Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 4 July, 2019 - 13:13
परानुभूती
*******
अधाशी मनाला
उन्मनी वाटली
नशा काही केली
दुसऱ्याची
परी काही केल्या
जाईना तो तोल
सरेना नि बोल
अडकला
फुकटची नशा
चढत नसावी
इथली असावी
रित काही
आणि खिसा खाली
नाहीं छण छण
कलाल कुठून
काय देई
जावे खाल मानी
इथून निघून
तोंड लपवून
ऐसे होते
झिंगल्याचा भास
हरवून जाता
तुज दारी दत्ता
पुन्हा आलो
सतरावीचे स्तन्य
देई मज दत्ता
तुर्येच्या अमृता
पान करी
उनाड विक्रांत
विकला प्रेमाला
तुझिया भेटीला
सारे करी
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
****
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डॉ.काका मला शेवटून दुसरे कडवे
डॉ.काका मला शेवटून दुसरे कडवे कळाले नाही.
सुंदर...
सुंदर...
चौदावीचे का सत्रावीचे स्तन्य
चौदावीचे का सत्रावीचे स्तन्य ??
ज्ञानेश्वरीत सत्रावीचे स्तन्य म्हटलंय... बारावा अध्याय... गुरुनमनाच्या ओव्या..
सुंदर लिहिलंय..
सत्रावीचे स्तन्य,बरोबर खूप
सत्रावीचे स्तन्य,बरोबर खूप धन्यवाद
डॉ.काका मला शेवटून दुसरे कडवे
डॉ.काका मला शेवटून दुसरे कडवे कळाले नाही.>>>ज्ञानेश्वरी बारावा अध्याय... गुरुनमनाच्या ओव्या >>>
धन्यवाद दत्तात्रेय
धन्यवाद दत्तात्रेय
ज्ञानेश्वरीचे वाचन अजुन
ज्ञानेश्वरीचे वाचन अजुन केलेले नाही.त्यामुळे लक्षात आले नाही.पण असो.या निमित्ताने ज्ञानेश्वरी वाचन नक्की होईल.
तोपर्यत तुमची कविता निवडक 10 त.
thanks
thanks