या उडेन म्हणतांना
माझे पंख कापले गेले
एक दिन अकस्मात
काळ उभा राहिला
मृत करुन मला
व्यर्थ श्वास देत राहिला
ना राहिलो जिवंत
ना मेलो मी
माझ्या मरणाचा सोहळा
याचि डोळा पाहिला...
प्रिन्सेस...
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख
किती सुरेख लिहिलय, स्पर्शून जात...
वास्तव
व्यर्थ श्वास देत राहिला>.
काय lihilay.. !! touching
कविता..
कविता मला उमगत नाहीत म्हणुन मी या वाटेला फारसा फिरकत नाही पण ही कविता त्या मागच्या पार्श्वभुमीमुळे असेल कदाचीत भावली.
धन्यवाद
सगळ्यांना खुप धन्यवाद...
-प्रिन्सेस...
सुंदर
व्यर्थ श्वास देत राहिला......
अगदी!
व्वा
खुपच छान, राजकुमारी
खुप छान
खुप छान आहे. डोळ्यात पाणि आले वाचताना.
माझं मत
मनाला भिडलं........
प्रिन्सेस..
तुमच्या पपांनी अगदी सगळं जसच्या तसं सांगितलय.. इंग्लीशमधील ओरिजिनल कविता वाचायला मिळेल?
काळजी घे पपांची.
मेघा
नि:शब्द
माझ्या मरणाचा सोहळा
याचि डोळा पाहिला...
काय लिहिलय गं प्रिन्सेस, मी नि:शब्द झाले गं कविता वाचून. 'न संपणारी गोष्ट' ची लिंक दे मला. मी वाचल्याचं आठवत नाहीये. बाकी कवितांच्या बाबतीत अजयला शब्दनशब्द अनुमोदन. पण ही कविता खुपच भावली, विशेषतः शेवटच्या ओळी खासच आहेत. जमलं तर ती इंग्लिश कविता पण इथे टाक.
छान
छान कविता...... आत्म्याचे डोळे उघडे ठेऊन जगणे शिकायला हवे.....
नाहीतर आयुष्य होते एक मुगजळ....... कल्पना
आजच
आजच वाचली.....अप्रतिम कविता. कवितेतल काहिही न समजनार्यांनाही समजतात अशा कविता कारण त्या आतून आलेल्या असतात.. ओढून ताणून लिहिलेल्या नाहित....
सुंदर... अगदी यथार्थ...
सुंदर... अगदी यथार्थ...
सुटले होते काही हात काळाच्या
सुटले होते काही हात

काळाच्या प्रवाहात
उद्या शोधेन म्हणतांना
ते कायमचे हरवुन गेले
वाह ! क्या बात है !
माणसाची एकुण जीवन कहाणी मोजक्या वाक्यात मांडली आहे.!
पपांची पुण्यतिथी जवळ आलीये.
पपांची पुण्यतिथी जवळ आलीये. ही कविता वाचण्यासाठी इथे आले. प्रतिसादांना उत्तर द्यायचे राहुन गेलेय हे लक्षात आले.
खूप उशिरा उत्तर देतेय लोकहो धन्यवाद! ईंग्रजी कविता पोस्ट करेन लवकरच.