हा नेहेमी केला जाणारा प्रकार आहे. पण साबा जरा जाड किसाचा करतात ते पाहून स्पे. मोठ्या भोकाची किसणी आणून केला. त्याची ही कृती.
प्रमाण तीन लोकांकरता.
७-८ मध्यम आकाराचे बटाटे
वाटीभर खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा जरा जाडसर कूट (थोडा कमीजास्त लागू शकेल)
हवं असेल तर लाल तिखट
तिखटपणा जसा हवा असेल त्यानुसार हिरव्या मिरच्या
मीठ, साखर, जिरं आणि शेंगदाण्याचं तेल किंवा साजुक तूप
बटाटे सालासकट स्वच्छ धूवून मोठ्या भोकाच्या किसणीनं किसून घ्यावेत. हा कीस दोनदा पाण्यानी स्वच्छ धूवून रोवळीत किंवा मोठ्या गाळण्यात निथळत ठेवावा. फोडणीत पडण्याआधी किसातलं पाणी पूर्णपणे निघून जायला हवंय.
मोठ्या (म्हणजे कीस परतायला पातेल्याची उंची, रूंदी बरी पडते) जाड बुडाच्या पातेल्यात (पितळी वगैरे असेल तर उत्तमच. लोखंडी कढई, भांड इथे वापरायचं नाहीय) जरा दमदमीत तेल किंवा तूप तापवून जिरं, मिरची घालून फोडणी करावी वर कीस घालावा. मोठ्याच आचेवर चांगले २/४ मिनिटं लांब दांड्याच्या सरात्यानं किंवा झार्यानं कीस परतावा.
तेल सगळं नीट माखलं की वर झाकण घालून १० मिनिटं वाफवावा. मध्ये एकदोनदा हलवायला लागेल. ८०% झाला की यात चवीनुसार मीठ, साखर आणि कोरडसर होईल इतपत दाण्याचं कूट घालून नीट हलवून घ्यावं. झाकण घालून अजून एक पाच मिनिटं वाफ द्यावी. बटाट्याचा खमंग कीस गरमागरमच खायला घ्यावा, सोबत साधं दही घ्यावं. सुरेख लागतं.
- मोठं भांडं + लांब सराता/ झारा मुद्दामच लिहिलाय कारण लहान चमचा वगेइरे असेल तर कीस नीट एकसारखा मिसळता येत नाही
- जरा भांड्याच्या तळाला लागलेला कीस (खरपुडी) फारच उत्तम लागतो
- लाल तिखट वापरणार असाल तर फोडणीतच घालायचं आहे
- लोखंडी कढई, भांडं वापरू नका. तयार कीस फारच काळपट होतो.
- वर लिंबाचा रस ही घालता येइल. त्याचीही सुरेख चव येते.
इथे अजून एक कृती आहे - वेकापा -१ : बटाट्याचा कीस
पण आई वर्षभराचा कीस वाळवण
पण आई वर्षभराचा कीस वाळवण करून ठेवायचीना डबे भरून त्याचा जास्त व्हायचा. >> आमच्याकडे पण ! तो आणी वाळवलेले वेफर्स, वाळवलेला साबुदाणा तळुन , दाणे घालुन चिवडा ( फक्त तुपात तळल्याने गरमच आवडायचा मला)
वाळव्णात ते बटाट्याचा कीस
वाळव्णात ते बटाट्याचा कीस हे एक मेजर प्रकरण होते.
असाच रताळ्याचा कीस पण होतो. सेम सेम रेसीपी.
बटाटा किसला की तो किस पाण्यात
बटाटा किसला की तो किस पाण्यात ५ मिनिटे ठेवावा. किस गाळून घेउन ते पाणी तसेच ठेवावे. त्यात बटाट्याचा स्टार्च जमा होतो. वरचे पाणी हळूच टाकून देऊन या सत्वाची खीर बनवता येते. हे सत्व उष्णतेच्या विकारांवर लाभदायी आहे. लगेच वापारायचा नसेल तर वरचे पाणी फेकुन सत्व वाळवून हवे तेव्हा वापरता येते.
>>Can we use potato instead?<
>>Can we use potato instead?<< YES, we can certainly use, but you have to check/find out whether Potato is OK for variety of fasts, we Hindus follow !! Another thing, just check with the calories of Potatoes you use...
आमचा बटाटा खाताना आम्ही फारसा उष्मांकांचा विचार नाही करत, but If at all you are going to use Potato/es, then one has to think about calories !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
>>> निघून जातो आणि कीस मोकळा,
>>> निघून जातो आणि कीस मोकळा, सुटा होतो.
Submitted by योकु on 16 July, 2019 - 18:31 >>> धन्यवाद!
>> वरचे पाणी हळूच टाकून देऊन या सत्वाची खीर बनवता येते.
Submitted by साक्षी on 18 July, 2019 - 02:47 >>> हायला! हे असे पण असते का?! काय रेसिपी? माहितीबद्दल धन्यवाद!
हायला! हे असे पण असते का?!
हायला! हे असे पण असते का?! काय रेसिपी? माहितीबद्दल धन्यवाद!>>
ह्या जमा झालेल्या सत्वात पुन्हा थोडे स्वच्छ पाणी घालून शिजवायला ठेवायचा. गुठळी होऊ नये म्हणून सतत ढवळायचे. थोड्या वेळात सत्व शिजतं. घट्ट होत जाते आणि पारदर्शक रंग येतो. आता हवं तितकं दूध आणि साखर घालून पुन्हा एक उकळी येउ द्यायची.
बटाटा किसला की तो किस पाण्यात
बटाटा किसला की तो किस पाण्यात ५ मिनिटे ठेवावा. किस गाळून घेउन ते पाणी तसेच ठेवावे. त्यात बटाट्याचा स्टार्च जमा होतो. वरचे पाणी हळूच टाकून देऊन या सत्वाची खीर बनवता येते.
>> साक्षी जी समजा हा कीस पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून पाण्यात ठेवला व गाळून चोथा बाजूला केला तर सत्व जास्त प्रमाणात मिळेल काय.
बटाटे भिजवुन/ धुवुन काढलेल्या
बटाटे भिजवुन/ धुवुन काढलेल्या पाण्यातंन काय सत्व मिळतात?
साक्षी जी समजा हा कीस पाणी
साक्षी जी समजा हा कीस पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून पाण्यात ठेवला व गाळून चोथा बाजूला केला तर सत्व जास्त प्रमाणात मिळेल काय.>>
माझं उत्तर हो आहे. बटाट्याच्या भाजीसाठी फोडी करुन पाण्यात ठेवल्या तर खाली जमा होणारे सत्व आणि तोच बटाटा किसून पाण्यात ठवला तर जमा होणारे सत्व ह्यात नक्कीच फरक असतो. किसून जास्त सत्व बाहेर पडणार कारण बटाट्याचा जास्त भाग एक्सपोज झाला. करून बघा.
छान रेसीपी आहे. परवा एका
छान रेसीपी आहे. परवा एका खेडेगावातून येताना रताळी आणली आहेत. त्याचा असा स्पायसी किस करून बघणार.
रताळ्याचा किस पण पाण्यातून काढून स्टार्च धुवून काढावा लागेल का? की पांचट बेचव होईल?
मी तरी रताळी धुवून, किसून
मी तरी रताळी धुवून, किसून तसाच कीस परतते.
आभारी आहे, राजसी. पण तो
आभारी आहे, राजसी. पण तो जास्तीचा स्टार्च धुण्याची टीप मला आवडली होती, फक्त किस पांचट होईल का अशी शंका वाटली.
रताळे करताना शेंगदाणे जाड
रताळे करताना शेंगदाणे जाड भरडून वापरा, एकदम कूट नको
नाही होत पांचट. पिळून घ्यायला
नाही होत पांचट. पिळून घ्यायला हवा रताळ्याचा कीस. छानच लागतो तोही.
करून झाला. आज सकाळी
करून झाला. आज सकाळी ब्रेकफास्टसाठी बनवला होता. वाईट नव्हता पण विशेष आवडला सुद्धा नाही. बटाट्याचाच जास्त चांगला लागला असता.
रताळं मुळात जरा गोडीळ असतं
रताळं मुळात जरा गोडीळ असतं असं मला वाटतं त्यामुळे त्याला बटाट्यासारखा खमंगपणा मुळात नसतो.
जरा जास्त नटवून करून पाहायला हव...
<< करून झाला. आज सकाळी
<< करून झाला. आज सकाळी ब्रेकफास्टसाठी बनवला होता. वाईट नव्हता पण विशेष आवडला सुद्धा नाही.
ओह, आमच्या घरी वर्षानूवर्षे बनतोय. रताळ्याचा कीस त्यातल्या गोडूस चवीमुळे बटाट्याच्या किसापेक्षा मस्त लागतो. भरपूर दाण्याचं कूट, हिरव्या मिरच्या घालून अफलातून लागतो.
योकु, अगदी बरोबर. गोड
योकु, अगदी बरोबर. गोड चवीमुळेच आवडलं नाही.
संपदा, मी पण जिरे-हिरवी मिरचीच्या फोडणीत आणि दाण्याचं कूट घालूनच केला होता. पण रताळी जास्तच गोड असावीत. कदाचित रताळ्याचे गोड काप जास्त छान झाले असते. ( माझी आजी करायची, साजूक तूप आणि पिठी साखर घालून)
आजी करायची, साजूक तूप आणि
आजी करायची, साजूक तूप आणि पिठी साखर घालून,>>>>>> नॉनस्टीक panvar थोडेसे तूप घालून रताळ्याचे गोल काप शिजवायचे.नंतर गूळ घालायचा.मस्त लागतात.गूळ वितळला पाहिजे.
देवकी, ही टीप मस्तच आहे. आता
देवकी, ही टीप मस्तच आहे. आता शेवटचं एकच रताळ उरलं आहे, त्याचं असंच करते. ( मला जेवल्यानंतरची 'एक घास गोडाचा' वाली क्रेविंगज येतात, तेव्हा हे खायला आवडेल )
आमच्या घरी वर्षानूवर्षे बनतोय
आमच्या घरी वर्षानूवर्षे बनतोय. रताळ्याचा कीस त्यातल्या गोडूस चवीमुळे बटाट्याच्या किसापेक्षा मस्त लागतो. --- +1
रताळी भरपूर पौष्टीक असतात.
ओह, आमच्या घरी वर्षानूवर्षे
ओह, आमच्या घरी वर्षानूवर्षे बनतोय. रताळ्याचा कीस त्यातल्या गोडूस चवीमुळे बटाट्याच्या किसापेक्षा मस्त लागतो. भरपूर दाण्याचं कूट, हिरव्या मिरच्या घालून अफलातून लागतो.>>>++१ मी थोडासा गुळ पण घालते, खरपूस परतलेला कीस मस्त च लागतो.
रताळ्याचा़ कीस मीठाच्या
रताळ्याचा़ कीस मीठाच्या पाण्यात घालून थोडासा सावलीत वाळवायचा. मग शुद्ध तुपात लवंग वेलची वर परतायचा. गरम असतानच वरून जरासाच किसलेला गुळ आणि बुचकाभर ओले खोबरे, काजू, बेदाणे घालून वाढायचा. गिचका होत नाही ह्या पद्धतीने.
आता काही सुग्रणी ( आमच्यासारख्या) गिचका करतातच, तेव्हा गिचका झालाच तर रताळा कचोरी बनवायची हाच गोळा करून आरारूटमध्ये घोळवून तुपात तळून. आणि विठठल विठठल करत झोपा काढायच्या.
आमची आषाढी एकादशी अशी साजरी व्हायची बाकी पदार्थाबरोबर.
मला आवडत नाही बटाटाच्या किस.
मला आवडत नाही बटाटाच्या किस. पण योकुने लिहीलेली कृती मस्त आहे, त्यात सायो यांच्या फोटोची भर पडली. फोटो एकदम प्रोफेशनल आलाय.
साक्षी, हो माझी आई पण बटाट्याच्या या उरलेल्या सत्वाची ( स्टार्च ) खीर करते. याला तवकील पण म्हणतात. मात्र बटाटे आधी स्वच्छ धुऊन घ्यावेत.
याच स्टार्च मध्ये भिजवलेला साबुदाणा घालुन ते शिजवुन त्याच्या पापड्या कराव्यात, मस्त खुसखुशीत व हलक्या होतात.
रताळे करताना शेंगदाणे जाड
रताळे करताना शेंगदाणे जाड भरडून वापरा, एकदम कूट नको>>>>>> हो एकदम बरोबर ब्लॅककॅट. कारण त्या बारीक कुटाने पार गिचका होतो किस आणी खिचडीचा पण.
Pages