आजच दुरदर्शनच्या एका चॅनलवर बातमी आली की ५ % ईव्हीम पॅट आणि इव्हीम ची जुळणी केली असता यात एकाही मताचा घोळ आढळला नाही.
मध्यंतरी निकाल लागायच्या आधी एका चॅनलने बातमी दिली होती की निवडणुका जाहीर झाल्यापासून गुगल सर्च वर केरळ सोडता सर्व राज्यात मोदींच्या सभा, भाषणे याचे प्रमाण सर्वाधीक होते.
ईव्हीएम ने याच पध्दतीने निकाल दिलेला आहे.
खोटेपण तर सर्वच पक्ष करतात. १९७७ साली नसबंदी हा असाच खोटा विषय जनता पक्षाने पसरवला. पुढे इंदीराजी सत्तेत आल्यावर याची शहाषाशा झाली. पण १९७७ ते १९८० काळात भितीपोटी नसबंदी कार्येक्रमाची हानी झाली. याकाळात लोकसंख्या वाढीचा वेग वाढला ( संदर्भ - शल्यकौशल्य - लेखन डॉ भा. नि. पुरंदरे )
ईव्हीएम च्या वर केलेल्या खोटारडे आरोपामुळे विरोधी पक्ष तांत्रीक सुधारणांचे चाक उलटे भिरवून पुन्हा शिक्का आणि मतपत्रिका आणण्यास सुप्रिम कोर्टाच्या माध्यमातून बाजी मारणार असे वाटत असताना , निवडणुक आयोगाने आपली रास्त भुमिका कायम ठेवत ईव्हीम ची अपरिहार्यता सिध्द केली आहे.
जगात कुठेही घरुन मोबाईल / कॉप्युटरच्या माध्यमातून निवडणूक केंद्रावर न जाता एकाच दिवशी भारतात सर्वत्र निवडणुका होऊन संघ्याकाळ पर्यंत निकाल लागेल असे तंत्र माझ्या हयातीत दिसावे असे माझे स्वप्न आहे.
मोदीजींनी निवडणुका मधे प्रचंड शासकीय पैसा खर्च होतो, सरकारी यंत्रणा कामाला लागते, आचारसंहीतेमुळे विकास थांबतो यासाठी सर्वच निवडणुका एकाच वेळी घ्यायला हव्या असे म्हणले होते.
पण जर तांत्रिक सुधारणा होऊन या निवडणुका जर मोबाईल फोन च्या माध्यमातून झाल्या तर निवडणुकांच्या साठी सुट्टी, खर्च, गैरप्रकार या सर्वालाच आळा बसेल.
नुकतेच पोस्टल मत देणार्या सरकारी नोकरांना या पध्दतीची अत्यंत प्रार्थमीक तंत्र पध्दती निवडणुक आयोगाने विकसीत केल्याचे ऐकले.
आता संपुर्ण निवडणुका या पध्दतीने होण्यास काही काळ लागला तरी याची वाटचाल सुरु व्हावी. किमान पदवीधर मतदार संघात याची सुरवात व्हावी ही अपेक्षा.
>>> या आदरणिय नेत्यांचा इथे
>>> या आदरणिय नेत्यांचा इथे गाढव असा उल्लेख झालेला आहे. यातले अनेक जण सध्या मंत्री आहेत. एक माजी गृहमंत्री होते. अशा महत्वाच्या पदांवरील व्यक्तींचा अशा अर्थाने उल्लेख होणे योग्य वाटत नाही.>>>
काहीजण पंतप्रधान पदावरील व्यक्तीचा सातत्याने एकेरी उल्लेख करून त्यांच्याविषयी अत्यंत अर्वाच्य अपशब्द वापरत होते. तेव्हा तुम्हाला ते अजिबात खटकले नव्हते व त्यावेळी दातखिळ बसली होती.
मतदान आणि EVMचा आकडा यात फरक
मतदान आणि EVMचा आकडा यात फरक कसा? ? With Millind Bhagwat
https://www.youtube.com/watch?v=6pVUh9i-st0
Pages