Submitted by प्रांजलीप्रानम on 12 May, 2019 - 12:22
आई
आईची आठवण
मनातली आठवण
जपायची नुसती
काळाचा घात
परिस्थितीवर मात
करायची किती?
भावनांचा अव्हेर
आसवांचा पूर
कायमचा सोबती
हे होणं अगतिक
करावा कुठे शोक
दुरावलेली नाती
हे असे हेवेदावे
वाट्याला का यावे
कुठली ही नीती?
तिन्ही जगास या तारी
परि आईविना भिकारी
जगात ही ख्याति
त्रिखंडात हे खरं
तिच्या प्रेमाची सर
आहे कुठे या जगती?
तिच्या स्पर्शाचा ओलावा
कधीतरी तो मिळावा
स्वप्नातली भटकंती
......प्रांजली
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर लिहिलंय! पुलेशु!
सुंदर लिहिलंय! पुलेशु!
धन्यवाद!
धन्यवाद!
सुंदर लिहिलंय, पण स्वप्नातील
सुंदर लिहिलंय, पण स्वप्नातील भटकंतीच्या जागी काही वेगळं असायला हव होतं असं प्रकर्षाने वाटतंय!
'स्वप्नातली भटकंती 'चे कारण
'स्वप्नातली भटकंती 'चे कारण 'ती नाहीये'म्हणून. तिच्या नसण्याची सल आहे ही.