गेल्या चार वर्षांत बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि त्यासह एकंदर जगही बदलतंय, आपण कुठे आहोत, मायबोलीवर शाळेचे लेख टाकून आता १० वर्ष झाली असं काहीसं झालं.
मायबोलीवर, विशेषतः माझ्या समर स्कुलच्या प्रश्नांची आणि एकंदर "आता पुढे काय" या संदर्भात इथे भरपूर माहिती मिळाली! एका मावशीने युएसहुन इमेल संपर्क करून खूप मदत केली, इतके छान वाटले होते तेव्हा. नंतर काही आराखडे बदलले, जे ठरवले करायचे ते नकोसे झाले, पण मी आजही त्यांची ऋणी आहे.
आज मी इथे आलेय, जे मी ह्या वर्षात शिकले, समजले, ते तुम्हाला द्यायला!
कॉलेजच्या दुसऱ्यावर्षी मी इंग्लंडला समर स्कुलसाठी गेले, आणि तिथून येताना आणिक २ किलो वाढून (कारण चिsssssssज इस लाईफ) भ र पू र काही शिकून आले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, इथे जे मी वर्गात पहिली येणं वगरे होतं, ते म्हणजे गेल्या ४-५ वर्षांचे पेपर "स्कॅन" करून जेवढ्यास तेवढा अभ्यास, पण अत्योत्तम उत्तरे "छापणं" हा प्रकार भारतातच चालतो याची प्रचिती आली आणि त्यामुळे जर मी एमएस साठी जायचे ठरवले तर माझे मार्क बघून विद्यापीठांना भलताच काही समज होईल यामुळे त्या सगळ्याच गोष्टीवर पाणी पडले. त्याच सोबत एकंदर अकॅडेमियामध्ये होणाऱ्या उलाढाली, मग ते पोस्ट मॉडर्निझम, क्रिटिकल थिअरी वगरे जरा अति वाटू लागले.
मुंबई विद्यापीठात एमए करायचा प्रयत्न केला, (there was an attempt), पण पुढे तिथेही फारसे काही झाले नाही. असोच.
पण कॉलेज मध्ये असताना दुसऱ्यावर्षीच अशी चपराक बसल्याने बीए करून काहीच होणार नाहीये हे कळायला वेळ नाही लागला. मग मी जेव्हा माझ्या वर्गातल्या लोकांना शिकवायचे, ते त्यांना आवडतंय आणि ते त्याचं कौतुक करताहेत, म्हणजे नाही का, अरे तू नसतीस ना, तर बघ अस्सं डोक्यावरून गेलं असतं, त्यामुळे मला शिकवण्याची आवड व्हायला लागली.
कॉलेज नंतर लगेचच मी मॅक्स म्युलरमध्ये जर्मन शिकायला घेतले, तिथे सि१ पर्यंतचे क्लासेस पूर्ण केले आणि मी पूर्णवेळ जर्मनची शिक्षिका झाले! सुरुवात म्हणून मी साधारण एक वर्ष वाशीतल्या एका संस्थेमध्ये जर्मन शिकवले, तिथे मग वेगवेगळ्या वयोगटाच्या विद्यार्थांमुळे अजून नवीन गोष्टी शिकायला प्रेरणा मिळाली आणि असे करत करत मी अकॅडेमिक कॉऊन्सेलर म्हणून काम करू लागले.
आई म्हणायची तुझी लग्नरास कुंभ आहे, त्यामुळे ढिगाने गोष्टी चालू असतात तुझ्या डोक्यात, पण मग "A jack of all trades is a master of none, but oftentimes better than a master of one" ह्या म्हणीनुसार त्याचीही जाणीव झाली. जर्मन शिकवत असताना मग, अजून काय करता येईल, जर्मनच का? स्पॅनिश का नाही? मग स्पॅनिशसाठी कुठं जायचे? परदेशी गेलीस का ग कधी? मला पण आर्टस् मध्ये काहीतरी करायचंय, पण नेट वर वर्षी माहिती नाही आणि ओळखीत कोणाला माहित नाही, तू सांग ना तुझा अनुभव... असे एक ना एक करत १००० प्रश्नांची उत्तरं देता देता, माझाही "डेटाबेस" मी तासून जरा चकाचक करू लागले. भरीसभर म्हणजे ह्यालाच काय ते Academic Advising, Academic Counseling म्हणतात हे समजले. मग तशी नोकरीही मिळाली आणि दोन महिन्यात हा म्हणून बिझनेस सुद्धा करून दिला. पालक अक्षरशः फोन करून करून आभार मानायचे, आणि त्यातच मला माझे समाधान मिळायचे. दुर्दैवाने काही गोष्टी वेगाने बदलल्या आणि त्यामुळे मला 'आज नाही तर कधीच नाही' करत ती नोकरी सोडून माझे स्वतःचे काहीतरी सुरु करायची एक संधी मिळाली.
ती संधी म्हणजे आज पुण्यात तसेच स्काईप, गुगल हँगआऊट वरून जर्मन शिकवणे!
Common European Framework of Reference for Languages (CEFR) चे भाषेसाठी ३ वर्ग आहेत, आणि त्यात त्यांचे प्रत्येकी २ श्रेण्या! ह्यालाच ए१ ए२, बी१ बी२ आणि सि१ सि२ म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर ए म्हणजे आपण साधारण पहिली ते सातवीमध्ये काय शिकतो ते असते, बी म्हणजे आठवी ते पदवी आणि सि म्हणजे पद्व्योत्तर, पोस्टडॉक! शाळेत सातवीच्या स्कॉलरशिपचे व्याकरण पुढे तीन वर्ष सखोल होत जाते, मात्र त्यानंतर व्याकरण असे शिकवले जात नाही. तेव्हा आपले हे म्हणून विषय असतात, त्यांचे पेपर. बस. ह्या ३ वर्गांचे सुद्धा असेच काही गणित आहे.
ह्यांसाठी काही तास ठरलेले असतात, म्हणजे एक लेवल पूर्ण करायला तुम्हाला किती तास पुरेसे आहेत, मग अमुक तासांत सुद्धा शिकता येईल का, वगरे. मग ते तुम्ही स्वतःच शिकणार आहेत, कि तुम्हाला कोण शिकवणार आहे, खाजगी कि क्लासरूम, ह्यानुसार ते तास कमी जास्त होतात.
युरोपातल्या बहुतेक भाषांचे असे वर्ग आहेत आणि ह्या भाषा, त्यांच्या संस्कृतीसह संपूर्ण जगापर्यंत पोहचवण्यासाठी ह्या देशांच्या सांस्कृतिक मंडळाच्या, समितीच्या, मंत्रालयाच्या संस्था आज जगभर कार्यावत आहेत. उदाहरण द्यायचे तर,
What’s Goethe-Institut/ Max Mueller Bhavan for German is what
- Alliance Française for French
- Instituto Cervantes for Spanish
- Russian Culture and Science Center (RCSC) for Russian
- Instituto Camões for Portuguese
- Istituto Italiano di Cultura for Italian
इथे तुम्हाला जो दर्जा मिळतो, भाषा शिकण्याचा, तो कदाचित त्या देशात जाऊनच मिळेल. त्याच सोबत, इथे तुम्हाला ती भाषा शिकायचे सर्वात जास्त तास सुद्धा मिळतात. मात्र त्याच वेळी आज भरपूर संस्था आहेत जिथे आपल्याला ह्या भाषा शिकायला मिळतात. ह्यामागे सगळ्यात महत्वाचे कारण हे असते कि प्रत्येकाची भाषा शिकण्याची आणि समजण्याची तशीच शिकवायची आणि समजवण्याची एक प्रवृत्ती, नैसर्गिक क्षमता किंवा कौशल्य असते. त्यासाठी जो तो त्याचा कलेने स्वतःचे क्लासेस काढून त्या भाषा शिकवतो.
त्याच वेळी प्रश्न असतो वेळेचा आणि पैश्यांचा! संस्था म्हटली कि त्यांचे तास ठरलेले, मग आपण दांडी मारली, तर झालंच! ह्यामुळे आज मुंबई पुणे दिल्ली अश्या शहरांमध्ये भरपूर वर्ग घेतले जातात आणि खाजगी वर्गांसाठी लोकं तेवढे पैसे मोजायलाही तयार असतात आणि भाषा एक कौशल्य आहे, ना ती कुठे जाणार, ना ती निर्वंश होणार.
आपण मात्र त्यासाठी किती पैसे मोजतोय, ह्याची जाणीव ठेवली पाहिजे! सर्वात वरती आहेत त्या-त्या देशांच्या संस्था जिथे एका श्रेणी साठी २० ते २५ हजार भरावे लागतात आणि सि श्रेणीसाठी बऱ्याचदा ते शिष्यवृत्ती देतात जेणेकरून मुलं त्या देशात जाऊन ती भाषा शिकतील. त्यानंतर ज्या खाजगी संस्था आहेत, तिथे अगदी अर्ध्या "किमतीत" म्हणजे ६ ते १२ हजारात शिकायला मिळते, मात्र तिथे तासांवर बंधन असते. खाजगी शिकायचे तर काही तासाचे अमुक म्हणजे अमुकच घेतात तर काही तासांवर, एका आठवड्यात, महिन्यात किती दिवस शिकवणार त्यावर त्यांची फी ठरवतात.
आज भाषेला प्रचंड महत्व आहे! माझी रूममेट तिच्या इस्राएलच्या क्लायंटसह बोलताना एक एक शद्ब काळजी पूर्वक ऐकून उत्तर देते कारण तिच्या एवढे सुद्धा इंग्रजी त्यांना येत नाही, त्याच वेळी त्यांनाही तिची धडपड दिसते. आणि हे तर एक उदाहरण झाले, आज भारतातले भरपूर लोक अमेरिकेत, जर्मनीला, पूर्व युरोपात जात आहेत शिक्षणासाठी, मग ते इंजिनीरिंग असो किंवा डॉक्टरकी. भाषा नाही तर तिथे राहणार कसे? बोलणार कसे?
तर ह्या आणि शाळेत ज्यांना जर्मन भाषा शिकायची आहे, त्यांना मी घरून व्हिडियो कॉलच्या माध्यमाने जर्मन शिकवते. त्यात मी प्रत्येक श्रेणी साठी स्वतःच काही तास ठरवले आहेत, कि तेवढ्या तासांत मी काय शिकवेन आणि माझ्या विद्यार्थ्याला बोलता येईल, गाणी समजतील, ह्याचा आराखडा घेत राहते.
ह्याच सोबत स्वाती२ ह्यांचे जे अमेरिकेत हायस्कुल नंतर काय संदर्भात जे लेख होते, साधारण त्याच धर्तीवर मी भारतातली मुलं परदेशात जाण्यासाठी कोणकोणत्या परीक्षा देऊ शकतात आणि त्यांचे फायदे, तोटे काय, ह्यांचाही अभ्यास करू लागले - जो माझ्या नोकरीचा गाभा होता. आज भारतातले भरपूर पालक मुलांना पदवीपूर्व शिक्षणासाठी मुलांना परदेशी पाठवायला तयार असतात, पण त्यांना एपी, सॅट आणि सॅट सब्जेक्ट पण असतात ह्यांची माहितीच नसते. ह्या साठी मी एक मदतपुस्तिका संकलित केली आहे, [https://drive.google.com/file/d/1BJLKWBpgk7Qk4gBDeI00oviQUY9kwYgJ/view?u... जिथली माहिती कॉलेज बोर्ड, एसिटीच्याच वेबसाईट वरून घेतली आहे आणि शेवटी त्या लिंक्स सुद्धा आहेत.
माझ्या क्लासेस बद्दल सांगायचे झाले तर मी ए१ साठी ४५-५० तासांचा कोर्स घेते, ए२ साठी ९० तास, बी१ साठी १३५ तर बी२ साठी २७० तासांचा कोर्स घेते. मात्र कोणाला जर एकत्रित ए१-ए२, ए२-बी१ किंवा ए१ ते बी१ शिकायचे असेल तर त्यांसाठी १२०, २०० आणि ३०० तासांचे कोर्सेस घेते. ह्यामध्ये प्रत्येक श्रेणीला किमान २ चित्रपट, १ वेबसिरीज, ३-४ पॉडकास्ट वगरे चालूच असते आणि त्याच सोबत मॅक्स म्युलर जे पुस्तकं देतात, त्या व्यतिरिक्त २ पुस्तकं, २ गोष्टींची पुस्तकं आणि ३ हँडआउट देते. ह्या मागे उद्देश हा कि फक्त व्याकरण आणि शब्दसंग्रह एक भाषा शिकायला पुरेसा नसतो आणि हे मलाच बी१ करत असताना जाणवले, मग मी शिकत असताना मला अजून काय काय आवडले असते, ह्या सगळ्याचा सांगोपांग विचार करून मी हे वर्ग सुरु केलेत.
जुन्या क्लासची मालकीण आजही व्हाट्सऍप वरून विचारात असते, तेव्हाचे विद्यार्थी आजही आठवण काढतात आणि त्यातच मला अगदी समाधान मिळते.
माझी फक्त एवढीच इच्छा आहे कि भाषेसारखे एक महत्वपूर्ण कौशल्य शिकण्यासाठी आपल्याला सगळी माहिती असली पाहिजे. पण हा लेख माझ्या क्लासेस ची जाहिरात नाहीये. तुम्हाला जर कोणती भाषा शिकायची किंवा शिकवायची असेल तर त्याची मी माझ्या परीने तुम्हाला उत्तरे देईन. गेल्या महिन्यात मी रेडिटवर सुद्धा असाच लिहिले होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
तेव्हा तुमचेही प्रश्न येऊ द्या, कुठे काही चूक झाली असेल तर तीही सांगा, विशेषतः त्या मदतपुस्तिकेत!
Attachment | Size |
---|---|
A-GUIDE-TO-FUNDING-YOUR-UNDERGRAD-STUDIES.pdf | 307.13 KB |
उपयुक्त लेख...
उपयुक्त लेख...
नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा..
मला काही जन्मात ती जर्मन
मला काही जन्मात ती जर्मन शिकता यायची नाही.कारण 'बोले तैसा चाले'असा तिचा खाक्याच नाही.शब्दात अक्षरं ढिगभरपण उच्चार वेगळाच.बहुत नाइन्साफी है.त्यात ती केनेडीची I am a jelly donut वाली फजितीहीऐकलेय.नकोच ते.तू स्पेनीशचे क्लासेस सुरु करशील तेव्हा मात्र नक्की सांग.माझी गाडी सध्या duolingo वरही अडलेलीच आहे.तुझ्या नव्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा!!!
नमस्कार,
नमस्कार,
तुमचा लेख वाचला. तुमच्या उपक्रमासाठी ढिगभर शुभेच्छा! काही मदत हवी असल्यास किंवा काही बाबतीत को-लॅबोरेशन करण्यास उत्सुक असल्यास मी रेडी आहे. मी पुण्यात असुन गेली १४ वर्षे जर्मन आणि डच भाषेचा अनुवादक म्हणुन काम करतो. ७-८ वर्षे सिम्बी मध्ये शिकवण्याचा ही अनुभव आहेच माझा नंबर आपल्याला वि. पु. करतो
- प्रसन्न
छान लेख. या क्षेत्राविषयी
छान लेख. या क्षेत्राविषयी फारसे माहित नव्हते.
जर्मन, फ्रेंच या सारख्या भाषा येणाऱ्या व्यक्तिंबद्दल मला खुप आदर आणि त्यापेक्षा जास्त आश्चर्य वाटते.
या क्षेत्रात पुढे जे काही करायची तुझी ईच्छा आहे त्यासाठी खुप शुभेच्छा!
तुम्ही कधी होतात सिम्बि ला ?
@ प्रसन्न हरणखेडकर, तुम्ही कधी होतात सिम्बि ला ? मी २०१० ला जर्मन साठी यायचो तिथे. मित्र-मैत्रिणी जायचे म्हणून मीबी गेलो पण नंतर मला बोअर झालं म्हणून सोडून गेलो महिन्यातच.
@ जिद्दु : मी २००५ ते २०१०
@ जिद्दु : मी २००५ ते २०१० ऑक्टोबर पर्यन्त होतो सीफील मध्ये शिकवायला आणि त्या नंतर ही २ वर्ष त्यांच्या थ्रु सिम्बी च्याच वेगवेगळ्या इन्स्टिट्युट मध्ये होतो.
वा! फारच छान.
वा! फारच छान.
उपयुक्त माहिती. पुढच्या वाटचालीसाठी अनेकोनेक शुभेच्छा.
मदतपुस्तिकेची लिंक उघडत नाहीये.
लिंक अपडेटेड करते उद्या
लिंक अपडेटेड करते उद्या पर्यंत.
वा , माझही गोएथे पुणे मधूनच
वा , माझही गोएथे पुणे मधूनच C1 झालय . मी ही जर्मन ऑनलाईन क्लास घेतो , पण फ्री घेतो , फक्त एक छंद म्हणून
इथे संपर्कात रहायला आवडेल
धन्यवाद सर्वांचे!!
धन्यवाद सर्वांचे!!
@प्रसन्न डच!! मला वर इच्छा आहे शिकायची! एक मित्र आहे, त्याच्या मेल्स मध्ये तो शेवटी डच मध्ये काही वाक्य खरडतो. मला ती वाचताना नेहमी मजेशीर वाटते!
@केदार वन डे मलाही एक दिवस छंद म्हणून शिकवायचे आहे, पण त्याची सुरुवात म्हणून हे निमित्त!
@केदार - तुम्ही लिंक शेअर करू
@केदार - तुम्ही लिंक शेअर करू शकाल का ? जर्मन ऑनलाईन क्लास ची ..
जर्मन शिकून कुठे संधि आहेत?
जर्मन शिकून कुठे संधि आहेत?
मलाही हाच प्रश्न विचारायचा
मलाही हाच प्रश्न विचारायचा आहे , जर्मनी मध्ये जाऊन शिकायचे असेल तर जर्मन भाषा शिक्ण्याबरोबरच अजून काय शिक्षण हवे ? कृपया विपू बघाल का ?
अभिनंदन आणि शुभेच्छा.. मी AFP
अभिनंदन आणि शुभेच्छा.. मी AFP मधून फ्रेंचचा डिप्लोमा 1 पर्यंत कोर्स केला होता 2000-2001 साली. त्यावेळी espace 1 , espace 2 , prediploma , diploma 1 and diploma 2 असे काहीसे टप्पे होते.फी पण ३-५हजार असावी. फार मेहनत घेतात ह्या संस्थामध्ये. गाणी , नाटकं, सिनेमे अन काय काय. नंदिता वागळे होती प्रेदीप आणि दीपलोम ला. आणि बरेचदा माधुरी पुरंदरे पण घ्यायच्या लेक्चर्स. एकदम जादुई 2 तास असत.. ह्या दोन बायांनी वैचारिक खाद्य तर खूप पुरवलं. तुम्हाला परत एकदा खूप शुभेच्छा..
लिंक पाहिली. निवांत वाचेन.
लिंक पाहिली. निवांत वाचेन.
धन्यवाद जरबेरा.