वास्तू १० https://www.maayboli.com/node/70127
वास्तु ९ https://www.maayboli.com/node/70107
वास्तू ८ https://www.maayboli.com/node/70105
वास्तू ७ https://www.maayboli.com/node/70030
वास्तू ११
सौम्यला समजत होतं सगळं, त्याचं त्या जागेपर्यंत येणं हाच खुप मोठा पुरावा होता. त्याने शक्य तेवढ शांत राहण्याचा प्रयत्न केला, शांततेत आपोआप त्याच्या तोंडून नामस्मरण होऊ लागलं. इकडे भाऊची अवस्था मात्र वाईट होती, भीतीने तो अगदी थरथरत होता, कारण घडणाऱ्या घटना मानवीय नाहीत याची त्याला देखील खात्री झाली होती. तो सौम्यला तिथून निघुयात म्हणुन सांगत होता, पण सौम्यला त्याच्या ताईसोबत काय झालं हे कळायला एक मार्ग सापडला होता त्यामुळे त्याने ती जागा सोडायला नकार दिला.
एकीकडे गिरीजाला बाकीच्या पाचही जणी थांबवायचा प्रयत्न करत होत्या. त्यांना मुक्ती तर पाहिजे होती पण मुक्तीच्या ऐवजी पुन्हा कोणी त्यांचा वापर करून घेईल हीच भीती जास्त होती त्यामुळे त्या जमेल तितका प्रयत्न करत होत्या कि त्यांचं अस्तित्त्व कोणाला कळू नये. पण गिरीजाचा निर्धार पक्का होता, तिला काहीही करून तिच्या भावापर्यंत तिच्यासोबत काय घडलं हे पोहचवायचं होतं. त्या पाचही जणींनी दाटवलेला अंधार शेवटी विरायला लागला, आणि गिरीजा सौम्यला सामोरे जायला मोकळी झाली.
इकडे भाऊ तर सौम्यला मागे ओढण्यात मग्न होता, तेवढ्यात सौम्यचं लक्ष कोपऱ्यातल्या एका झाडाकडे खेचलं गेलं, झाडाच्या मागे कोणी असल्याचा भास त्याला झाला. अश्या अकल्पित वेळेला इथे कोण येणार म्हणुन त्याने नीट निरखून बघायचा प्रयत्न केला, पण काही केल्या नक्की कोण आहे हे काही दिसत नव्हतं. त्याने एक दोन वेळा आवाज देखील दिला, पण उत्तरादाखल त्याला फक्त शांतीच मिळाली. एव्हाना त्याने नवनाथ रक्षा मंत्र जपायला जोरात करायला सुरुवात केली होती,
! नमो भगवते, सकल भायोच्चाटन भैरवाय, भूत-प्रेत-पिशाच्च-ब्रम्हराक्षासादि..
मंत्र अर्धा पण नव्हता झालेला तेवढ्यात झाडामागून गिरीजा आणि बाकी पाच जणी बाहेर आल्यात. गिरिजाला इतक्या वर्षांनी बघून सौम्यला आनंद तर झाला पण पुन्हा त्याच्या मनात नको त्या शंका यायला लागल्यात, कारण हा आधीच चकवा होता, त्यात जर त्याच्याकडून मंत्रात बाधा आणण्यासाठी ह्या अघोरी शक्ती कोणत्या थराला जाऊ शकतात याचा त्याला अंदाज होता. म्हणुन त्याने मंत्र पुढे सुरु ठेवला.
सकल भयोच्च्चाटन स्व-मंत्र-यन्त्र-तंत्र-रक्षणाय, अष्ट भैरवाय, शाकिनी – डाकिनी – छिन्दाय..
मंत्रोच्चारामुळे त्या सहाही जणींच्या अंगाचा दाह होत होता, त्यातल्या बाकी पाच जणींच्या किंकाळ्यानी भाऊची कानठली बसली. पण गिरीजा मात्र शांततेत तो त्रास सहन करत होती. मुळात तिला ह्या क्षणाला त्या त्रासापेक्षा सौम्यला बघायला मिळालं याचाच आनंद होता. अगदी शांततेत तिने सौम्यला आवाज दिला, त्या आवाजातल्या आर्जवामुळे एक क्षण सौम्यने तिच्या डोळ्यात पाहिलं, भावा-बहिणीची ओळख पटली, आणि सौम्यने मंत्रोच्चार थांबवला. सर्व जणी शांत झाल्या पण घाबरून सौम्यकडे बघत होत्या, त्यांना अजुनहि भीती होती कि त्या एका मांत्रिकाच्या तावडीतून सुटून दुसऱ्याच्या हातातलं बाहुलं नव्हत बनायचं. पण ह्या सर्वात गिरीजा मात्र कमालीची शांत उभी होती, सौम्य आणि ती एकमेकांकडे बघत होते, अचानक सौम्य पुढे झाला, पण त्या सरशी गिरीजा मागे झाली. सौम्य तिथेच थांबला, तिच्याकडे फक्त प्रश्नार्थक नजरेने बघितलं...
उत्तरादाखल ती फक्त हसली, अगदी शांत, पण त्या हसण्यात एक प्रकारची खिन्नता होती, तिने शांततेत झाला प्रकार सौम्यला सांगायला सुरुवात केली. लग्नासाठी आलेली गिरीजा, अलगद अघोऱ्याच्या जाळ्यात ओढली गेलेली, तिचा मृत्यू, मृत्यनंतर झालेली तिची अवहेलना, सगळ सांगितलं तिने, ते ऐकून सौम्यच्या हातांच्या मुठी आपोआप वळल्या गेल्या, संतापात त्याचे डोळे लाल झाले, तो पुढे काही बोलणार तेवढ्यात गिरीजा पुढे बोलायला लागली...
क्रमशः
Nice .... Khup Chan story
Nice .... Khup Chan story chalu aahe...
Pan itakya ushira takunahi evdha lahan ka takala Barr...
छान. आवडले. मधले भाग वाचले
छान. आवडले. मधले भाग वाचले होते. आवडले होते.
छान..पण पुढचे भाग लवकर आणि
छान..पण पुढचे भाग लवकर आणि मोठे पोस्ट करा. पु.भा.प्र!
ताई, फार लहान भाग.
ताई, फार लहान भाग.
khup mast story ahe ani khup
khup mast story ahe ani khup interesting pan..lavakar pudhcha bhag post kara mam