दोई पोतोल पोस्तो (पारम्परिक बंगाली पाककृती )

Submitted by मनिम्याऊ on 7 May, 2019 - 14:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

5-6 पोतोल (परवल / pointed gourd)
1-250x250.png
100 gram दही
बेसन (1 छोटा चमचा)
आले लसून पेस्ट (1 छोटा चमचा)
2 teaspoons खसखस (थोड्या पाण्यात बारीक वाटून) (पोस्तो)
2 teaspoons मोहरी पूड
1/4 teaspoon जीरे
1/4 teaspoon हिंग
1/2 teaspoon जीरेपूड़
1/2 teaspoon धणेपूड
1/2 teaspoon हळद
1/4 teaspoon लाल तिखट
1/4 teaspoon गरम मसाला पावडर
तेल (preferably सरसों)
1 teaspoon साखर
मीठ - चवी नुसार
IMG_20190507_232437.JPG

क्रमवार पाककृती: 

1. परवलची साले काढून त्यांना उभ्या चिरा देऊन आतील बिया काढून टाका. त्यावर हळद व मीठ घालून 10 मिनिटे मँरिनेट होऊ द्या.
IMG_20190507_205022.JPG
2. एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात परवल शँलो फ्राय करून घ्या व बाजूला काढून ठेवा.

3. त्याच तेलात हिंग व जीरे घालून ते तडतडल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घाला.

4. आले लसूण पेस्टचा कच्चा वास गेलाकी त्यात खसखशीची पेस्ट (पोस्तो) थोड्या पाण्याबरोबर घालून चांगले परतून घ्या.

5. आता गरम मसाला सोडून इतर सर्व मसाले घालून नीट मिसळून घ्या व 2 मिनिटे परतून त्यात तळलेले परवल घाला. मीठ घालून मिसळून घ्या.
6. एका भांड्यात दही आणि बेसन थोडी साखर घालून
कालवून घ्या आणि ते मिश्रण कढईत घालून परवल चांगले माखून घ्या. गरज पडल्यास थोडे पाणी घाला.
7. आता झाकण ठेवून मंद आचेवर वाफ येऊन तेल सुटेपर्यंत शिजू द्या.
8. साधारण 5 मिनिटे झाली की झाकण काढून त्यात गरम मसाला आणि मोहरी पूड घालून परवल मऊ होईपर्यंत शिजू द्या.
9. दोई पोतोल पोस्तो तयार आहे. गरम गरम भाता बरोबर सर्व्ह करा.
IMG_20190507_204940.JPG

वाढणी/प्रमाण: 
2
अधिक टिपा: 

हा पारम्परिक बंगाली पदार्थ आहे. निरामिष असल्याने पूजा - व्रत वगैरे असेल तर आवर्जून करतात.

माहितीचा स्रोत: 
कलिग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त !! इथे(जर्मनी त ) मिळते हि भाजी पण त्याचं काय आणि कसं करायचं माहित नसल्याने कधी आणली नाही .. आता आणून बघेन .. मला ती आधी जून झालेली तोंडली आहेत असं वाटायचं
निरामिष म्हणजे काय ????>> आमिष नसलेली म्हणजे मांस नसलेली ..

आभार सर्वान्चे.
<<इथे(जर्मनी त ) मिळते हि भाजी पण त्याचं काय आणि कसं करायचं माहित नसल्याने कधी आणली नाही .. आता आणून बघेन .. मला ती आधी जून झालेली तोंडली आहेत असं वाटायचं>>>
नक्की करून पहा. खूप छान चव असते.

मस्त पाकृ! फोटो तोंपासु! कालच मीठ हळद लावून तळतात आसामात तसे केले होते... आता अशी करून पाहीन.

मस्त रेसिपी. ही. भाजी कधी आणली नाहीए पण फोटो एवढा तोंपासू दिसतोय की एकदा करून बघणार नक्की.

अगदी पारंपरिक. मस्त आहे रेसिपी.
दही आणि बेसन चांगले फेटून घ्यायचे.
भाजीत घालताना मोठा एक चमचा दही घालून चांगले हलवायचे. मग परत एक-एक चमचा आणि हलवणे.
याने भाजीत दही फाटत नाही.
निरामिष म्हणजे फक्त शाकाहारी नव्हे तर कांदा, लसूण, मसूर डाळ इ. तामसी काहीही नसलेले.

ही. भाजी कधी आणली नाहीए पण फोटो एवढा तोंपासू दिसतोय की एकदा करून बघणार नक्की.
Submitted by किट्टु२१ on 8 May, 2019 - 18:33><>

नक्की करून बघा

<<
हलवायचे. मग परत एक-एक चमचा आणि हलवणे.
याने भाजीत दही फाटत नाही.
Submitted by chioo on 8 May, 2019 - 19:22>>

अत्यंत उपयोगी सूचना. खूप खूप आभार
<<
निरामिष फक्त शाकाहारी नव्हे तर कांदा, लसूण, मसूर डाळ इ. तामसी काहीही नसलेले.>> +1

निरामिष म्हणजे सात्विक भोजन

Amisha i.e. आमिष is a Sanskrit word that means meat, flesh, etc. Bengali borrowed this word from there. Hence:

Samish-सामिष = स+आमिष = with meat i.e. non-veg.

Niramish-निरामिष = निर्+आमिष = without meat i.e. veg.

This nomenclature is used in Marathi as well.

आंजावरून साभार.

Thanks for the info Devki tai.
तर मग आमिषा (पटेल घराण्याची सुकन्या) नावाचा काय अर्थ होईल ? -- मांसाहारी स्त्री असा?

छान पाककृती.
<<इथे हि भाजी पण त्याचं काय आणि कसं करायचं माहित नसल्याने कधी आणली नाही .. आता आणून बघेन .. मला ती आधी जून झालेली तोंडली आहेत असं वाटायचं>>>+१ मलाही तसेच वाटायचे. एकदा मी हे परवल आणले होते. पण कसे करावे कळेना. मग भरली वांगी करतात तसे भरले परवल केले. Happy

प्रकरण छान दिसतंय.
या परवलची मिठा ई विष्णू मनोहर यांनी कलर्सवरच्या कुकरी शोमध्ये दाखवली होती.
परवल उकळताना पाण्यात काहीतरी घातल्याने ते पारदर्शक झालं होतं आणि सुंदर रंग आला होता.

पडवळाच्या किंवा तोंडल्याची काचऱ्या करतात तशी या परवलांची परतून भाजी करता येते का ? कोणी केली असल्यास सांगा ना मला

हो , काचर्या करून करतात , भेंडीसारखी परतून करायची<<थँक्स .. मग आता दिसली भाजी कि झडप घालते!!.. एकदा अशी अन एकदा तशी करून बघेन

काचर्‍या करून? मी आजवर कधी ऐकली नाहीये. अगदी कोवळी सोडली तर आत टणक बिया असतात की. काचर्‍या करताना जरा अवघडच जाईल असं वाटतंय
शेंडा बुडखा थोडा थोडा छाटून तीन किंवा चार जाड काचर्‍याच्या दिशेने चिरून घेऊन बटाट्याबरोबर रस्सा होतो. तसंच उभे चार भाग करून ते परतून पण भाजी होते (खसखशीचं वाटण लावायचं). चार भागाऐवजी उभं दोन भागाच चिरून घेतलं तरी चालतं.

वरची पाकृ रोचक वाटली. आम्ही दोई पोटोल, शोरषे पोटोल (मोहोरी लावून) किंवा पोस्तो पोटोल वेगवेगळं रांधतो. एकत्र कधी कुठे खाल्लं नाहीये. चवींची जरा जास्तच गर्दी होईल असं वाटतंय.

वरदा :*आम्हीही काचऱ्याच करतो. शेंडा बुडखा थोडा काकडी सारखा कापून मग सालं सोलाण्याने काढतो. अर्थात आतील बिया कोरून काढायच्या. मग अर्ध वर्तुळाकार बारीक चिरून परतायची भाजी. बटाटा व्यंजन म्हणून. चोरटी होते परतल्यावर. पण चांगली खमंग लागते.

आम्हीही काचऱ्याच करतो. शेंडा बुडखा थोडा काकडी सारखा कापून मग सालं सोलाण्याने काढतो. अर्थात आतील बिया कोरून काढायच्या>>> इथपर्यंत आम्हीही असेच करतो, मग त्याच्या लहान फोडी करायच्या अन झणझणीत तिखट अन कांद्याच्या फोडणीत परतायचे, मग त्यात थोडे पाणी अन भिजवलेली चणाडाळ घालून शिजवायचे. रस्सा पूर्ण आटवायचा नाही पण पातळ पण नको. खूप छान लागते ही भाजी. फक्त तेल अन तिखट मसाला घालताना कंजूसी करायची नाही☺️

छान रेसिपी. करून बघेन..पण आलं लसूण असताना निरामिष कशी? की सणा-वाराला आलं लसणाशिवाय करतात?

पडवळाच्या किंवा तोंडल्याची काचऱ्या करतात तशी या परवलांची परतून भाजी करता येते का ? कोणी केली असल्यास सांगा ना मला >> आलू-परवल होतो ना..
परवलाची साले काढून उभ्या फोडी करून घ्यायच्या, मधल्या बिया काढायच्या आणि बटाटेही तसेच उभे चिरून घ्यायचे. तेलाची जिरे घालून फोडणी करायची. त्यात थोडी हळद-तिखट घालायचं आणि परवल-बटाटे घालायचे. जरा परतून घ्यायचे. मग त्यावर आमचूर पूड, मीठ घालायचे. पुन्हा परतायचे. झाकण घालायची गरज नाही...तसेच परतत रहायचे बारीक गॅस वर. ..भाजी होत आल्यावर गरम मसाला घालायचा. भाजी तयार. छान लागते.

मस्त रेसिपी. फोटोही सॉलिड.

आम्ही परवर म्हणतो आणि काच-या करतो, बरेचदा कोवळी मिळतात पण जुन असतील तरी काचऱ्या छान होतात. खरपूस करायच्या, जरा करपलेल्या टेस्टी लागतात. अतिशय पौष्टिक असतात परवर. फक्त बिया काढतो आम्ही, सालेही नाही काढत. फोडणी तिखट मीठ, फक्त या तीन गोष्टीवर पण छान होतात. बाकी कढीलिंब, कोथिंबीर, दाण्याचे कुट, ओलं खोबरं, आलं लसूण मिरची ठेचा घातला तर अजून बहारदार. बरेचदा फोडणी, तिखट मीठ आणि थोडी मिरपूड हे घालून करते मी.

शिजतात, पाण्याचा हबका मारून झाकण ठेवते. किंचित कमी शिजल्या तरी आवडतात आम्हा दोघांना. खूप शिजवून रस्सा करायचा असेल तर भाजी कुकरमध्ये एक किंवा दोन शिट्या काढायच्या. तसं केलं नाही कधी.

अरे व!! बऱ्याच रेसिपी (रेसिप्या Happy ) आल्या कि .. आता फक्त परवर मिळायला हवं .. "हे परवरदिगार" , मिळूदेत लवकर एकदाचे परवर मला"

Pages