एक जुना किस्सा आठवतो.
अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला दर्शनाच्या रांगेत उभे असल्याचे दिसले असे सांगितले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले
१) निरंजन घाटे हा ही माणूसच आहे
२) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही.
३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय?
४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर?
परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली. त्यानंतर बर्याच वर्षांनी मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर एकदा निरंजन घाट्यांकडे भेटायला गेलो.गप्पांमधे त्यांना हा किस्सा सांगितला. मला त्यांचे मत जाणून घ्यायचे होते.त्यांचे लहानपण त्या भागात गेले होते. अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. हाच तो सर्वसामान्य माणूस असल्याचा भाग होता. नंतर एकदा पुस्तक पेठेत ते भेटले होते. त्यावेळी ही गप्पात अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय निघाला त्यावेळी ते म्हणाले कि.समाज बदलायला पुरेसा वेळ दिला पाहिजे. मी त्यावर लिहिल आहे.
वाचत सुटलो त्याची गोष्ट या पुस्तकात ते म्हणतात," गार्डनर चे पुस्तक आणि जॉन ग्रँट च ‘ बोगस सायन्स ऑर व्हाय पिपल रियली बिलीव्ह दीज थिंग्ज ‘ हे पुस्तक वाचताना मला नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांच्या पुस्तकांची आठवण झाली. मी या दोघांचीही बरीच पुस्तके वाचली आहेत. श्याम मानव यांची आणि माझी 1978 च्या सुमारास नागपूर मध्ये ओळख झाली. त्यांच्या कार्याचे महत्व मी जाणतो. नरेंद्र दाभोळकरांची आणि माझी ही ओळख होती. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्रत प्राणपणाने घेतलं होतं आणि त्यातच त्यांचा बळी गेला. पहिल्या अंधश्रद्धा निर्मूलन संमेलनात त्यांची माझी भेट झाली तीच शेवटची. त्यानंतर महिन्याभरातच त्यांचा मृत्यू झाला. संमेलनातल्या माझ्या भाषणातील मुद्दे आणि त्यांचे विचार जुळणारे नव्हते, तरी त्यांच्या कार्याबद्दल मला आदर होता. त्यांनी माझे विचार ऐकून घेतले. त्यावेळी त्यांनी निरोप देताना ‘आपले विचार एकाच प्रकारचे आहेत,पण आपले मार्ग भिन्न आहेत’ असे म्हटले होते.
कुठलीही चळवळ पुढे रेटायची तर नेता आक्रमक असावा लागतो, तरच चळवळ पुढे जाते. मात्र बऱ्याचदा या आक्रमकपणाला, क्रियेला तितकीच आक्रमक प्रतिक्रिया अशा स्वरूपाचं उत्तर मिळतं. दोन्हीही पक्ष अधिक कडवे होत जातात. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने पुढे देवाला विरोध करायचे सोडले आणि बुवाबाजीला विरोध सुरू केला. मग अनेक बुवा उघड केले . पण बुवांकडे जशी अमाप संपत्ती जमली होती तशी चळवळीकडे नव्हती हे एक, आणि या चळवळीच्या नेत्यांच्या पुस्तकांची भाषा अगदी कोरडी होती. त्यात एक प्रकारची भावना शून्यता असे. तुलनेने मला मार्टिन गार्डनर , जॉन ग्रँट यांची पुस्तके आदर्श वाटतात.ती वाचकाला आपलं करतात.
अंधश्रद्धेबाबत माझ म्हणण थोडं वेगळं आहे.ती गेली कित्येक शतकं समाजात रूढ आहे.ती एका दिवसात जाणार नाही. अशाश्वत जीवन, दारिद्र्य आणि सततची चिंता यामुळे अंधश्रद्धा वाढीस लागते.’ गप्पी मासे पाळा आणि मलेरिया पळवा’अशी घोषणा देता येते. अंधश्रद्धा पळवणारे गप्पी मासे मिळत नाहीत. त्यापेक्षा हळूहळू अंधश्रद्धेच्या पाईकांना फितूर करता आले तर आपोआपच अंधश्रद्धेला म्हणजे मूलतः बुवाबाजीला भगदाड पडतील असे मला वाटते. अंधश्रद्धेचा आणि विज्ञानाचा तसा जवळचा संबंध नाही. अंधश्रद्धा हा मानसशास्त्राचा भाग आहे. ती दूर करायची तर त्यासाठी भक्तांची मनोधारणा बदलणं महत्त्वाचं ठरतं. माझे हे विचार मी स्पष्टपणे मांडत आलोय आणि हळूहळू अंधश्रद्धेवर सतत सौम्य हल्ले चढवत आलोय. मी भू शास्त्राचा विद्यार्थी असल्याने वाहतं पाणी खडकांवर कसा कसा परिणाम करते याची मला कल्पना आहे. विज्ञान लेखन हेच काम करतं .श्रद्धा मानवी जीवनाला घातक असती तर ती उत्क्रांतीत कधीच नष्ट झाली असती.पण ती टिकली. मात्र, ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’ या न्यायाने श्रद्धेचा अतिरेक होण्यापासून समाजाला वाचवण हे महत्त्वाचं ठरतं . मार्टिन गार्डनर आणि जॉन ग्रँट यांनी हे काम लेखणीद्वारे कसं करावं याचा आदर्शच घालून दिला आहे ."
अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत निरंजन घाटे यांचे विचार
Submitted by प्रकाश घाटपांडे on 17 July, 2019 - 00:11
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नक्कीच. अशा विषयांवर
नक्कीच. अशा विषयांवर विचारमंथन होणे चांगलेच आहे. आपणही संयतपणे, वेळोवेळी विचार मांडून चर्चा घडवून आणली यासाठी आपणास धन्यवाद!
उपक्रम या संकेतस्थळावर अशा
उपक्रम या संकेतस्थळावर अशा चर्चा भरपूर झाल्या आहेत त्यातील काही भाग केवळ नमुना म्हणून देत आहे.
मुर्तीपुजन म्हणजे मागसलेपणाचे लक्षण आहे का?
http://mr.upakram.org/node/2061
मूर्तीपूजन म्हणजे मागासलेपणाचे लक्षण आहे कां? भाग - २
http://mr.upakram.org/node/2071
धर्म देवाने निर्माण केला काय?
http://mr.upakram.org/node/686
श्रद्धा-अंधश्रद्धा............ समालोचन !!
http://mr.upakram.org/node/1936
वैचारिक गोंधळ
http://mr.upakram.org/node/2077
नामस्मरणाची ताकद व चमत्कार.
http://mr.upakram.org/node/1892
गुरू.. एक कोडे
http://mr.upakram.org/node/2289
आता ज्यांना अंनिस ही धर्मविरोधी चळवळ आहे असे वाटते त्यांच्या साठी डॊ दाभोकरांनी लिहिलेला
गरज विवेकी ध्रर्मजागराची हा दैनिक सकाळ 30 आक्टोबर 2007 मधील लेख http://mr.upakram.org/node/805
आता आमच्या य.ना.वालावलकर या कठोर व जहाल निरिश्वरवादी जेष्ठ स्नेह्यांच्या या विषयावरील लेख
अंगारकी चतुर्थी
http://mr.upakram.org/node/3844
गॅस गणराज
http://mr.upakram.org/node/3941
गुरुविण कोण लावितो वाट
http://mr.upakram.org/node/3789
विवेकवाद अध्यात्म आणि आत्मघात
http://mr.upakram.org/node/3719
कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प
http://mr.upakram.org/node/3665
नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स १८९०)
http://mr.upakram.org/node/3645
त्या मोरयाची कृपा
http://mr.upakram.org/node/3597
महाकाव्याचा विषय
http://mr.upakram.org/node/3579
ज्ञानेश्वरील अकरा ओव्या
http://mr.upakram.org/node/3526
चालविली भिंती मृत्तिकेची
http://mr.upakram.org/node/3474
बुद्धीदाता
http://mr.upakram.org/node/3379
अध्यात्मिक प्रवचन
http://mr.upakram.org/node/3356
बिनडोकपणाचा कळस
http://mr.upakram.org/node/3362
देव धर्म आणि गाजरचित्रे
http://mr.upakram.org/node/3323
उदकी अभंग रक्षिले
http://mr.upakram.org/node/3313
अशी एक शक्यता केवळ तर्क
http://mr.upakram.org/node/3276
भयसूचक बातमी
http://mr.upakram.org/node/3216
चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश
http://mr.upakram.org/node/3161
ईश्वरे तृणे करुन रक्षण केले
http://mr.upakram.org/node/2928
यात आश्चर्य ते काय?
http://mr.upakram.org/node/2883
हा खेळ बाहुल्यांचा
http://mr.upakram.org/node/2820
गूढ आश्चर्यकारक अनुभव
http://mr.upakram.org/node/2525
कार्यकारण भाव
http://mr.upakram.org/node/2503
विवेकवादी लेखनावर आक्षेप
http://mr.upakram.org/node/2580
भ्रमाचा भोपळा
http://mr.upakram.org/node/2388
सामान्य समज (कॉमनसेन्स)
http://mr.upakram.org/node/2450
सदसद्विवेक बुद्धी
http://www.misalpav.com/node/17008
दैव जाणिले कुणी |
http://www.misalpav.com/node/17364
अस्तंगत होणार्या अंधश्रद्धा
http://www.misalpav.com/node/21383
शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |
http://www.misalpav.com/node/24886
अध्यात्म-विज्ञान समन्वय ?
http://www.misalpav.com/node/33424
मंत्रसामर्थ्य
http://www.misalpav.com/node/33686
भावना दुखावणे
http://www.misalpav.com/node/33757
माझी भूमिका
http://www.misalpav.com/node/33826
आस्तिक वैज्ञानिक
http://www.misalpav.com/node/33950
सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक
http://www.misalpav.com/node/34081
मरणकल्पना, आत्मा, पुनर्जन्म
http://www.misalpav.com/node/34344
श्री.जपे यांचा युक्तिवाद
http://www.misalpav.com/node/34727
विज्ञानदिनाच्या निमित्ताने
http://www.misalpav.com/node/35123
श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान
http://www.misalpav.com/node/41229
अठ्ठावीस लक्ष रुपये
http://www.misalpav.com/node/41400
आनंददायी इहलोक
http://www.misalpav.com/node/41497
श्रद्धेमुळे विकृती
http://www.misalpav.com/node/41567
भाव तेथे(च) देव:......यनावाला
http://www.misalpav.com/node/41667
मानवी ज्ञानभांडार
http://www.misalpav.com/node/41745
श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।.
http://www.misalpav.com/node/41821
विश्वास-श्रद्धा-निष्ठा: यनावाला
http://www.misalpav.com/node/41913
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...
http://www.misalpav.com/node/42032
मूलभूत नीतितत्त्वे
http://www.misalpav.com/node/42134
अपोलो कथा : इसरोच्या
अपोलो कथा : इसरोच्या संचालकांनी उड्डाणाच्या आधी देवदर्शन घेतले तेव्हा काही लोकांनी कुचेष्टा केली.. नाराजी व्यक्त केली त्यांच्या साठी..
अपोलो उड्डाणे करताना नासाने नियम केला होता कि हि मोहीम संपूर्ण मनुष्यजातीची प्रातिनिधिक मोहीम आहे त्यामुळे कुठल्याही एका धर्माचे, जातीचे, देवाचे स्तोम त्याच्या आणायचे नाही. एक संस्था म्हणून योग्यच निर्णय होता तो. pan sanstha शेवटी माणसांची बनलेली असते.. आणि त्यांच्या वैयक्तिक श्रद्धा असतात. अपोलो ११ चा आल्ड्रिन तसा सश्रद्ध माणूस.. मोहिमेच्या आधी त्याने ह्युस्टनच्या वेब्स्टर चर्च मध्ये जाऊन पेस्टर वूडरूफ यांचे आशीर्वाद घेतले. आपल्या पर्सनल बॅगेत त्याने कम्युनिअन साहित्य बरोबर घेतले होते. चंद्रावर पोचल्यावर त्याने यानातून उतरायच्या आधी देवाची प्रार्थना म्हणली. आणि मनोमन ख्रिस्ताला नमस्कार केला. नासाने त्याला फक्त एवढच सांगितलं होत कि "तुला काय करायचं te कर.. पण न बोलता कारण अंतराळवीरांचं संभाषण पृथ्वीवर थेट प्रसारित होतं. ( हे सगळं त्यानी स्वतः लिहून ठेवलंय!). तीच गोष्ट मिशन कंट्रोलची. जेमिनी उड्डाणांपासून प्रत्येक महत्वाच्या दिवशी कोणातरी अज्ञात व्यक्ती कडून ह्युस्टनला एक शुभेच्छांचा पुष्पगुच्छ यायचा. पुढे पुढे सगळे कंट्रोलर त्या बुकेची वाट बघायला लागले. त्यांच्या दृष्टीने तो एक शुभ संकेत होता. तो पुष्पगुच्छ समोरच्या मेन स्क्रिन च्या खाली ठेवला जायचा, अश्या करता कि तो TV कॅमेऱ्यातून पाठवणाऱ्या व्यक्तीला दिसावा.. एक प्रकारे हा त्या शुभचिंतकाचा आभार मानायचा प्रकार..
इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर घेताना माणूस कितीही मोठा असला तरी त्याला आधार हवा असतो. कुणी तो पूजेतून शोधेल तर कोणी पुष्पगुच्छातून..
त्यामुळे श्रद्धा या माणसापासून वेगळ्या करता येण कठीण आहे. मग तो भारतीय असो कि अमेरिकन.. आणि त्याला वाटेल त्या ठिकाणी व्यक्त करणं यात चूक काय?
समर्थांनी लिहूनच ठेवलंय.. "सामर्थ्य आहे चळवळीचे ".. ... त्याची शेवटची ओळ महत्वाची.. "परंतु तेथे परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे!!"
>>धाग्याच्या संबंधित सापडले म्हणून चिकटवले आहे. धन्यवाद.
धाग्याच्या संबंधित सापडले
धाग्याच्या संबंधित सापडले म्हणून चिकटवले आहे. धन्यवाद.>>>>>> मूळ संदर्भ ची लिंक हि द्या ना!
इस्रो प्रमुख बालाजीच्या पायाशी दरवेळी साकड घालतात. या बातमीवर मंगळयान आणि बालाजी ही चर्चा वाचावी. http://aisiakshare.com/node/2245
हे फेसबुक वर नाव आठवत नाही
हे फेसबुक वर नाव आठवत नाही त्यांनी अंतराळ प्रवासावर/ लिखाणावर खूप सुंदर लिहीलं आहे त्यांच्या वालवरुन घेतले आहे. नेमके मित्रयादीत नाहीत. सापडले की देतो लिंक. धन्यवाद.
धन्यवाद सर. आपण अगोदर
धन्यवाद सर. आपण अगोदर दिलेल्या लिंक बुकमार्क होत नाहीत. म्हणून निवडक १० मध्ये जतन केले आहे. दुवा सापडल्यावर विपू करतो.
प्रकाश सर कृपया विपू पहा.
प्रकाश सर कृपया विपू पहा. धन्यवाद.
धाग्याच्या विषयाशी थेट संबध
धाग्याच्या मुख्य विषयाशी थेट संबध नाही. पण लहानपणी "विज्ञानयुग" नावाचे मासिक खूप आवडीने वाचायचो. ज्या काळात ग्रामीण भागात टीव्ही सुद्धा आला नव्हता तेंव्हा संगणक ही फक्त कल्पना करण्याचीच गोष्ट होती. त्या काळात "संगणक कसा चालतो" अशा माहितीपूर्ण लेखापासून "घरच्या घरी विद्युत जनित्र बनवा" असे मुलांच्यात प्रयोगशीलता वाढीस लावणारे लेख या मासिकाने सातत्याने दिले. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, अणूविज्ञान, उत्क्रांती, अवकाश यान, वैश्विक घडामोडी अशा अनेकविध विषयांवर लिखाण असे. अगदी आतुरतेने या अंकाची वाट पाहिली जायची. नंतरच्या काळात हे मासिक बहुतेक बंद पडले. निरंजन घाटे सर नेहमी त्यात लिहित असंत. ना. वा. कोगेकर, वसंत कर्डिले, प्रभाकर सोवनी, रमेश के सहस्रबुद्धे हि अजून काही नावे आठवतात. त्यामुळे हि सगळी नावे वैज्ञानिक लिखाण करणारे लेखक म्हणूनच डोळ्यासमोर येतात.
अतुलजी, विज्ञान या विषयावर
अतुलजी, विज्ञान या विषयावर लेखन करणार्या लोकांची वाचकांमधे एक प्रतिमा असते. ती अर्थातच त्यांच्या साहित्यातून निर्माण झालेली असते. एखाद्या लेखकाविषयी आपण जे मत बनवतो ते त्याच्या लेखनातून. विज्ञानविषयक सातत्याने दीर्घकाळ लेखन करणारा माणूस हा अश्रद्ध, संशयवादी, बुद्धीप्रामाण्यवादी, विवेकी,नास्तिक, विचारवंत असा असला पाहिजे ही आपण आपल्या मनात प्रतिमा तयार करतो. मग त्या प्रतिमेला छेद देणारे एखादे दृष्य दिसते त्यावेळी आपला भ्रमनिरास होतो. क्रिकेट, सिनेमा, राजकारण यातील लोकप्रिय व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या मनातील त्यांच्या प्रतिमेशी सुसंगत वागत असतात तो पर्यंत आपण त्यांना डोक्यावर घेउन नाचतो. जेव्हा आपल्या अपेक्षेपेक्षा विसंगत वर्तन त्यांच्याकडून व्हायला लागते त्यावेळी आपण त्यांना पायदळी तुडवायला सुरवात करतो.त्याही व्यक्ती प्रथम प्राणि आहेत नंतर माणूस (होमो सेपीयन) आहेत व नंतर यशस्वी प्रथितयश लोकप्रिय वगैरे व्यक्तिमत्व आहेत हे आपण विसरुन जातो. निरंजन घाटे जेव्हा मित्राला शनिपाराच्या लाईनीत दिसले त्यावेळी त्याच्या मनातील निरंजन घाट्यांच्या प्रतिमेचे भंजन झाले. हा जसा एक भाग आहे तसा माणसांच्या दीर्घ आयुष्यात सुरवातीच्या टप्प्यात असलेली मते नंतरच्या टप्प्यात असतीलच असे नाही. मतांच्या छटा बदलत जातात. तोही प्रगल्भ होत असतो. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना! सुरवातीच्या काळात गॉड इज ट्र्थ असे म्हणणारे गांधीजी उत्तरार्धात ट्रुथ इज गॉड असे म्हणू लागले. आपले अलिकडेल मत ग्राह्य मानावे असेही त्यांनी लिहून ठेवले आहे. हे अर्थात प्रत्येकासाठी खरे आहे. थोरामोठ्यांची सिलेक्टिव्ह कोटेशन ही आपापल्या सोयीने घेणारे अनेक असतात. एकाच व्यक्तीची आपल्या सोयीची कोटेशन विरुद्ध विचारश्रेणीचे लोक घेत असतात. ती खरीही असतात. पण ही वक्त्व्ये कोणत्या परिस्थितीत कोणत्या कालखंडातील कोणत्या प्रसंगातील आहेत हे ते विसरतात किंवा माहित नसते. त्यामुळे अनेक महापुरुष देखील असे वेठीस धरले जातात. समाजकारणात, राजकारणात या गोष्टी चालूच असतात. कधी बुद्धीभेदासाठी तर कधी प्रबोधनासाठी याचा चातुर्यांने वापर केला जातो.
प्रबोधन काही वेळा आंजारुन गोंजारुन करावे लागते तर काही वेळा काही लोक प्रहार करुन.प्रबोधन करतात. ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाच्या परिक्षणात जयंत नारळीकर म्हणतात," 'फलज्योतिष ही एक अंधश्रद्धा आहे' हे समजावून सांगायला लागणे आणि तेही निरक्षरांना नव्हे तर डिग्री विभूषितांना, उच्चपद्स्थांना, समाजधुरिणांनादेखील, इथेच खरी शोकांतिका आहे. अशा वेळी तुम्ही अंधश्रद्ध आहात, फसव्या विचारसरणी मागे धावून आपले हसे करुन घेत आहात.' वगैरे आक्रमक प्रचार योग्य ठरत नाही. लहानपणी सूर्य आणि वार्याच्य़ा चढाओढीची गोष्ट वाचली होती, त्याचा प्रत्यय येथे येतो. वारा आणि सूर्य दोघांपैकी कोण एका पादचार्याचा कोट त्याच्या अंगावरुन काढून दाखवेल, अशी स्पर्धा होती. वारा वेगाने वाहू लागला, तसे पादचा-याने कोट आवळून धरला. अखेर वाराच थकला. मग सूर्य पुढे आला. त्याने संथपणे प्रकाशणे चालू ठेवले आणि काही वेळाने पादचार्याने फार उकडायला लागले, म्हणून कोट काढला.आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळुन धरला जातो. पण त्या व्यक्तिला सौम्य शब्दात पटवून दिले आणि त्याने स्वत:हून तो कोट काढून फेकून दिला तर ते जास्त प्रभावी ठरणार नाही का? घाटपांडे यांचा मार्ग वार्याचा नसुन सूर्याचा आहे."
अतिशय छान दाखला देत समजावून
अतिशय छान दाखला देत समजावून सांगितले आहे. धन्यवाद.
लेख समजला नाही.
लेख समजला नाही.
सुरवातीच्या काळात गॉड इज
सुरवातीच्या काळात गॉड इज ट्र्थ असे म्हणणारे गांधीजी उत्तरार्धात ट्रुथ इज गॉड असे म्हणू लागले. आपले अलिकडेल मत ग्राह्य मानावे असेही त्यांनी लिहून ठेवले आहे. हे अर्थात प्रत्येकासाठी खरे आहे. थोरामोठ्यांची सिलेक्टिव्ह कोटेशन ही आपापल्या सोयीने घेणारे अनेक असतात. एकाच व्यक्तीची आपल्या सोयीची कोटेशन विरुद्ध विचारश्रेणीचे लोक घेत असतात. ती खरीही असतात. पण ही वक्त्व्ये कोणत्या परिस्थितीत कोणत्या कालखंडातील कोणत्या प्रसंगातील आहेत हे ते विसरतात किंवा माहित नसते. त्यामुळे अनेक महापुरुष देखील असे वेठीस धरले जातात. समाजकारणात, राजकारणात या गोष्टी चालूच असतात. कधी बुद्धीभेदासाठी तर कधी प्रबोधनासाठी याचा चातुर्यांने वापर केला जातो.
प्रबोधन काही वेळा आंजारुन गोंजारुन करावे लागते तर काही वेळा काही लोक प्रहार करुन.प्रबोधन करतात.
अतिशय सुरेख दाखला देऊन समजऊन सांगितले आहे आणि मला ते १०० टक्के मान्य ही आहे. माझा गोंधळ आहे तो वेगळ्याच बाबतीत.
हा गोंधळ निरंजन घाटे या व्यक्ती/लेखकाबद्दल आहे असे नसून या प्रवृत्तीबद्दल आहे.
माणसाच्या विकासाचे टप्पे असतात. आणि माणसाने काही विधाने कोणत्या टप्प्यावर केली, का केली ते तपासावे लागते. अन्यथा त्याच्या म्हणण्याचा वेगळा अर्थ निघु शकतो. खुद्द गांधींना वयाची पन्नाशी उलटेपर्यंत इंग्रजांचे राज्य हे ईश्वरी आशीर्वाद वाटत असे. त्यानंतर त्यांना ते राज्य सैतानी वाटु लागले. त्यामुळे गांधींचे आधीचे विधान सोयीस्कर्रित्या घेऊन त्यांना बडविण्यात अर्थ नाही हे मला ठावूक आहे.
पण गांधी समतेच्या बाजूने होते. त्यामुळे त्यांनी शिष्यवृत्तीसाठी आपल्या मुलाला निवडले नाही. ती दुसर्या कुणाला तरी देऊ केली. जर मुलाला दिली असती तर त्यांच्यावर फेवरीटीझम चा आरोप झाला असता. त्यांची समतेवर श्रद्धा होती त्याप्रमाणे ते वागले. जर त्यांनी ती शिष्यवृत्ती मुलाला देऊ केली असती तर? कारण गांधी म्हणत Be the change that you wish to see in the world. तुम्ही आपल्या म्हणण्यात गांधींचे उदाहरण दिले आहे म्हणून मीही त्यांचेच उदाहरण दिले.
उक्ती आणि कृती यात फरक दिसल्यास त्या माणसाचे म्हणणे कितपत गांभीर्याने घ्यावे असा माझा प्रश्न आहे. त्याचे उत्तर अजुनही मिळालेले नाही. या उक्ती आणि कृतीतला फरक कालखंडातला फरक असला तर एकवे़ळ समजून घेता येईल. कारण तरुणपणातले विचार पुढे बदलले असे म्हणता येईल. पण तो माणुस सकाळी पुस्तकात लिहितोय एक आणि दुपारी प्रत्यक्ष आयुष्यात वागतोय भलतेच असा प्रकार असला तर काय समजायचं? शिवाय विज्ञाननिष्ठा सांगणार्याने समजा आयुष्याच्या उत्तरकाळात ज्योतिष पाहायला सुरुवात केली तर त्याला प्रगती समजायची कि अधोगती? कि विचाराची परिपक्वता? वय वाढलं म्हणजे वाढलेल्या वयातील विचार परिपक्वच असतात असं कुठे आहे?
म्हणूनच म्हटले असावे साठी
म्हणूनच म्हटले असावे साठी बुद्धी नाठी.![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
१. प्रचिती आली कि आपोआपच
१. प्रचिती आली कि आपोआपच अंधश्रद्धा नामशेष होइल. औषधांची परिणामकारकता उघड दिसल्यावर मंत्र - तंत्र मागे पडणारच.
२. पण काही वेळा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेषा फार धूसर होते. "प्रकाषवाटा" मधे एके ठिकाणी हे खूप सुंदरपणे विषद केले आहे. साप चावलेला माणूस समोर आहे पण औषध पोहोचे पर्यंत ३-४ तास आहेत ... आता या माणसाला मानसिक धैर्य मिळण्यासाठी मंत्र म्हंटले तर ती अंधश्रद्धा कशी ठरेल ?
३. काही वेळा शास्त्राने शोधलेले काही पदार्थ उपयोगापेक्षा हानी जास्त पोहोचवतात हे वारंवार सिद्ध झाले आहे जसे की प्लास्टिक , रासायनिक खते , रिफाइंड तेले , वनस्पती तूप इ. अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे विज्ञानाने दा़खवले ते खरेच "सत्य" आहे कि नाही हे कळेपर्यंत आधीचे सत्य सरसकटपणे अंधश्रद्धा म्हणणे धोकादायक आहे.
अंधश्रद्धा व मेंदुविज्ञान या
अंधश्रद्धा व मेंदुविज्ञान या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरणात अंधश्रद्धा का टिकून आहेत यावर भाष्य केले आहे. https://www.maayboli.com/node/66486
काही वेळा शास्त्राने शोधलेले
काही वेळा शास्त्राने शोधलेले काही पदार्थ उपयोगापेक्षा हानी जास्त पोहोचवतात हे वारंवार सिद्ध झाले आहे जसे की प्लास्टिक , रासायनिक खते , रिफाइंड तेले , वनस्पती तूप इ. अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे विज्ञानाने दा़खवले ते खरेच "सत्य" आहे कि नाही हे कळेपर्यंत आधीचे सत्य सरसकटपणे अंधश्रद्धा म्हणणे धोकादायक आहे.
>> पशुपत जी विज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेल्या वस्तू या त्यांच्या वापरानुसार उपयुक्त किंवा हानीकारक ठरतात. उदा. डायनामाईट सारखी स्फोटकं, उपग्रह, तणनाशके वगैरे. अंधश्रद्धेच्या बाबतीत प्रयोग करून काहीही सिद्ध केलेले नसते तर केवळ चालत आलेली प्रथा, परंपरा एवढेच कारण असते. शिवाय भितीपोटी , लोकलाजेखातर अनेक प्रकार घडतात. असे मला वाटते.
४ तास आहेत ... आता या माणसाला
४ तास आहेत ... आता या माणसाला मानसिक धैर्य मिळण्यासाठी मंत्र म्हंटले तर ती अंधश्रद्धा कशी ठरेल
>> मंत्र म्हणणे हे फक्त ज्याला मांत्रिक मानला आहे व तो सापाचे विष उतरवण्याचा दावा करतो तोच अशा घटनेवेळी मंत्र म्हणत असतो. जर औषध मिळणारच आहे तर सोबतीच्या लोकांनी स्तोत्र म्हणत, देवाचे नाव घेतले तरी साप चाललेल्या माणसाला धीर मिळू शकेल.
चुकून बिनविषारी साप चावला असेल आणि वैद्यकीय मदत नाही मिळाली व मनुष्य जिवंत राहिला तर क्रेडिट मांत्रिकाला मिळेल. नंतर मांत्रिकावर विश्वास बसून त्यालाच अशा घटनेवेळी बोलावलं जाईल.
प्लास्टिक, खते, तेले
प्लास्टिक, खते, तेले उपायापेक्षा हानी पोहोचवतात???? आज हे तिन्ही शोध लागले म्हणून तुम्ही आम्ही आहोत. अन्यथा मानवी प्रगती अशक्य होती.
>>उक्ती आणि कृती यात फरक दिसल्यास त्या माणसाचे म्हणणे कितपत गांभीर्याने घ्यावे असा माझा प्रश्न आहे.>> खरं आहे. पण माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात तो/ ती काय करते ते फार बघायला जावू नये. पर्सनल स्पेस मध्ये त्याला काय हवे ते करू द्यावे. आपण अॅनेकडॉट वरुन सामान्यिकरण करण्याचा ही धोका असतोच. मनुष्य बुवाबाजीच्या मागे लागण्याचे जे मानसशास्त्रिय कारण आहे तीच मानसशास्त्रीय स्थिती एखाद्यावेळी रॅशनल व्यक्तीची होऊ शकते, आणि म्हणुनच कोणी एक व्यक्ती म्हणतोय म्हणून त्यावर विश्वास ठेवू नये तर आपल्या बुद्धीवर घासुन पटलंप्तर अंगिकारावे.
याच न्यायाने डॉ. ने आजारासाठी काही पथ्य सांगितले आणि स्वतः कुपथ्य केले तर आपण पण ते पथ्य सोडायचे/ विश्वास ठेवायचा नाही का? अशी यादी वाढवता येईल.
उक्ती आणि कृती यात फरक
उक्ती आणि कृती यात फरक दिसल्यास त्या माणसाचे म्हणणे कितपत गांभीर्याने घ्यावे असा माझा प्रश्न आहे. त्याचे उत्तर अजुनही मिळालेले नाही. >>>>>बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले ही म्हण आपल्याला माहित आहे. पाउले वंदावी अशी माणसे फार कमी असतात. ओठात एक पोटात एक ही म्हण दांभिकता,स्वार्थ,लबाडी दर्शवण्यासाठी वापरतात. म्हणजे उक्ती आणी कृती यात फरक दिसला कि त्याला काळ्या यादीत टाकले जाते.आपण बोलतो एक करतो एक असे प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असत. भरपेट जेवल्यानंतर पोटावर हात फिरवत शहाण्याने जेवू नये असे म्हणणारे लोक आपण पहातो.भुकेपेक्षा चार घास कमी खावे हे तत्व त्यांना सांगायचे असते व मान्यही असते पण अन्नपदार्थावर ताव मारण्याचा मोहापासून ते स्वत:ला रोखू शकत नाहीत. स्वत:ला पटत नसलेल्या अनेक गोष्टी आपण तडजोड म्हणून करत असतो. कधी ज्या समाजात राहयचे असते त्यापासून तुटून पडू नये म्हणून, कधी कुटुंबाच्या सुखासाठी, कधी व्यावहारिक सोयी साठी. एक मन विचार करते तर दुसरे मन भावनेच्या आहारी जाते. अशा वेळी मेंदु सोयीस्कर निर्णय घेत असताना तो भावनेच्या आहारी बर्याचदा जातो. कधी संघर्षाची ताकद संपली असते. असहाय्य असतो. कधी अस्तित्वाची लढाई असते. लोक काय म्हणतील या पेक्षा अस्तित्व टिकवणे महत्वाचे असते. अस्तित्व ही जैविक प्रेरणा आहे ते टिकवण्यासाठी मेंदु काही निर्णय चक्क तुमच्या नकळत घेत असतो. एक प्रकारची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणा ना! fight or flight रिस्पॊन्स मधे मेंदु असे निर्णय घेत असतो. पुढे हा प्रश्न Does free will really exists पर्यंत जाउ शकतो. समाजधुरीणांवर आपण आदर्शवादाचे आरोपण करत असतो. त्याच ओझ त्यांनाही होत असत.समाजाच्या नजरेतुन आपण उतरले जाउ हे भय. त्यांचा तुज आहे तुजपाशी मधला आचार्य होतो. वर आपण विचारांमधे होणार्या बदलामुळे कृतीतील बदल पाहिला. वाल्याचा वाल्मि्की हा बदल रामायणातल्या कथांमधे दिसतो. प्रत्यक्ष अवती भवती पण दिसतो.बदल हा निसर्गाचा नियम आहे.थोडक्यात उक्ती व कृती यातील फरक हा प्रत्येकवेळी दांभिक,लबाडी,स्वार्थ असा नसतो. शिवाय व्यक्ती तितक्या प्रकृती आहेच.
<<पशुपत जी विज्ञानाच्या
<<पशुपत जी विज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेल्या वस्तू या त्यांच्या वापरानुसार उपयुक्त किंवा हानीकारक ठरतात. उदा. डायनामाईट सारखी स्फोटकं, उपग्रह, तणनाशके वगैरे. >>
हेच नेमके श्रद्धेच्या संदर्भात घडणे बरोबर नाही का ? श्रद्धेचा उपयोग मनोधैर्य वाढवणे , पॉसिटिव वातावरण तयार करणे यासाठी वापरले तर ते उपयोगाचेच नव्हे का ! पळण्याच्या शर्यतीत नेहमी दुसरा येणारा मुलगा , फक्त आज आई स्पर्धा पहायला आली या आनंदाच्या जोषात आज पहिला आला तर ते त्या माउलीच्या उपस्थितीमुळेच घडले नाही का ? ही श्रद्धा च तर विस्मय्कारक घटना घडायला कारणीबूत होउ शकते!!!
विचार करा या द्रुष्टीकोनातून.
<<अंधश्रद्धेच्या बाबतीत प्रयोग करून काहीही सिद्ध केलेले नसते तर केवळ चालत आलेली प्रथा, परंपरा एवढेच कारण असते. शिवाय भितीपोटी , लोकलाजेखातर अनेक प्रकार घडतात. असे मला वाटते.>> मुद्दा १ मधे मी म्हंटलेच आहे की प्रचीती येइल तशा चुकीच्या श्र्द्धा विसरल्या जातीलच.
विज्ञान आणि वैज्ञानिक
विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांत फरक आहे.
एखाद्याने विज्ञानकथा लिहिल्या, विज्ञाना तल्या संकल्पना सोप्या करून वाचकांसमोर मांडल्या म्हणजे तो विज्ञानवादी असेलच असं नाही.
साप चावलेल्या माणसाला वैद्यकोपचार मिळेतो मंत्र म्हणून त्याचा धीर कायम ठेवणं , हे तिथवरच राहील का? उदया त्या मंत्रामुळेच तो वाचला, असा दावा केला जाईल. मेला, तर तुझं गेल्या नाहीतर या जन्मातलं पाप अशी पुरवणी जोडली जाईल.
यापेक्षा बहुसंख्य साप बिनविषारी असतात, विषारी सापाचा दंश कसा ओळखावा, प्राथमिक उपचार काय करावेत या माहितीचा प्रसार करणं क योग्य आहे.
हार्ट अॅटॅक आल्यावर विठ्ठल विठ्ठल असा जप केल्याने तो टळतो, असा दावा करणार्यांनी स्वतः वर किंवा जवळच्यांवर ती वेळ आ ल्यावर फक्त हाच उपाय करावा.
भरत सहमत.
भरत सहमत.
पशुपत जी माझ्या मताप्रमाणे माणूस हा सुरूवातीला जंगली प्राणी होता व त्याच्या जीवाला वन्य हिंस्त्र प्राणी, साप, पूर, वीज,आग यापासून धोका होता व त्याला काही गोष्टी का होतात याचे कारण कळत नव्हते, जसं शरीराचे निरनिराळे आजार. पुढे प्रगत झाल्यावर पशुधन आजाराला बळी पडणे,पटकी, कॉलरा , हृदयघात वगैरे याचा संबंध तो निसर्गाच्या कोपाशी, करणी वगैरे जादूटोणा याच्याशी लावू लागला. अतिप्रगत झाल्यावर बऱ्याच घटनांचा नेमके कारण कळालं. पण सुरुवातीला त्याच्या मनात भिती होती व त्यासाठी त्याने देव तयार करून आसरा घेतला. नागपुजन वगैरे. पण विज्ञान युगात देखिल माणसाची भिती जेनेटिक मेमरी सारखी कंटिन्यू झाली आहे.
शास्त्रात एक कॅटॅलिस्ट नावाची
भरत जी
शास्त्रात एक कॅटॅलिस्ट नावाची भूमिका वठवणारे लोक असतात जे प्रत्यक्ष प्रक्रियेत भाग न घेता प्रक्रिया पटकन घडवून आणायला कारणीभूत असतात. श्रद्धेचा वापर हा त्याप्रमाणे करणे अपेक्षित आहे.
वैद्यकीय मदत मिळेपर्यंत(तिचे स्थान पहिलेच असायला हवे) विठ्ठल नामाचा जप करणे अपेक्षित आहे.
आणि मंत्रामुळे सर्पदंष बरा होतो हे म्हणणे जसे चुकीचे आहे तसेच औषध मिळेपर्यंत मनोधैर्य मंत्राने टिकले आणि माणूसही टिकला हे म्हणण्यात कोणता कमीपणा?
शशिकांतजी ; देव ही संकल्पनाच
शशिकांतजी ; देव ही संकल्पनाच मुळी भीती आणि असहायता यातून उत्पन्न झाली.
जसे जसे ज्ञान मिळत जाते तसे तसे श्रद्धांचे स्थान आणि महत्व बदलत जाते.
मंत्र म्हटल्याने माणूस टिकला
मंत्र म्हटल्याने माणूस टिकला याला पुरावा काय?
मंत्र म्हटला नसता तर माणूस टिकला नसताच का?
मंत्र म्हणूनही माणूस टिकला नाही तर काय?
<वैद्यकीय मदत मिळेपर्यंत(तिचे स्थान पहिलेच असायला हवे) विठ्ठल नामाचा जप करणे अपेक्षित आहे.>
पण सांगणार काय? विठ्ठल नामाचा जप केल्याने अमका तमका वाचला. आणि याचं शास्त्रीय वाटेल असं कारणही देणार.
मी तर बाबा, सुयोग्य वैद्यकीय
मी तर बाबा, सुयोग्य वैद्यकीय मदत मिळावी या करता देवाचा धावा करतो.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सगळं रँडम ली होत असताना आपल्या वाट्याला सुयोग्य वैद्यकीय ज्ञान असलेली व्यक्ती यावी तिला आपले निदान नीट पणे व्हावे म्हणून देवाची प्रार्थना केल्यामुळे मला आजवर चांगले उपचार मिळाले असावे अशी माझी धारणा आहे.
हर्पेनजी राईट्ट बोललात बघा.
हर्पेनजी राईट्ट बोललात बघा.
<<पण सांगणार काय? विठ्ठल
<<पण सांगणार काय? विठ्ठल नामाचा जप केल्याने अमका तमका वाचला. आणि याचं शास्त्रीय वाटेल असं कारणही देणार.>>नाही हो भरत. माणसाचा विकार वैद्यकीय उपचारांनीच बरा होतो. पण मदत मिळे पर्यंत मनोबल वाढवण्याशाठी हे सगळे आहे हो !
जेव्हा विज्ञानाला माहित असलेले करून झाले आहे आणि आता अपेक्षित घटना घडण्याची वाट पहाणे या पलिकडे करण्यासारखे हातात काही नाही तेव्हा श्रद्धा मन शांत ठेवायला उप्युक्त ठरते.
हर्पेन , सहमत आहे तुमच्याशी !
हर्पेन , सहमत आहे तुमच्याशी !
मन शांत ठेवायला श्रद्धेच्या
मन शांत ठेवायला श्रद्धेच्या कुबड्याच लागतील अशी व्यवस्था करणं म्हणजे मन दुबळं ठेवणं.
Pages