तुम्ही यंदा मतदान का केले? किंवा का केले नाही?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 May, 2019 - 18:06

यंदा मी तरी मतदान केले नाही.

सुजाण नागरीक झाल्यापासून ही आयुष्यातील दुसरीच वेळ जेव्हा मी मतदान केले नाही.

पहिली वेळ जेव्हा ऑफिसमधून हाल्फ डे कन्सेशन घेऊन मी गर्लफ्रेंडसोबत फिरायला गेलो होतो. या वयात असे बरेच जण करत असावेत. त्याचे तेव्हा काही फार वाटलेही नव्हते.

यावेळी मात्र मी ठरवून कोणालाच मत दिले नाही.

तर का दिले नाही?

मी आजवर सेना-भाजप युती, मनसे, काँग्रेस, अखिल भारतीय सेना, आम आदमी पार्टी, आणि अपक्ष अश्या विविध पक्षांना मत दिले आहे. मी कोणत्याही पक्षाचा झेंडा घेऊन फिरत नाही जे काहीही विचार न करता, उमेदवार कोण काय न बघता, बस्स जावे आणि त्या पक्षाचे चिन्ह असलेले बटण दाबून यावे. मी नेहमी काहीतरी ठरवून आणि विचार करूनच बटण दाबतो. ज्याचा मला अभिमान आहे. पण ते बटण यावेळी दाबले नाही. कारण ....

१) यंदा मला विभागातील एकही उमेदवार मी मत द्यावा या योग्यतेचा वाटला नाही.

२) त्यांचे लीडर, राष्ट्रीय नेतेही या योग्यतेचे वाटले नाहीत.
याला काढा त्याला झाका सारे सारखेच वाटले. देशाची वाट लावण्यास सारेच एकसमान सक्षम वाटले.

३) मित्र म्हणाले की मग वाईटातून त्यातल्या त्यात कमी वाईटाला निवड.
हा मुद्दा योग्य वाटला. पण वाईटातून कमी वाईट निवडायला एका वाईट उमेदवाराच्या समोरचेच बटण दाबणे तत्वत: पटले नाही.

तसेच सध्याच्या परीस्थितीत ईतके सडके आणि जाहीरातबाज राजकारण पाहून मी ईतका गोंधळून गेलो आहे की कोण कमी वाईट आहे हेच समजेनासे झालेय. मग उगाच तो चुकीचा वा अंदाजपंचे निर्णय तरी का घ्यावा?

हे म्हणजे त्या कौन बनेगा करोडपतीमधील पब्लिक पोल सारखे झाले. प्रश्न अवघड असेल तर शंभरातल्या पाच दहा जणांनाच त्याचे उत्तर माहीत असते. पण तरी सारे पब्लिक उत्तर द्यायचा अधिकार आहे म्हणून तो वापरतात आणि A B C D आपल्याला वाटेल ते बटण दाबतात. परीणामी चारही पर्यायांना जवळपास सारखीच टक्केवारी लाभते आणि योग्य उत्तर त्यात दडून जाते. मला तसे होऊ द्यायचे नव्हते. तर ज्यांना अक्कल आहे त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा म्हणून मी माझे मत बाद केले. मतदान केलेच नाही.

वि. नों. - मी मतदान करणार नाही हे आधीच ठरल्याने मी ऑफिसला सुट्टी नको असे कळवले होते. पण ऑफिसने मात्र तू मतदान कर वा नको करूस आम्हाला सरकारी आदेशानुसार सुट्टी द्यावीच लागणार म्हणत माझा अर्ज नामंजूर केला. त्यामुळे त्या दिवशी कामावर जायची ईच्छा असूनही मला घरी बसून सुट्टी उपभोगावी लागली.

असो,
तर ज्यांनी यंदा मतदान केले त्यांनी का केले? आणि ज्यांनी कोणी नसेल केले त्यांनी का नाही केले हे ईथे सांगावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय संबंध या प्रश्नाचा ? टोपणनाव असेल किंवा खरे नाव असेल.
>>>>

संबंध कसा नाही?
जर ती व्यक्ती खरी ओळख देऊन लिहीत असेल तर त्याचवेळी ती मतदान करते अधिक पोलिंग एजंटही बनते हे लपवून ठेवण्यात यशस्वी होत असेल तर मी त्या व्यक्तीचे केलेले कौतुक योग्यच आहे.
उदाहरणार्थ शाहरूख खान ईथे त्याच्या खरया नावाने लिहीत असेल आणि चित्रपट कसे वाईट असतात यावर धागे काढत असेल. पण त्याचवेळी स्वताही चित्रपटात काम करत असेल ईतकेच नव्हे तर सुपर्रस्टारही असेल आणि हे ईथे तो सर्वांपासून लपवून ठेऊ शकला तर हे त्याचे यश नाही का?

पद्म
कुमार यांचा नोटाचा धागा बघा. छान माहिती आहे.
मी देखील आधी नोटाची जुजबी माहिती घेतली होती. सध्या जो नियम आहे त्यानुसार नोटा हा वेळेचा तोटाच आहे. त्यापेक्षा ऑफिसला जाऊन काम केलेले उत्तम. ते काम करून जे कमावले त्यावर कर तरी भरू

मानवमामा, तसा कायदा बदललाच तरी फक्त उमेदवार रद्द होतील. राजकीय पक्षे आणि त्यांची नेतृत्वे तीच राहणार.>>>
उमेदवार बदलतील, बदलेले उमेदवार पक्षाची धोरणे बदलतील, नेतृत्व बदलतील. वेळ लागेल. टप्प्या टप्प्याने होईल.

आणि मतदान करून आले म्हणुन त्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये तरी यायला मनाई नाही, घरून काम करायला मनाई नाही.

ऋन्मेष

तर्कहीन प्रतिसादात मला इंटरेस्ट नाही आणि तेव्हढा वेळही नाही. ना शेंडा ना बुडखा असे युक्तीवाद चालू आहेत. त्यासाठी शुभेच्छा ! ज्या वेळी समजेल तेव्हां समजेल... तोपर्यंत चालू देत.

तरी पण...

अभिषेक नाईक नावाच्या आयडीने जर आत्ता मी मतदान केले नाही असे म्हटले असते तर मला काय समजणार आहे ? मलाच काय जे कुणी भेटलेले नाहीत त्यांना काय समजणार ? ज्यांची ओळख फक्त सोशल मीडीयापुरती आहे त्यांना कोण पोलिंग बूथ एजंट म्हणून काम करते आणि कोण नाही हे कसे समजणारआब्णि तेव्हढी निकड तरी कुणाला आहे ?

उद्या अभिषेक नाईक या आयडीने (काल्पनिक नाव आहे, स्वतःवर ओढवून घेऊ नये) मी मतदान केले नाही असे जाहीर केले आणि प्रत्यक्षात मतदान केलेले असेल, तर....

या वेळी योगायोगाने दीड महीना शाई बोटाला राहील्याने जर कुणी या कालावाधीत त्याला भेटला तर हे बिंग फुटेल अन्यथा नाही. त्यात कौतुक करणे, आणि लपवंणे अभिमानास्पद आहे वगैरे काहीच्या काही युक्तीवाद अगदीच भंकस आणि भंपक वाटले. त्यात काय चर्चा करायची ? कसलंही लॉजिक न लावता केवळ वाद घालण्याला वितंडा म्हणतात.

आणि मतदान करून आले म्हणुन त्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये तरी यायला मनाई नाही, घरून काम करायला मनाई नाही.
>>>>>

नोटाचे बटण दाबायला म्हणजे तिथे येण्याजाण्यात जो वेळ खर्च करावा लागतो त्याबद्दल बोलत आहे. गेल्या दोनेक मतदानांना मला येऊन जाऊन तीन ते चार तास प्रवास करावा लागला. नोटा दाबायला तो करण्यात काही अर्थ नाही. त्या वेळेत काम करणे उत्तम.

किरणुद्दीन,
मी एक शाहरूखचे उदाहरण दिले
तुम्ही त्याच्या तोडीस तोड अभिषेक नाईकचे दिले
जिओ Happy

आता तुमच्या तर्कशुद्ध प्रतिसादाबद्दल बोलूया.
तुमच्या तर्कानुसार समजा मी ईथे मतदान करावे का नाही अशी चर्चा करत असलो तरी प्रत्यक्षात मी स्वत: मतदान केले असण्याची शक्यता आहे. किंबहुना पोलिंग एजंटही असण्याची शक्यता आहे. चला मी तर म्हणतो मी या निवडणूकीतील एक उमेदवारच का असेना..... पण प्रामाणिक पणे सांगा. याने काही फरक पडणार आहे का? काही का असेना, चर्चेतून मिळणारी माहिती आणि निष्पण्ण तेच राहणार आहे. त्यामुळे माझ्यामते तरी अशी बिनकामाची डिटेक्टिव्हगिरी आणि नोटाचे बटण दाबण्यात वेळ खर्च करणे हे तार्किकदृष्ट्या सम समान आहे Happy

पुन्हा एकदा असंबद्ध प्रतिसाद. सर्वात पहिला माझा जो प्रतिसाद आहे तो भरकटवून त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न झाला आहे. आता त्या भरकटण्याला रूळावर आणले तर स्वतःवर घेऊन डिटेक्व्टीव्हगिरीचा आरोप लावणे चालू आहे. मुळात पहिला प्रतिसाद भरकटावाच का ? त्यात तर कुणाचे नाव घेतलेले नाही ना ?

आमच्या एका मित्राबाबतचा किस्सा धाग्याच्या विषयाशी जुळत असल्याने इथे दिला इतकेच. त्यात एव्हढी डिटेक्टीव्हगिरी करणे किंवा फालतूचा स्मार्टनेस दाखवणे अनावश्यक होते.
( हे उत्तरही अनावश्यकच आहे. बिनबुडाच्या प्रतिसादाला खरे तर इग्नोर मारणे हाच उपाय असू शकतो)

आमच्या एका मित्राबाबतचा किस्सा धाग्याच्या विषयाशी जुळत असल्याने
>>>>>

किस्सा धाग्याशी जुळत होता पण त्यालाच धरून झालेली चर्चा अवांतर कशी? Happy

किस्स्याच्या शेवटी आपणच लिहिलेत आता याला काय बोलणार? मी आपल्या ईच्छेला मान दिला आणि बोललो ईतकेच.
मला आवडते बोलायला आणि लोकांच्या मनातील शंका दूर करायला.
पण कोणी ताकाला येऊन भांडे लपवत असेल तर मजा येत नाही.

कोणतीही गोष्ट दान केल्याने पुण्य आणि समाधान मिळत भाऊ
म्हणून केलं मत - दान
आता तोच निवडून आला तर समाधान

मी मतदान करून ऑफिसला गेलो, सुट्टी असून सुद्धा. दुसऱ्या दिवशी इतर लोक माझ्याकडे परग्रहावरचा माणूस असल्यासारखे बघत होते. मी मतदान केले कारण मी मत दिलेले व्यक्ती किती मतांनी जिंकून
आली किंवा किती मतांनी हरली याची नोंद करायची आहे. जर त्या व्यक्तीने चांगले काम केले तर योग्य व्यक्तीला जिंकून देण्यात हातभार लावल्याचे समाधान आणि जर वाईट काम केले तर त्या व्यक्तीचे नाव माझ्या लिस्ट मधून बाद. एवढा साधा विचार केला मतदान करण्यासाठी.

@ मत दान - यातील दान हा शब्द ऐकायला छान वाटतो म्हणून आहे. प्रॅक्टीकली ते दान नाहीये.

@ किल्ली,
खरे आहे. मलाही त्याचेच वाईट वाटले ईंकवाला सेल्फी अपलोड करायची संधी हुकली.
गेल्यावेळी सचिन तेंडुलकरसोबतचा सेल्फी अपलोड केलेला.

@ गोल्डफिश,
मला ऑफिसला ईच्छा असून येऊ दिले नाही. काय तर मी मतदान केले नाही याचे कारण ऑफिसने सुट्टी दिली नाही अशी कंपनी कचाट्यात फसायला नको म्हणून.

@ किरणुद्दीन,
हो किंवा नाही. ते परीस्थितीवर अवलंबून आहे. मागच्या पुढच्या पोस्टींचा संदर्भ काय आहे त्यावर ते ठरते.

मी मतदान करायला गेलो तर सगळे पक्ष माझ्याजवळ आले आणि बोकलतभाई कसे आहात अशी विचारपूस करून मिठी वैगरे मारायला लागले. मला बोलले भाई अख्या गावाने नाय केला आम्हाला मतदान तर चालेल पण तुम्ही कराच. मला मस्त थंड कोल्ड्रिंक वैगरे दिला. मग मी मतदान करायला जात होतो तेव्हा माझ्या मार्गावर गुलाबाच्या पाकळ्या अच्छादल्या जात होत्या. मी मतदान रूममध्ये गेलो तेव्हा बाकीचे पक्ष पण तिथे आले आणि मी कोणाला मतदान करतोय हे पाहायला लागले. मी एका उमेदवाराचे बटन दाबायला गेलो कि बाकीचे पक्ष रडायला लागायचे, भाई नको तुमच्या पाया पडतो असं नका करू बोलायचे, काही काहींना तर चक्कर येऊन तिथेच कोसळले. मग मी सगळ्या उमेदवारांची बटणं एकाच वेळी दाबून माझं मतदानाचं कर्तव्य पार पाडलं.

पहिल्यापासून सगळ्या पोस्टी चिकटवून पहायच्या का भऱकटवण्याला कुठून सुरूवात झाली ते. आता एव्हढे झालेच आहे तर शेवटालाच नेऊ की...

सोशल मीडीयावरचा एक भोसरीचा मित्र आहे. सन्माननीय भोसरी निवासी आहे. हा मनुष्य गेली कित्येक वर्षे निवडणुका झाल्या की मतदान करावे का ? का करावे ? काय मिळते अशा अर्थाच्या चर्चा सोशल मीडीयात सुरू करत असतो. या वेळी मात्र त्याच्या बोटावरची शाई मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि मतदानाच्या संध्याकाळी त्याची मतदान का करावे या अर्थाची पोस्टही. पठ्ठ्या दर वर्षी मतदान तर करतोच पण बूथ एजंट म्हणून कामही करतो अशी माहिती त्याच्या भोसरीच्या मित्रांनी दिली.

काय बोलायचं आता याला ? ‍ >>>>>

^^^^^^^^^^^^^^
हा मूळ प्रतिसाद. या प्रतिसादाचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. याला उत्तर काय़ दिले गेले आहे ते बघूयात.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

काय बोलायचं आता याला ?
Submitted by किरणुद्दीन on 19 May, 2019 - 12:14

>>>>

मास्टरमाईंड बादशाह जेम्स बाँड झिरो झिरो सेव्हन.
आपण मतदान करतो ईतकेच नाही तर त्या दिवशी पोलिंग एजंट म्हणून काम करतो याचा थांगपत्ता ईतकी वर्षे त्याने एकालाही लागू दिला नाही Happy

जोक्स द अपार्ट, आपला मुद्दा स्पष्ट होत नाहीये त्या पोस्टमधून.

^^^^^^^^^^^^

या प्रतिसादाचा मूळ प्रतिसादाशी काय संबंध आहे ?
मूळ प्रतिसादात सोशल मीडीया आणि रिअल लाईफ असा स्पष्ट उल्लेख आहे. तर मग त्याने एकालाही लागू दिला नाही म्हणजेच रिअल लाईफ मधेही कुणालाच पत्ता लागू दिला नाही असा अर्थ संबंधित लेखकाने कशाच्या जोरावर काढला आहे ?

बरं, चुकीचा अर्थ काढलाच आहे पण त्यावर पुढे वितंडवाद ही सुरू ठेवलेला आहे.
आणि यात मुद्दा स्पष्ट व्हायचं काय कौतुक आहे ? ती कमेण्ट अगदी स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात आहे.
‌‌‌‍‌‌‌‌

मूळ प्रतिसादात सोशल मीडीया आणि रिअल लाईफ असा स्पष्ट उल्लेख आहे. तर मग त्याने एकालाही लागू दिला नाही म्हणजेच रिअल लाईफ मधेही कुणालाच पत्ता लागू दिला नाही असा अर्थ संबंधित लेखकाने कशाच्या जोरावर काढला आहे ?
>>>>>>>>>

सोशल मिडीया म्हणजे काही वेगळे जग असते का हो? ज्या जगाचा रिअल लाईफशी संबंधच नाही असे? म्हणजे शाहरूख खान हा आपल्या शाहरूख खान या खरयाखुरया नावाने आणि खरयाखुरया फोटोने जर सोशलसाईटवर वावरू लागला तर तुम्हाला समजणारच नाही का हा तोच शाहरूख खान आहे जो बॉलीवूडचा सुपर्रस्टार आहे... खरंच??

Pages