मध्यवर्ती निवडणूक निकाल - २०१९

Submitted by किरणुद्दीन on 22 May, 2019 - 13:47

सकाळी सात पासून मतमोजणीस सुरूवात होईल. जस जसे कल स्पष्ट होत जातील आणि नंतर निकाल लागतील तस तसे इथे आपण नोंदी करूयात. पहिला निकाल या वेळी उशिरा हाती येण्याची शक्यता आहे. निकाल स्पष्ट झाले की धागा बंद करून टाकूयात. पुढच्या घडामोडींसाठी वेगळा धागा असावा.

( या वेळी धागाकर्ता बदलल्याने निकाल बदलेल काय ? )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

EVM च्या गोंधळामुळे वादग्रस्त निवडणूक. बघुयात निकाल काय लागतो ते. बाकी सर्व पक्षाचे कार्यकर्ते वोट counting बिल्डिंग च्या बाहेर ठाण मांडून बसले आहेतच. त्यामुळे EVM बदलले जाण्याची शक्यता अत्यंत कमी. त्यातच निवडणूक आयोगाने EVM हॅक करता येत नाहीत हे वारंवार सांगितल्यामुळे/दाखवल्यामुळे मिळालेल्या मतांमध्ये फेरफार करणे देखील अवघड वाटते. त्यातच VVPAT मुळे मत इच्छित व्यक्तीला गेले कि नाही हे कागदाच्या पर्चीवर दिसले आहेच. थोडक्यात काय तर येणारा निकाल बऱ्यापैकी पारदर्शी असेल असे मला वाटते. बाकी खरं खोटं देव आणि ते EVM मशीन जाणोत.
बाकी धाग्यावर विषयाला धरून कमेंट येऊन धागा योग्य मार्गी लागो हीच देवाचरणी प्रार्थना!

सेम धागा मी आधीच काढला आहे, आणि त्यावर कमीत कमी ३२ प्रतिसाद झाले आहेत,
तरीही नवा धागा काढण्याचे प्रयोजन काय असावे बरे?
ही त्याची लिंक
https://www.maayboli.com/node/70024

सेम धागा मी आधीच काढला आहे, आणि त्यावर कमीत कमी ३२ प्रतिसाद झाले आहेत,
तरीही नवा धागा काढण्याचे प्रयोजन काय असावे बरे? >>>> हो का ? ठाऊक नव्हते. त्या धाग्याचे शीर्षक उद्या काय होणार असे काहीतरी होते. बहुतेक. खास निकालासाठी आहे असे वाटले नाही. अंदाजासाठी आधीच दोन तीन असताना हा आणखी एक असा समज होऊन उघडून पाहिलाही नव्हता.

( २४ तास आधी कुणी निकालाला डेडीकेटेड धागा काढेल असे स्वप्नात देखील येणे शक्य नाही. सकाळी किंवा फार तर रात्री मायबोलीचे ट्राफीक झोपल्यावर लॉजीकल आहे ते )