Submitted by कटप्पा on 27 April, 2019 - 11:51
काय तू गेम ऑफ थ्रोन्स पहिला नाहीयस? अरे रे.. काय फायदा तुझ्या आयुष्याचा??
असली वाक्ये ऐकून कंटाळलोय.
अरे नाही बघत आणि बघायचा पण नाहीय तुमचा गेम ऑफ थ्रोन्स, आवड आपली आपली।
एक दोन एपिसोड बघितले, नाही इंटरेस्टिंग वाटत, आता काय जीव घेणार का.
हा धागा तमाम गेम ऑफ थ्रोन्स हेटर्स ना समर्पित।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी हेटर्स मध्ये वगैरे नाही
मी हेटर्स मध्ये वगैरे नाही पण 1 एपिसोड बघून परत बघावसं नाही वाटलं..
हा धागा लवर्स कसा गाजवतील ते
हा धागा लवर्स कसा गाजवतील ते बघाच...
https://youtu.be/aa8lSVY3O6s
https://youtu.be/aa8lSVY3O6s
जी ओ टी सेल्समन बघा
अज्ञातवासी+१११११ बटाटयासारखंच
अज्ञातवासी+१११११ बटाटयासारखंच होणार ह्या धाग्याचंपण.हेटर ऐवजी पंखे जास्त!
"गेम ऑफ थ्रोन्स", हे काय
"गेम ऑफ थ्रोन्स", हे काय असतं?
हा धागा लवर्स कसा गाजवतील ते
हा धागा लवर्स कसा गाजवतील ते बघाच...
>>> +1
एकच सिझन बघितला आणि दहापैकी
एकच सिझन बघितला आणि दहा तासपैकी थोडासाच भाग खरोखरच आवडला. s01e07 आणि e08 किंग्ज लँडिंगमधले सीन: राजा रॉबर्ट मेल्यानंतरचा दरबारातील शह-कटशह, नेडला बंदी बनवणे, सान्साला पकडणे, आर्याचे पळून जाणे वगैरे.
हेटर नसले तरी अद्याप फॅनदेखील नाही.
S3e9 पर्यंत बघा. ही बिंज
S3e9 पर्यंत बघा. ही बिंज सिरीयल नाही माझ्या मते ( मी बिंज करतच बघतोय). एकदा बघणेबल आहे, अजून मी फॅन म्हणवुन घेण्याइतपत लेव्हलला पोचलो नाही.
फोमो यायला लागली म्हणून चालू केली.
हेट करण्यासारखे काही वाटले नाही. हाईप आहे, आवडली नाही ठीक आहे. हेट का बरं?
पहिला भाग पाहिला. पुढे
पहिला भाग पाहिला. पुढे बघावासा नाही वाटला आणि आवडेपर्यंत बघायची इच्छा नाही
Why so much hate bro? We need
Why so much hate bro? We need to fight together. the Night King is about to attack..
You know nothing.......... cutappa.
क्युटप्पा ☺️..लोल
क्युटप्पा ☺️..लोल
लव्हर्स आणि हेटर्स दोन्हीत
लव्हर्स आणि हेटर्स दोन्हीत नाही.
मी गेम ऑफ थ्रोन्स पाहीले नाही. हे जग मला माफ करेल का ?
मला जगण्याचा अधिकार आहे काय ?
किती टुकार धागे काढाल अप्पा
Hodor च्या लॉजिकनुसार
किती टुकार धागे काढाल अप्पा
कि टुका धा प्पा
क टु धा प्पा
कटप्पा
नवीन Submitted by बोकलत on 28
नवीन Submitted by बोकलत on 28 April, 2019 - 13:24. >>>>>>>
या एका लॉजीक पायी तुम्हाला मेन्साची मेम्बरशीप घरी येऊन देऊ करतील
काय असतं गेम ऑफ थ्रोन्स ?
काय असतं गेम ऑफ थ्रोन्स ?
काही नावे गेम ऑफ थ्रोन्स मधील
काही नावे गेम ऑफ थ्रोन्स मधील कॅरेक्टरस ची. जी मराठीत केली आहेत.
ब्रॅन : कोंडाजी राव
हिमगौरी: हिम गौरी
सरसी: सु शिला
जॉन स्नो/ अएगोनः आदित्य का विचारू नका आपले मला वाटले म्हणून.
जेमी लॅनिस्टरः जयवंतराव
टिरिअन लॅनिस्टरः बारीकराव
टायविन : आण्णा
मार्जरी: माधुरी
खाल द्रोगो: कालदुर्ग
रामसी बोल्टनः दुर्योधन
देनेरिसः धनश्री
आर्या: आर्याच नाव बेस्ट आहे पण मराठीत आदिति अश्विनि सुद्धा आवडेल
नेड स्टार्कः नाथाजी
केटलिन स्टा रकः कालिंदी बाई किंवा इंदुमति
ब्रिन ऑफ टार्थः विनिता किम्वा वंदना
जिली का गिली: गीता
सॅमवेल टार्ली: सुधीर
बारीक राव की बुटके राव
बारीक राव की बुटके राव
Games of throns का बघावा?
Games of throns का बघावा? तेही जाणकारांनी सांगा..
Games of throns का बघावा?
Games of throns का बघावा? तेही जाणकारांनी सांगा..
>> किमान माझ्यापुरता तरी , आपल्याला आतापर्यंत सरळ सोट Good Vs Evil पहायची सवय आहे .
राम पांढरा ... रावण काळा
पांडव पांढरे ... कौरव काळे (कोण म्हणाले रे ते द्रोण, भीष्म , कर्ण , दुर्योधन कपटाने मारेल , धर्म आहे तो )
गेला बाजार सनी देओल पांढरा ... अमरीष पुरी काळा
म्हणूनच कदाचित सगळेच करडे (ग्रे) असलेला GoT मला जास्त अपील करतो इथे कुणीच रूढार्थाने हिरो किंवा व्हिलन नाही , So I can relate with them more.
Games of throns का बघावा?
Games of throns का बघावा? तेही जाणकारांनी सांगा..>>> हिमालयातपण व्हाईट वॉकर्स राहतात, कधीही आपल्यावर आक्रमण करू शकतात, आक्रमण झालं तर लढा कसा द्यायचा यासाठी तुम्हीपण सुरवात करा बघायला.मी मोदींना पत्र लिहिलंय तिथे लवकरात लवकरात मोठी वॉल बांधा. तसेच मी ड्रॅगन ग्लास, वलारीयन स्टील कुठे मिळतेय का याचा शोध घेतोय, शोध लागला तर कळवेनच.
Games of throns का बघावा?
Games of throns का बघावा? तेही जाणकारांनी सांगा..
>>>सगळे बघतात म्हणून ☺️
लंच टेबलवर/ मायबोलीवर/
लंच टेबलवर/ मायबोलीवर/ लोकांशी बोलताना/ जोक करताना गॉट चे संदर्भ येऊ लागले की फिअर ऑफ मिसिंग आउट वाटू लागलं.
रोज काय बघायचं?? हा आ वासून उठलेला प्रश्न अशी भली मोठी सिरीयल मिळाली की दोन अडीच महिने डोके वर काढत नाही.
आणि ह्या सिरीयल मध्ये स्ट्रॉंगली न आवडण्या सारखं काही नाही. हा जॉनरा आवडतो. सो बघतोय. यातलं काही नसेल तर नाही बघितली तरी काही बिघडणार नाही.
काल पुढचे पाच भाग पाहिले ie
काल पुढचे पाच भाग पाहिले ie s02e05 पर्यंत. अजूनही मालिका पकड घेत नाहीय. हे असेच चालू राहिले तर संपेपर्यंत मी हेटर्सक्लबमधे सामिल व्हायची शक्यता भरपूर आहे
पण उच्चतम प्रॉडक्षन
पण उच्चतम प्रॉडक्षन व्ह्लॅल्यूज व कथा वस्तु ह्या साठी बघा नक्की. काही काही एपिक सीन्स तर सिनेमां मधूनही नाहीत. ते आय मॅक्स वर बघायला हवेत असे फार वाटते. लहान पणी चांदोबा वाचला असेल तर कथा काय फारशी वेगळी नाही. आटपाट नगरे होती अशी सुरुवात आहे.
काही भाग अॅडल्ट वाटू शकतो. पण ते वैयक्तिक रुची वर आहे. कथेच्या ओघा तच सर्व येते.
आज मोठी लढाई आहे मी देव पाण्यात ठेवून बसले आहे. आठ ला बघेन.
हो हो मालिका पूर्ण बघणारतर
हो हो मालिका पूर्ण बघणारतर आहेच. पाचही पुस्तकं वाचायचा विचारदेखील सध्यातरी आहेच. प्रोडक्शन व्हॅल्यू, कास्टिंग, अभिनय वगैरे उत्तम आहे, त्याबद्दल काहीच शंका नाही. पण...
कोणा एका/अधिक व्यक्तिरेखेने माझ्या मनावर पकड घेतलीय, I am rooting for someone किंवा सिंहासनाच्या स्पर्धेत कोण जिंकणार याची फार उत्सुकता लागलीय असं काही अजूनही (१५ तासांनंतरही) झालं नाहीय....
अजून खलिसी आली नाही का?
अजून खलिसी आली नाही का?
मला कुठलीही मालिका, सिनेमा
मला कुठलीही मालिका, सिनेमा मधूनच पहायला आवडत नाही. गेम्स ऑफ थ्रोन्स ज्या वेळी नवीन असेल त्या वेळी माझ्याकडे प्राईम, नेटफ्लिक्स नव्हतं. (यांची भारतातील एण्ट्रीच अलिकडची आहे). एक काळ असा होता की अरेच्चा, हे असलं काही आपण पाहीलेलं नाही म्हणजे आपण जगासोबत नाही कि काय असं वाटू लागायचं. तसं आता काही एक नाही.सहज उलपब्ध असेल तर पहायला काहीच अडचण नाही.
अवांतर आहे.... एकाने मला स्पार्टाकस पहायला सांगितली. स्पार्टाकस सिनेमाही पहायचा राहून गेल्याने पहायला घेतली. मला अक्षरशः नॉशिया आला. केव्हढा रक्तपात आहे. असं नाही की आपल्याला हिंसा पहायची सवय नाही. पण यात अगदीच विकृत दृश्य आहेत हिंसेची. दोन तीन या प्रकारचे हीलिवुडी सिनेमे पाहीले होते. त्यातही रोमन गुलामांची युद्धं होती. पण असं कधीच वाटलं नाही.
आणि सेक्स. इथेही असंच. सेक्स पहायची सवय नाही किंवा आवडत नाही असं अजिबातच नाही. पण हे काय आहे राव ? उगीच ओढूनताणुन सॉफ्ट पॉर्न गळ्यात मारलंय. चार भाग पाहू शकलो. पुढचे दोन पळवत पाहीले सगळं तसलंच आहे हे लक्षात आलं. मग बंद केली पहायची. सुरूवातीला वेगळे पण असल्यानेवेबसीरीज ब-या वाटल्या. मालिकांचा स्तर भयाण असल्याने त्याच्या तुलनेत चांगल्याच वाटणार. पुढे पुढे वेबमालिकांमधे सुद्धा पाट्या टाकणे सुरू होईल की काय असे वाटते.
सेक्स पहायची सवय नाही किंवा
सेक्स पहायची सवय नाही किंवा आवडत नाही असं अजिबातच नाही
>>> ☺️
आवडत नाही म्हणायला हवंय का
आवडत नाही म्हणायला हवंय का च्रप्स ?
मी मोदींना पत्र लिहिलंय तिथे
मी मोदींना पत्र लिहिलंय तिथे लवकरात लवकरात मोठी वॉल बांधा. तसेच मी ड्रॅगन ग्लास, वलारीयन स्टील कुठे मिळतेय का याचा शोध घेतोय, शोध लागला तर कळवेनच.
>>> म्हणजे वॉल बांधायचं कंत्राट अम्बानींनाच मिळणार. हेच ते हेच म्हणूनच आम्ही मोदीविरोधात असतो बरं.
किरण, घे रे बाबा. मार्कं दे मला.
Pages