अबोला मीच माझ्याशी धरू शकते

Submitted by सुप्रिया जाधव. on 30 May, 2019 - 12:59

कदाचित हेच उलटेही घडू शकते
अबोला मीच माझ्याशी धरू शकते

प्रवासाला निघाल्यावर कळाले हे
सरळ चालूनसुध्दा धडपडू शकते

मनाभवती स्मृतींचे बनवले आळे ;
करपल्या भावनाही उमलवू शकते

कशाला चौकशा करतोस उन्मादा ?
मनाचे झाड तगले उन्मळू शकते

गुगलल्याने मिळवतो जे हवे ते ते
मनाची शांतता कोठे मिळू शकते ?

दिशेने तू तिच्या पसरव तुझे बाहू
मिठीमध्ये तुझ्या ती विरघळू शकते

'प्रिया' उपकार मानू मृगजळाचे ह्या
सुन्या डोळ्यात पाणी तरळवू शकते

*सुप्रिया मिलिंद जाधव*

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम झकास.

<<< 'प्रिया' उपकार मानू मृगजळाचे ह्या
सुन्या डोळ्यात पाणी तरळवू शकते >>>
_/|\_ इतकं सुंदर कसंकाय सुचतं हो तुम्हाला. मस्त!!

प्रवासाला
निघाल्यावर
कळाले हे
सरळ
चालुनसुद्धा
धडपडू शकते>>> वाह! Happy