उपवासाचा शिरा खास आषाढी एकादशीनिमित्त by Namrata's CookBook :९

Submitted by Namokar on 11 July, 2019 - 04:14
upwasacha -shira
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी निवडलेली वरई/भगर
१ वाटी साखर
तूप
केळी
चारोळ्या ,काजू ,बदाम
वेलची पूड
मीठ
दूध(३००मि.)
U1 (1).png

क्रमवार पाककृती: 

कृती :
१. वरई/ भगर धुऊन चाळणीत पाणी निथळायला ठेवा
२. दूध गरम करायला ठेवा
३. कढईत ३ चमचे तूप घ्या ,तूप गरम होत आलेकी त्यामध्ये वरई/ भगर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या.
U1 (4).pngU1 (3).png
४. तापवलेलया दूधातलं आर्ध दूध वरईवर/भगरीवर घाला.
U2 (1).png
५. आता यामध्ये चिमूटभर मीठ घालून एकत्र करुन घ्या.
६. हे मिश्रण दाटसर होऊ लागल्यावर उरलेले दूध घाला.
U2 (8).png
७. वरई/भगर थोडी शिजत आलीकी त्यामध्ये साखर, चारोळ्या , काजू , बदाम , वेलची पूड घलून परतून घ्या
U2 (5).png
८. केळीचे पातळ काप करुन त्यात घाला.लागेल तसे तूप पुन्हा घालून मिश्रण एकत्र करुन घ्या
U2 (4).pngU2 (2).png
९. एक वाफ आल्यावर मस्त गरमा गरम शिरा संपवा.
SAVE_20190711_103631.jpg

अधिक टिपा: 

*तूप, साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करु शकता
*ही भगर/वरई मिक्सर मध्ये बारीक करुनसुद्धा शिर करण्यासठी वापरु शकतो
पाककृतीचा पूर्ण व्हिडिओ :
https://youtu.be/zWoSjJp5XH8

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

सही ! नम्रता तुमच्या रेसेपीज व करण्याची पद्धत लाजवाब आहे. माझ्या साबा भगर थोडी मिक्सरमध्ये फिरवुनच नेहेमीसारखा शिरा करतात.

धन्यवाद रश्मी.. , BLACKCAT , देवकी ,Amupari,भावना गोवेकर, किल्ली , मन्या ऽ , झंपी
खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे .. __/\__
असे प्रतिसाद वाचून अजून पॉझिटीव्ह एनर्जी मिळते .
धन्यवाद Happy

छान वाटतोय शिरा .नक्की ट्राय करुन बघते.>>>>>>+१
तुमचं सादरीकरण खूपच छान असतं. @झंपी ची रेसिपी पण आवडली. करुन बघायला पाहीजे.