डे केयर मधील बुलींग

Submitted by कटप्पा on 10 June, 2019 - 14:46

डे केयर मधील बुलींग कसे हाताळावे?
भावाचा मुलगा आता डे केयर ला आहे आणि तिथे एक दुसरा मुलगा त्याला ढकलणे, मारणे वगैरे प्रकार करतो आहे।
टीचर ला विचारले की सर्वांना मारतो का, तर म्हणे माजी फक्त यालाच तो असे करतो, कदाचित हा लहान आहे म्हणून। आम्ही समजवायचा प्रयत्न करतो त्याला।
दुसरा मुलगा 3 वर्षाचा आहे आणि भावाचा मुलगा 18 महिन्यांचा, आताच तो या नव्या वर्गात आला आहे toddlar वाल्या।

काही अनुभव? सूचना?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ते शीर्षकात बुलिन्ग असा बदल करा. विचित्र वाटते आहे वाचायला.

दीड वर्शाच्या दुप्पट वयाचा मुलगा जात्याच जास्त शक्तिमान व हूड असणार. त्या मुलाच्या आईबाबांना भेटून प्रश्न समजावून सांगा. काही व्यक्तिमत्व विशेष लहान पणीच दिसतात. दे हॅव अ बिगर प्रॉब्लेम ऑन देअर अ‍ हँड्स. अगदीच जमले नाही तर पाळणा घर किंवा वेळ बदला दोन मुलांना वेगळे ठेवायला प्रयत्न करायला पाळणा घराच्या चालकांना व ताईला सांगा. तो मुलगा घरी किंवा कुठे असे बिहेविअर शिकतो आहे ते
अभ्यास केले पाहिजे. टीव्हीवर किंवा घरी असे त्याला दिसते आहे. त्याचे वागणे रेकॉर्ड करून आईबाबां ना दाखवा त्याच्या.

दोघे एकत्र येणार च नाहीत असे बघा. कारण वये खूपच लहान आहेत. बारक्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.

बारक्याच्या हातून त्या मारकुट्याला खाऊ,खेळणी भेट द्यावीत. मैत्री निर्माण होईल असे पहावे.

टीचर ला विचारले की सर्वांना मारतो का, तर म्हणे माजी फक्त यालाच तो असे करतो, >>>>>>> हे त्यांचे बोलणे चुकीचे आहे.जर यालाच करत असेल तरी डेकेअरवालीने छोट्याला प्रोटेक्ट केलेच पाहिजे.दुसराही मुलगा लहान आहे.त्यामुळे त्याला ओरडून फायदा नाही.पण तेथील ताईने दोघे एकत्र येणार नाहीत असे पाहिले पाहिजे.

मुलांना प्रेमात वाटेकरी आवडत नाहीत. मोठा आधी लाडका असेल व ताई आता छोट्याला जास्त प्रेमाची वागणुक देत असतील.