बाळाचं नाव सुचवा : ध्येयवादी - संस्कृत मध्ये सुचवलं तर अधिक उत्तम

Submitted by cvijayn on 1 July, 2019 - 19:51

आम्हाला बाळ होणार आहे, एकाच नाव असा सुचवा कि मुलगा किंवा मुलगी ला बोलता येईल असं २ किंवा ३ अक्षरी नाव सुचवा किंवा छानस बाळाचं टोपण नाव सुचवा, नाव संस्कृत मध्ये सुचवलं तर अधिक उत्तम, हि विनंती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरारा अहो त्यांना संस्कृत नावे हवी होती ना म्हणून वजनदार अशी शुद्ध संस्कृत नावे सुचवली. तरी भिषग्वर,भ्रातॄभाव अशी एक से एक नावे राहिलीच!

अधीर, प्रणयोत्पात, लसुण??? काय काय नावं सांगतायत एकेक.
धाग्याची धमाल धाग्यात सामिल होण्याच्या दिशेने घोडदौड चालू आहे.

धृष्टद्युम्न, गृत्स्यमद, अश्वत्थामा!

म्हणताना डॅनी, गॅरी, अ‍ॅश असे म्हणायचे. म्हणजे कसे, आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे पण...

मुलगा:
मेघ
तन्मय
हिरेन
गिरीराज
तारक
वरद

मुलगी:
तन्मयी
Dhriti
ओवी
Hrutvy
भविता
यामी

लक्ष्मिपती. रतन अशी नावे ठेवावी. हे लोक मोठ्या उद्योजक पदी आहेत. विद्वांस दुर्वास अशी पण आहेत हुषार होईल मुलगा.

किच्कट्ट नावं ठेवायची फ्याशन आहे हल्ली. त्याचा ना अर्थ कळे, ना ते नीट लिहिता येत. इंग्रजीतून लिहिताना वाट लागेल अशी नावं. उग्गंच.

नांव असं पाहिजे की नीट हाक मारता आली पाहिजे. वेगवेगळ्या टोनमधे. Wink

रिजूल या नावाचा अर्थ सांगू शकेल का कोणी? ज्याचे ऐकले त्याची आई म्हणाली की" इनोसंट". गुगलही तेच सांगतंय!
ऋजूल असावे असं वाटतंय!

मागे आमची एक नातलग म्हणाली की तात्या हे शंकराचे नाव आहे म्हणे(तिचा गुगलशोध).मी गुगलून पाहिले तर तसं काही दिसलं नाही.

धागाकर्ता खुश होइल 64प्रतिसाद बघुन की भरपुर नावे सुचवली असतिल म्हणून पण धागा उघडल्या नंतर Biggrin Rofl

तात्या हे शंकराचे नाव आहे म्हणे>> तात, तात अशी परत परत हाक मारून शंकराने ओ दिली नाही म्हणून गणपतीबाप्पा ने रागाने ए तात्या अशी हाक मारली की काय?? Wink
( गरजू लोकांनी दिवे घ्या प्लीज)

@किच्कट्ट नावं ठेवायची फ्याशन आहे हल्ली. त्याचा ना अर्थ कळे, ना ते नीट लिहिता येत. इंग्रजीतून लिहिताना वाट लागेल अशी नावं. उग्गंच. >>> +10000 आ. रा.रा.

अर्थ न जाणून घेता काहितरी वेगळ्या नावाच्या नादात मुलीचे नाव चक्क 'श्लेष्मा' ठेवणारे लोक आहेत. Uhoh

माझ्या एका शालेय मित्राचे नाव प्रणय होते, आम्ही चिडवायचो पण sporty होता पोरगा.. त्यानेच मग हसता हसता म्हटले होते..

किमान प्रणयोत्पात तरी ठेवायचे होते!

अर्थ न जाणून घेता काहितरी वेगळ्या नावाच्या नादात>> अगदी!
हल्लीच एक ‘पृच्छा‘ पाहिली. तिच्या भावाचे नाव प्रियक आहे.

>>आमच्या ओळखीत एका बाळाचे नाव अगम्य आहे<<
मस्त नांव आहे. मोठा झाल्यावर म्हणु शकेल - दिल में आता हुं, समझ में नहिं... Proud

श्लेष्मा चा अर्थ काय?
अगम्य नाव म्हणजे खरंच ग्रेट.
पृच्छा पण भारी च की Lol
काही वर्षांपुर्वीच एका मुलाचं स्पंदन आणि एकाचं गोंडस नाव ऐकुन डोळे फिरवले होते.
पुढे अशी अगम्य वैगेरे नावं ही ठेवतील हे तेव्हा मला समजायला पाहिजे होतं. Happy

श्लेष्मा = शेंबूड, कफ.

या विषयाला वाहिलेला वेगळा धागा आहे का? मला वाचल्यासारखं वाटतंय.

एका मायबोलकरानेच सांगितलेली गंमत . त्यांच्या ओळखीत को णीतरी आपल्या मुलीचे नाव गणिका ठेवलेलं.

माझ्या माहितीतील एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे जो आता अकरावीला आहे. त्याच्या घरच्यांनी मोठ्या हौसेने त्याच नाव राजवर्धन ठेवलं होत. अलीकडे त्याची या नावावरून बरीच कुचम्बना होतेय आणि यामुळे त्याच्या मनावर नक्कीच परिणाम होत असणार. लोकांनी थोडा विचार करूनच नाव ठेवावं शक्यतो.

त्यांच्या ओळखीत को णीतरी आपल्या मुलीचे नाव गणिका ठेवलेलं.
<<
भरत, हे लोकांच्या डोक्यावरून गेलेलं दिसतंय. गणिकाचा अर्थ इथे फार लोकांना समजलेला दिसत नाहिये Uhoh
***
श्लेष्मा> शेंबुड? कफ? Uhoh ईऽऽगं! बिचारी छोटी.
<<
नै तं काय!
येतो पोरांना शेंबुड कधी कधी. म्हणून काय सरळ शेंबडी नांव ठेवायचं? Angry

भरत, हे लोकांच्या डोक्यावरून गेलेलं दिसतंय. गणिकाचा अर्थ इथे फार लोकांना समजलेला दिसत नाहिये >>> >कळलं आणि काहीही असं मनात म्हणुन पण झालं Happy

कळलं आणि काहीही असं मनात म्हणुन पण झालं>>>>> अगदी अगदी!
काल ते श्लेष्मा नाव वाचून डोक्याला हात लावला होता.आज दुसरी कथा.

काही वर्षांपुर्वीच एका मुलाचं स्पंदन आणि एकाचं गोंडस नाव ऐकुन डोळे फिरवले होते.>>
आपले मुल काही वर्षांत मोठे होणार असून त्याला समाजात वावरायचे आहे याचे भान असायला हवे.
(गोंडस, पिल्लू, परी, वगैरे नावे लहान मुलांना छानच वाटतात पण मग नंतर गोंडसकाका, परीआज्जी कसे वाटेल? ). (Btw आमच्या घरी एक बेबीआज्जी आहे. Happy

माझ्या माहितीतील एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे जो आता अकरावीला आहे. त्याच्या घरच्यांनी मोठ्या हौसेने त्याच नाव राजवर्धन ठेवलं होत. अलीकडे त्याची या नावावरून बरीच कुचम्बना होतेय आणि यामुळे त्याच्या मनावर नक्कीच परिणाम होत असणार. लोकांनी थोडा विचार करूनच नाव ठेवावं शक्यतो>>
हे मात्र नाही पटले. इतकं सुंदर नाव! राजवर्धन नावात कसली कुचंबणा?

स्पंदन - माझ्या मुलीच्या बेबी सिटींग मधे एक मुलगा यायचा.

माझ्या एका मैत्रिणीने तिच्या ओळखीतल्या दोन भावांची नावे अनुक्रमे "सहज" आणि "विशेष" असल्याच सांगितल होत. Lol

सहज आणि विशेष ...हे भारी आहे Lol
बाकी आमच्या समोर एक शीख कुटुंब आहे त्यांच्या छोट्या मुलीचं नाव त्यांनी सहजप्रीत ठेवलंय. मोठ्या मुलीचं नाव तमनप्रीत आहे.
राजवर्धन नावात कसली कुचंबणा?>> गरीब कुटुंबातील आणि राजवर्धन म्हणून मुलं चिडवत असतील Sad

मनिम्याऊ ,नावात नाही प्रॉब्लेम काही पण आईबाप बांधकाम कामगार आहेत. यालाही किरकोळ काम करूनच शिकावं लागतंय. ओळखीचे लोक राज्या म्हणूनच हाक मारतात पण बरेचसे समवयस्क आणि काही वयस्कर लोक सुद्धा राजवर्धन म्हणून जेव्हा हाक मारतात त्यात कुत्सितपणा असतो जो लपतालपत नाही. या लोकांचा त्याला झेपण्यासारखं नाव नसल्याने हेटाळणीचा उद्देश असतो. भविष्यात हा त्रास जास्त होऊ शकेल कदाचित.

भविष्यात हा त्रास जास्त होऊ शकेल कदाचित.>>>>>>>>>>> काम करुन शिकतोय मुलगा तर शिकुन काही योग्यता आली तर नाही होणार त्रास.

सहज आणि विशेष>>> Happy
काही फार्फेच्ड सुचलेली नावं
साधा-सोपा
आस्तिक-नास्तिक
विक्रम-वेताळ
क्रिया-कर्म

Lol

ते पुढचं पुढं झालं तोवर न्यूनगंड यायचा तो आलाच . अजून एका मित्राचं टोपणनाव गोट्या आहे त्याच बिचाऱ्याचं लग्न झालय तरी बरेच लोक अजूनही त्याला गोट्या म्हणूनच हाक मारतात. तो स्पोर्टीलि घेतो पण त्याच्या बायकोचा तोंड पाहण्यासारखं होतं त्याने.

श्लेष्मा, गणिका हे अगदीच अविश्वसनीय वाटतंय. नातेवाईकांपैकी कोणीच त्यांना अर्थ सांगितला नसेल का?

कॉलेजमध्ये असताना एक मैथिली नावाची मुलगी होती वर्गात. मिथिला नगरीत जन्मलेली च्या ऐवजी मैथुनातून जन्मलेली ती मैथिली हा विनोद मित्रांमध्ये प्रसिध्द होता.

मैथिली ठाकूर फेमस आहे नाव एकदम
अतिशय सुंदर गाते, तिचे अनेक व्हिडीओ आहेत युट्युब वर
आवर्जून पहा

काही वयस्कर लोक सुद्धा राजवर्धन म्हणून जेव्हा हाक मारतात त्यात कुत्सितपणा असतो जो लपतालपत नाही. या लोकांचा त्याला झेपण्यासारखं नाव नसल्याने हेटाळणीचा उद्देश असतो. भविष्यात हा त्रास जास्त होऊ शकेल कदाचित.>>

खरयं जिद्दूजी, प्रोब्लेम समाजाच्या मानसिकतेत आहे

अरे लोकं स्वतःच्या पोराबाळांची नावं ठेवताना स्वतःची डोकी काय जुन्या बाजारात उधारीवर देतात कि काय? Angry

Pages