एक सचित्र विडंबन
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
18
(चित्रासाठी आभार श्री सुनील)
( कविवर्य श्री सुरेश भट , आशा ताई आणि पंडीत हॄदय नाथांची क्षमा मागून )
मूळ कविता : केंव्हातरी पहाटे
बघता तुझ्या बुटाला कलेजी खलास झाली
मिटला चुकून डोळा (एकच बर) हळूवार शीळ गेली
सांगू तरी कसे मी, बील खुळगे पालीशचे
अडकून श्वास माझा, दडपून बात गेली
कळले मला न केव्हा, सुटली मिठी बुटाची
कळले मला न केव्हा, फसवून नार गेली
उरले उरात काही, आवाज ठोकळ्यांचे
दिवसा तारकांचे, दर्शवून बाय गेली
कळले मला न तेव्हा, पडल्या कश्या (दंत)पंक्ती
मग चमक ती बुटांची, दाखवून लाथ गेली
(चु भू द्या घ्या)
विषय:
प्रकार:
शेअर करा
सहीच रे
सहीच रे केद्या
मग चमक ती बुटांची, दाखवून लाथ गेली >
**********************************************
/@#%^&*#@#@@!!#?\
केदार, छान!
केदार, छान!

सही..
सही..

'सचित्र कविता' आल्याचे पुसटसे आठवते. आता 'सचित्र विडंबन' या नव्या पाककृती सुरू करण्याचे क्रेडिट तुला रे भो.
कुठून मिळाला हा रे भन्नाट फोटू?
--
कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!
केदारा माफ
केदारा माफ कर पण जम्या नही
रागावू नकोस पण ह्यापेक्षा खूप चांगले लिहितोस तू...
चु.भू.दे.घे.
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा
अगदी "उंची"
अगदी "उंची" चित्र ...
सुरेख,
सुरेख, कल्ला एकदम !!
____________________________________________
मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/
साजिरा, तो
साजिरा, तो फोटो मी कुठून आणला ते शिक्रेट आहे!!
बाकी विडंबन ठीक पण गझलेचे यमकाचे नियम बरेच सैल केलेले आहेत!
धन्यवाद
धन्यवाद दीप्या, कॄ, साजीरा, विशाल
योग : ती तरुणी उंच आहे खरी
मिल्यादादा, सुनील : मी चांगल लिहायचा प्रयत्न करीन. सुनील म्हणतो तस हे बरचस स्वैर विडंबन झालय
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
केद्या काय
केद्या काय केलस रे हे
मस्तच !
गुरू !!
गुरू !! जबरी !!
फोटो साठी
फोटो साठी सगळे माफ
सुन्या ,
सुन्या , प्रकाश धन्यवाद
असामी
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
फोटो झकास
फोटो झकास आहे पण कविता ओढून ताणून केल्यासारखी वाटली
खरच फोटो
खरच फोटो लै भारी...केदार पुन्हा हात फिरव जरा विडंबन पण भारी होईल बघ
मिलिंदा ,
मिलिंदा , श्या बरोबर आहे तुमच
अधिक योग्य प्रयत्न करायला हवाय
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
आज वाचलं
आज वाचलं हे, जबरी आहे..
खत्रा
खत्रा
कुठे कुठे मीटर मध्ये बसत
कुठे कुठे मीटर मध्ये बसत नाहिये, पण शेवटच्या दोन कडव्यांचा आशय धम्माल आहे
माझ्यातर्फेही चित्रासाठी सर्व त्रुटी माफ.