ग्रहण

Submitted by छोटी on 23 July, 2019 - 02:24

@अर्चना चौधरी

सुमतीबाई मंदिरात रोजसारख्या जप करत बसल्या होत्या. शांतचित्ताने जप करणाऱ्या सुमतीबाई... संध्याकाळी देवासमोर तेवणाऱ्या समईसारख्या दिसायच्या.त्यांच्याकडे बघितलं की एक चैतन्य जाणवायचं.कित्येक वर्षांपासून मंदिरातल्या लोकांना हे दृश्य सवयीचं झालं होतं.आज नेहमीसारखा जप करून डोळे उघडले.देवाला हात जोडले तर मालतीबाई समोर उभ्या,सोबतीला सून, काहीशी वैतागलेली कुठंतरी जाण्याच्या गडबडीत असल्यासारखी... 5 6 महिन्याची प्रेग्नंट असावी...
"नमस्कार, कश्या आहात सुमतीबाई?" मालतीबाईंनी बोलायला सुरुवात केली.
"अहो मी मस्त, तुम्ही सांगा कश्या आहात मालतीबाई? खूप दिवसांनी भेट झाली."
"मी ही छान हो,खुप धावपळ असते सध्या तर नाही होत येणं इकडे...ही माझी सुन अनघा.पाया पड ग."
"अहो, काय पाया पड? प्रेग्नंट आहेस ना ग? कितवा महिना चालु आहे" सुमातीबाईंनी अनघाला विचारलं.
"सहावा" अनघाने उत्तर दिलं.थोडासा वैताग कमी झाल्यासारखा वाटला.
" व्वा,छान ,आनंदी रहा, खुश रहा,खूप काळजी घे..."
"हो,त्यासाठीच तुमच्याकडे आलो आहोत" मालतीबाईंनी मुद्द्याला हात घालायचा प्रयत्न केला.
"माझ्याकडे? मी नाही हो dr"असं म्हणत सुमतीबाई एकदम बुचकळ्यात पडल्या.
"अहो, तसं नाही.उद्या ग्रहण....काय काळजी घ्यायला पाहिजे, काय प्रथा, काय संस्कृती... मागच्या वर्षी तुम्हाला दुसरा नातु झाला. तुम्हाला चांगलीच माहिती असेल. तुमची आध्यत्मिक ओढ बघता तुम्ही चांगलं मार्गदर्शन कराल म्हणून आज सकाळी सकाळी तुम्हाला गाठलं." एका दमात आपला उद्देश स्पष्ठ केला... अनघाच्या मनातली चिडचिड चेहऱ्यावर दिसायला लागली होती.
"अहो, काहीतरीच काय, कसली अध्यात्मिक ओढ... देवाचा जप करते तेवढाच.. पण ग्रहणाचं म्हणाल ते पण गर्भारपणात तर एकदम कडक शास्त्र...जसेच्या तसंच करायला पाहिजे " अनघाच्या चेहऱ्यावर असलेली अढी अजूनच ठळक झाली.... न बोलताही बरंच काही सांगतो चेहरा आपल्याला सांगायचा नसला तरी.
"बघ ग, बरं झालो आलो ना सकाळी."
"जॉब करतेस का ग?" सुमतीबाईंनी अनघाला विचारलं..."हो करते.. आणि सध्या सुट्टी मिळणं अशक्य आहे..आणि मिळाली तरी मी घेणार नाही...सगळ्या सुट्या मला बाळासाठी ठेवायच्या आहेत " अनघाने तिची गाडी नॉन स्टॉप सोडली...
सुमतीबाई प्रचंड गोड हसल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या
"बाळा, अजिबात नको घेऊ सुट्टी... पण ग्रहणाचं मात्र पाळ... माझ्या सुनेने केलं तसं" अनघाला काय बोलता आहे ह्याचा अंदाजच येईना."बाळा, उद्या सकाळी उठायचं, 'कराग्रे वसते लक्ष्मी' म्हणायचं.हे रोजच केलंस तर उत्तम...प्रातर्विधी उरकायचे. ड्राय फ्रुट खायचे... आणि mediation किंवा ओमकार करायचे... माझी सून साधारणतः अर्धा तास करायची रोज पण ग्रहणात एक तास केले mediation... म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी मिळून... आपल्या कुठलाही आवडत्या देवाचं स्मरण करायचं... मीटिंग मध्ये असताना... काम करताना.. उठताना बसताना... basically तुला ज्या ज्या गोष्टीतून positive energy मिळेल ते करायचं... तुला आनंद मिळेल तसं वागायचं... आवडीचे पदार्थ वाटले तर बनवायचे किंवा तुमच्या काय त्या swiggy biggy वरून मागवून limit मध्ये खायचे... कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको... वेळेवर जेवायच... व्यायाम करायचा... तुमचं काय ते एन्जॉय माडी... करायचं..." अनघा विस्फारून म्हणतात ना तशी बघत राहिली,काय बोलता आहेत ह्या काकू?असं कसं शक्य आहे... आणि मालतीबाई तर चक्कर येऊन पडायच्या बाकी होत्या...करायला गेल्या एक आणि झालं दुसरंच..."अहो, सुमतीबाई काय बोलता आहात तुम्ही...अहो ह्या कुठल्या प्रथा....अहो, आपल्या जुन्या काळाच्या प्रथा म्हणत होती मी...घरी बसायचं असत, एका जागेवर, ग्रहण काळात.घराच्या बाहेर पडायचं नाही. नाहीतर बाळ काळं होतं.चिरायचं, कापायचं नसतं, काही खायचं नाही. नाहीतर बाळाच्या ओठावर चिर पडते,विद्रुप बाळ होत.घरातलं साठवलेलं पाणी खराब झालेलं असतं ते ओतुन द्यायचं, नवीन पाणी भरलं की मग पाणी प्यायचं तोपर्यंत पाणी प्यायचं नाही. नाहीतर बाळाच्या तत्वेचे विकार होतात.आपणच ह्या गोष्टी बंद केल्या, प्रथा बंद केल्या तर येणाऱ्या पिढीचं काय?" मालतीबाई वैतागून आपली बाजु मांडत होत्या... " सुमतीबाई अजूनही शांतच होत्या... फारच शांततेत त्यांनी विचारलं"मालतीबाई, तुम्हाला असा काही अनुभव?कोणाच बघितलं आहे... ऐकलंय म्हणून सांगू नका."मालतीबाई विचारात पडल्या.... अय्या खरंच की...पण आता माघार कशी घेणार "अरे, मला कसं काय येणार असे अनुभव...माझ्या सासूबाईंनी, आईने जे सांगितलं ते मी तंतोतंत पाळलं... बाळाच्या जीवाशी कशाला खेळ?" "मालतीबाई, चिडू नका बरं. मी काय सांगते ते ऐकून घ्या. नाही पटलं तर सोडून द्या.मी पण माझ्या गर्भारपणात तुम्ही सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी बाळाच्या जीवाला कशाला त्रास म्हणून केल्या आणि सुनेच्या पण पहिल्या बाळंतपणात तिलाही सांगितल्या.नाराजीने का होईना ती करायला ही तैयार झाली.पण ग्रहणाच्या दिवशी माझा accident झाला घरातच... त्यामुळे माझी काळजी ,जेवण, बनवणं...आणि काय तो client call का काय म्हणतात ना तो पण घेतला पठ्ठीने... नाही नाही करता करता सगळंच केलं... मग मलाच tension यायला लागलं... तिला बोलून नव्हती दाखवत पण तिला कळत होतं...अहो 8व्या महिन्यात 4D sonography केली त्यात बाळ दिसलं.एकदम गुटगुटीत healthy तेव्हा कुठे मनातला किंतु कमी झाला. नातु आला त्याला बघितल्यावर तर स्वतः च मला माझ्या बुरसटलेल्या विचारांचा राग आला. मग तिच्या दुसऱ्या बाळंतपणात तर ग्रहण ब्रिहण चल हट केलं... त्यानंतर मग कोणीही विचारलं ना ग्रहणात काय करायचं तर मी आणि माझी सून हेच सांगतो.. ह्या काळात गर्भवती बाईने खुप खुश राहणं गरजेचं असतं.आई खुश तर बाळ खुश. आईच्या मागे कटकट केली की बाळ पण किरकिर होतं आणि मुळात ह्या generationला बांधून ठेवलं ना की ती दूर होत जातात. ह्यांना का? कसं? असे प्रश्न पडतात. आपल्याला ते पडले किंवा नाही पडले ह्याचा आपण विचारच नाही केला.ह्यांचे problem वेगळे आहेत.'आमच्या वेळी नाही बाई आम्ही असे प्रश्न विचारले' ही वाक्य मुलाला आणि सुनेला तर आपल्यापासुन दूर नेतात... अहो मुलीला बोलली तर मुली ऐकुन घेत नाही.करूया ना प्रथा change... तुम्ही वाचलं की नाही माहिती नाही मागच्या वर्षी एका स्त्रीचा ह्या ग्रहण प्रथेपाई मृत्यु झाला... असंच बसवून ठेवलं... ती सांगत होती पोट दुखत आहे... पोट दुखत आहे...पण घरच्यांनी ऐकलं नाही...बाळ बाळंतीण दोन्हीही dr ची मदत मिळेपर्यंत गेले.. काही स्त्रियांना low BP चा त्रास झाला...अहो इतकी उदाहरण ऐकली gynac कडून की एकदम कानाला खडा...स्वतः तर नाही पण तुमच्यासारख्या माझ्या मैत्रिणींना पण नाही करू देणार... पण अनघा, देवाचं नामस्मरण मात्र कर हो... त्याने positivity मिळेल... शांत वाटेल... तुमच्या धकाधकीच्या routine मध्ये बाळाला थोडे संस्कार थोडी शांती,थोडा आराम... आपले मंत्र आपल्याला खुप ताकद देतात... हे पण अनुभवाचे बोल...आणि scientifically proven आहे बरं... "
"सुमतीबाई, डोळे उघडले तुम्ही.कळत पण वळत नाही म्हणतात ना,तस झालं बघा.भीतीपोटी पोरींचे हाल करायला निघाली मी.पोर आधीच व्यायाम, mediation, ऑफिस सगळंच जमवते आहे.पण अनघा, तु कर कॅब बुक आणि पोहच ऑफिसला मी जाईन घरी आरामात..."
"अहो आई, बाळाच्या काळजी पोटी होतं सगळं म्हणूनच आपण करत होतो ना... काकु तुम्ही मात्र खरंच मस्त प्रथा सांगितली आम्ही पण तुमच्या सांगण्याप्रमाणे ग्रहण पाळू... आई तस आपण तेच ठरवलं होतं ना काकु सांगतील तेच करूया म्हणून... काकू आजच्या दिवसातील सगळ्यात भारी काम आईंनी केलं, मला मंदिरात तुम्हाला भेटायला आणलं.मी उगाच कुरकुर चीड चीड केली.पण आतापर्यंतचा अनुभव घेता त्या ज्या गोष्टीसाठी force करतात ती महत्वाची असते आणि त्यातून मस्त काहीतरी होतं आणि परत एकदा ते खरं ठरलं...so happy happy..."
" चल चल, उशीर होतोय ना...संध्याकाळी ये लवकर."
पोटावर हात ठेवून सावकाश पायऱ्या उतरणाऱ्या नवीन आईकडे प्रेमाने आणि कौतुकाने बघणाऱ्या , काळजी करणाऱ्या आई तिच्या मागे ठामपणे उभ्या होत्या,आहेत आणि राहणार....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

basically तुला ज्या ज्या गोष्टीतून positive energy मिळेल ते करायचं >> Happy सुमतीबाई आणि मालतीबाई सुद्धा आयटीमध्ये काम करणार्‍या नवतरूणी असतील नाही वाक्यांच्या मध्ये रोमन शब्द वापरायला Wink
अशी एका पॅराग्राफ मध्ये कथा लिहितात का?

धन्यवाद मधुरा..

धन्यवाद me_anu .... खरच गरज आहे काळानुसार बदलण्याची आणि आपले विचार पोहचवण्यावची