द्वैताची पेरणी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 June, 2019 - 09:36

द्वैताची पेरणी

****:
येतात विचार
जातात विचार
घेऊन आकार
जगताचा ॥

नाती गोती सारी
रंगवी रंगारी
अस्तित्व कुसरी
येवुनिया ॥

आत बाहेरील
जग ना वेगळे
असे एक सरे
क्षण रूप ॥

पदार्थ वाऱ्याचा
गोळा वा पाण्याचा
हाती का यायचा
कधी कोणा ॥

पाहता पाहता
बुडालो शून्यात
कुणी ना कुणात
राहियेले ॥

विक्रांत पाहता
डोळियांचा डोळा
आतलिया खेळा
ओसाडलो॥

दत्ताचिये वाणी
उतरली मनी
द्वैताची पेरणी
करपली ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

*****

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रांत पाहता
डोळियांचा डोळा
आतलिया खेळा
ओसाडलो॥ >> हे कळले नाही.

दत्ताचिये वाणी
उतरली मनी
द्वैताची पेरणी
करपली ॥ >>> फारच सुंदर. Happy

विक्रांत पाहता
डोळियांचा डोळा
आतलिया खेळा
ओसाडलो
....>>>>हे कळले नाही.
कविता ध्यानाचा अनुभव आहे .(बाहेर आल्यावर एक प्रयत्न असतो लिहण्याचा )"डोळीयांचा डोळा." म्हणजे पाहणे "ज्याला" कळते तो डोळा ती जाणीव , तिथे चित्त स्थिर झाले की विचार थांबतात म्हणजे विचाराचे जग ओसाड होते आतला खेळ थांबतो.

ध्यान अनुभव जोरदार आहे.... Happy
दत्तात्रेय उभे । जयाच्या पाठीशी । तया निश्चयेशी । ध्यान फावे ।।

______/\____

______/\____

>>>>>दत्ताचिये वाणी
उतरली मनी
द्वैताची पेरणी
करपली ॥

वाह!!! सुंदर.