Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 8 June, 2019 - 14:54
************
दत्ता शिणलो रे शिणलो
तुझिया पदी मी आलो ॥
आता सरली रे ताकद
करी करुणा हे भगवंत ॥
जीव हा जगी होरपळे
करी तू वर्षा कृपाळे ॥
तुज वाचून रे मजला
कुणी नाही रे दयाळा ॥
जन्म गेला रे वाया
व्यर्थ शिणली ही काया॥
करू नको रे अव्हेर
कृपा करी दासावर ॥
विक्रांत भवात बुडता
बोल लागेल तुज दत्ता ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी तुमच्या कविता वाचून शिणलो
मी तुमच्या कविता वाचून आनंदीत झालो.
स्वानुभवाचे जनरलायझेशन नको हे
स्वानुभवाचे जनरलायझेशन नको हे खरेच मात्र धाडसाचे कौतुक केले पाहिजे

मी तो प्रतिसाद यांच्या
मी तो प्रतिसाद यांच्या कवितेवर दिलाच नव्हता. सो स्क्रीनशॉट गैरलागू आहे.
डॉक्टर साहेब,
डॉक्टर साहेब,
कविता लिहीत रहा. लक्ष देऊ नका काही फालतू आयड्यांकडे.
काटा रुते कुणाला, आक्रंदतात
काटा रुते कुणाला, आक्रंदतात हे महत्त्वाचे आयडी. हम फालतू है तो क्या हुवा. आखीर आयडी तो है.
अरेच्चा ! स्वतःवर का ओढवून
अरेच्चा ! स्वतःवर का ओढवून घेताय ?
मी तर दोन ठिकाणच्या प्रतिसादात तर्कशुद्ध सुसंगती लावायचा प्रयत्न केला. बाकी काटा रूते कुणाला हे इथे खालच्या लिंकवर दिसले होतेच
https://www.maayboli.com/node/70181
खरं की काय. बरं साहेब.
खरं की काय. बरं साहेब.
विक्रांत भवात बुडता
विक्रांत भवात बुडता
बोल लागेल तुज दत्ता ॥>>>या भावात रहायला मला आवडतं.
छान कविता
छान कविता
शाली त्यांना भव म्हणजे भवसागर
शाली त्यांना भव म्हणजे भवसागर म्हणायचे आहे. अर्थात तुम्हाला ते समजले असेल. भावात का लिहीलं हेही कळू द्या.
अरेच्चा ! शक्तीराम यांनी
अरेच्चा ! शक्तीराम यांनी प्रतिसाद का बदलला असेल बरे ? त्यांना तो बदलावा असे का वाटले असावे ?
माझं मन बदललं. नको दुखवायला
माझं मन बदललं. नको दुखवायला कुणाला असा आदेश झाला.
सर्व मित्रांना धन्यवाद !!
तुम्हा सर्व मित्रांना खूप धन्यवाद !!
धन्यवाद
धन्यवाद
सुंदर!!
सुंदर!!
धन्यवाद
धन्यवाद