Submitted by Nilesh Patil on 11 May, 2019 - 13:13
--संवाद--
समुद्राच्या लाटांसह चंद्र माझ्या सोबत,
मी यांच्याशी एकट्यात करतोय संवाद,
हो संवाद,दुःख वाटून घेणारा संवाद..।
त्या संवादात असते प्रेमपूर्वक आपुलकी,
संवादात विषय असतो सुख अन् दुःखाचा,
धगधगत्या अन् उफळत्या अंतरी दुःखाचा..।
याच लाटा मला देताय आधार व दिलासा,
मला शिकवताय जीवन जगण्याची कला,
त्या मला सांगताय बिनधास्तपणे हसायला..।
लाटेसोबत गार हवा माझ्याशी बोलत आहे,
तीही माझ्या सैरभैर जीवाला साथ देत आहे,
तीही माझ्यासोबत खळखळून हसत आहे..।
आम्ही दोघे या समुद्राकाठी निवांत बसलोय ,
हो आम्ही दोघे,ही गार शांत हवा आणि मी,
आमच्यासोबत येथे चंद्रही साक्षीला आहे..।
--निलेश पाटील,--
--पारोळा, जि-जळगाव--
--मो.९५०३३७४८३३--
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
धन्यवाद
धन्यवाद