5-6 पोतोल (परवल / pointed gourd)
100 gram दही
बेसन (1 छोटा चमचा)
आले लसून पेस्ट (1 छोटा चमचा)
2 teaspoons खसखस (थोड्या पाण्यात बारीक वाटून) (पोस्तो)
2 teaspoons मोहरी पूड
1/4 teaspoon जीरे
1/4 teaspoon हिंग
1/2 teaspoon जीरेपूड़
1/2 teaspoon धणेपूड
1/2 teaspoon हळद
1/4 teaspoon लाल तिखट
1/4 teaspoon गरम मसाला पावडर
तेल (preferably सरसों)
1 teaspoon साखर
मीठ - चवी नुसार
1. परवलची साले काढून त्यांना उभ्या चिरा देऊन आतील बिया काढून टाका. त्यावर हळद व मीठ घालून 10 मिनिटे मँरिनेट होऊ द्या.
2. एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात परवल शँलो फ्राय करून घ्या व बाजूला काढून ठेवा.
3. त्याच तेलात हिंग व जीरे घालून ते तडतडल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घाला.
4. आले लसूण पेस्टचा कच्चा वास गेलाकी त्यात खसखशीची पेस्ट (पोस्तो) थोड्या पाण्याबरोबर घालून चांगले परतून घ्या.
5. आता गरम मसाला सोडून इतर सर्व मसाले घालून नीट मिसळून घ्या व 2 मिनिटे परतून त्यात तळलेले परवल घाला. मीठ घालून मिसळून घ्या.
6. एका भांड्यात दही आणि बेसन थोडी साखर घालून
कालवून घ्या आणि ते मिश्रण कढईत घालून परवल चांगले माखून घ्या. गरज पडल्यास थोडे पाणी घाला.
7. आता झाकण ठेवून मंद आचेवर वाफ येऊन तेल सुटेपर्यंत शिजू द्या.
8. साधारण 5 मिनिटे झाली की झाकण काढून त्यात गरम मसाला आणि मोहरी पूड घालून परवल मऊ होईपर्यंत शिजू द्या.
9. दोई पोतोल पोस्तो तयार आहे. गरम गरम भाता बरोबर सर्व्ह करा.
हा पारम्परिक बंगाली पदार्थ आहे. निरामिष असल्याने पूजा - व्रत वगैरे असेल तर आवर्जून करतात.
(No subject)
आणले
आणले
अरे खूप दिवसांनी वर आली ही
अरे खूप दिवसांनी वर आली ही पाककृती. BC नक्की करून बघा. इथे खूप वेगवेगळ्या पद्धती संकलीत झाल्या आहेत
पर्वल शॅलो फ्राय केले
पर्वल शॅलो फ्राय केले
मग थोडे गवारी आणि भेंडीही फ्राय करून घातले
फोडणीत थोडे बडीशेपही कुटून घातले
मस्त झाली होती.
असे पर्वल भाजून मग साल काढून गर क्रश करून भरीत करतात म्हणे
रेसिपी छान.
रेसिपी छान.
ब्लैककैट..डिश तोंपासु आहे.
ब्लॅककॅट , छान फोटू
ब्लॅककॅट , छान फोटू
ब्लॅक कॅट..जबरी फोटो..
ब्लॅक कॅट..जबरी फोटो..
ब्लॅक कॅट... जबरी जमलेली
ब्लॅक कॅट... जबरी जमलेली दिसतेय भाजी. !
Pages