टिव्ही आणि आम्ही यांचा फारसा संबंधच कधी आला नाही.
जेव्हा जेव्हा आला तेव्हा आम्हांला काही चॉइसच नव्हता !
आता सुरुवात एकदम सुरुवाती पासून..
आम्ही म्हणजे ७०-८० च्या दशकातले, हे आमच्या आधीच्या धाग्यावर नोंदवले होते. तर... आमच्या बालपणी टिव्ही ही अत्यंत वाईट गोष्ट, अभ्यासावर आणि तसंच एकंदर जडणघडणीला मारक अशी वस्तू असेच संस्कार आमच्या पालकांनी आमच्यावर केले.
आता आम्ही मोठे झालो; मोठे म्हणजे आम्हांला आता मुलं झाली तरीही आमचे पालक अजूनही असेच समजतात की आम्ही टिव्ही पाहू नये. शाळेतून दमून-भागून येणारी त्यांची नातवंडं मात्र करमणूकी साठी डोरेमॉन, शिनचॅन नामक ज्ञान वर्धक, उद्बोधन कार्यक्रम पाहू शकतात !
रिमोट अजूनही आमच्या पालकांकडेच.. टिव्हीचा !
हेच आमचे पालक मात्र स्वतः सासू सुना, मसाले, फोडण्या , पुनर्जन्म काही आणि काहीही विषय असलेल्या मालिका पाहतात. नुसतेच पाहतात असे नाही, तर तेच तेच परत परत रिपीट टेलिकास्ट मधे पण पाहतात. रिपीट का पहात असावे याचा साक्षात्कार एके दिवशी झाला..
झालं असं की एके दिवशी कधी नव्हे ते दुपारी जेवायला घरी आलो, म्हटलं थोड्या बातम्या चाळाव्या, पण नाही ! मालिका चालू होती. म्हटलं काल रात्री हेच लागल होतं ! उत्तर तयार होतं - एवढंच काल मिस झालं!
आयडीयाची कल्पना कशी असते हे सांगतो.
चॅनल 'अ'वर 'आवशी चो घो' नामक मालिका चालू असेल, तर त्याच्या ब्रेक मधे चॅनल 'ब'वरची 'बापाशीची पेंड' मालिका पहायची. तिथे ब्रेक आला तर चॅनल 'क' वर ' नानाची टांग' मालिका पहायची. तिथे पण ब्रेक आला तर परत चॅनल 'अ' किंवा 'ब'.. हे असंच चालू ठेवायचं !
ह्यात होतं काय, कुठल्या तरी मालिकेतलं काही तरी मिस होतंच. मग कसं करायचं आता ! फिकर नॉट, दुसर्या दिवशी रिपीट पहायचं. तिकडे पण हीच चॅनल स्वॅप पद्धत. आहे की नाही डोकॅलिटी !
रात्री उशीरा, पहाटे वगैरे मॅचेस असल्या तर आज काल अत्यांनद होतो यामुळे...
तात्पर्य काय - तर लहान असताना नाही आणि आताही नाही.. तो टिव्ही आमच्या वाट्याला रिचार्ज मारताना व्ही सी नंबर पाहण्या पुरता ही येत नाही हो !
आवशी चो घो' 'बापाशीची पेंड'
आवशी चो घो' 'बापाशीची पेंड' >>>>:हाहा:
घर घर की सेम कहानी ..सिरीयल
घर घर की सेम कहानी ..सिरीयल चालू असताना ऍड च्या वेळी 2min जरी sports चॅनल लावला तरी मासाहेब काय काय डायलॉग ऐकवतात बास
आमच्याघरीपण हीच परिस्थिती आहे
आमच्याघरीपण हीच परिस्थिती आहे
आई आणि वहीणीसाहेबच दोन्ही टिवी सांभाळुन घेतात.
आधी जाम चिडचिड व्हायची.
पण आता हाटस्टार, नेटफ्लिक्स आणि वुटमुळे माझ मनोरंजन नाही चुकत.
(No subject)