शहीद हेमंत करकरे, आम्हांला क्षमा करा

Submitted by भरत. on 20 April, 2019 - 09:47

शहीद हेमंत करकरे , आम्हांला क्षमा करा.

२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री तुम्ही हेल्मेट चढवून जीपमध्ये बसताना टीव्हीवर दिसलात. त्यानंतर काही मिनिटांतच तुम्ही दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडल्याची बातमी पाहिली.
आज त्या घटनेला साडेदहा वर्षं होत असताना पुन्हा एकदा अनेक लोकांकडून तुम्हांला मारलं जाताना पाहतोय.
मालेगाव बाँबस्फ़ोट प्रकरणी ज्या प्रज्ञासिंह ठाकुरला तुम्ही अटक केली होती, तिने तीन दिवसांपूबाँब, १७ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच दिवशी भाजपने तिला मध्यप्रदेशा तील भोपाळ येथून लोकसभेची उमेदवारी दिली.
दोन दिवसांनंतर "अबकी बार फ़िर एक बार मोदी सरकार" अशी घोषणा लिहिलेल्या भाजपच्या मंचावरून बोलताना तिने सांगितले, "मला त्याने कोणत्याही पुराव्याशिवाय अटक केली. त्याचं हे कृत्य देशद्रोहाचं होतं, धर्मविरोधी होतं. मी त्याला शाप दिला. तुझा सर्वनाश होईल.
मला अटक झाली तेव्हा मला सुतक लागलेलं. बरोबर सवा महिन्यांत तो दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडला. माझं सुतक संपलं." या वाक्यावर मंचावर बसलेल्या भगवा फ़ेटेधारकांनी टाळ्या वाजवल्या.

या कथनावर पुरेसा गदारोळ झाला. आय पी एस ऒफ़िसरांच्या संघटनेने त्याचा निषेध केला, तेव्हा भाजपने हे प्रज्ञासिंह ठाकुरचं वैयक्तिक मत असल्याचं सांगून हात झटकले. वर, अनेक वर्षं शारीरिक आणि मानसिक छळ सहन केल्याने तिने असं म्हटलं असेल अशी मखलाशीही केली.
दुस र्‍या दिवशी प्रज्ञासिंहने करकरेंबद्दलच्या माझ्या विधानामुळे देशाच्या शत्रूंना आनंद झाला. देशाच्या शत्रूंना आनंद होईल, असं काही मला करायचं नाही, म्हणून माझं विधान मी मागे घेते असं सांगितलं. तिच्या वक्तव्यानंतर भारत माता की जय च्या घोषणा दिल्या गेल्या.

प्रज्ञासिंहच्या उमेदवारीचं समर्थन करताना भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलं की पाच हजार वर्षं जुनप्र, वसुधैव कुटुम्बकम् मानणार्‍या संस्कृतीवर समझौता एक्स्प्रेस आणि मालेगाव स्फ़ोटात दहशतवादाचा शिक्का मारला गेला. या सगळ्याचं प्रतीकात्मक उत्तर म्हणून तिला उमेदवारी दिली आहे. (प्रज्ञासिंह ठाकुरचं ) हे प्रतीक काँग्रेसला महाग पडणार आहे.

प्रज्ञासिंहला कोणत्याही आरोपपत्राशिवाय (चार्जशीट) , कोणत्याही पुराव्याशिवाय डांबून ठेवलं गेलं, तिचा छळ केला गेला, असं अनेक लोक म्हणू लागलेत.

इथे काही गोष्टींकडे मागे वळून पाहणं क्रमप्राप्त आहे.

१) २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव इथे बॊम्बस्फ़ोट झाला. ७ लोक मरण पावले, ७९ जखमी झाले.
२) एटीएसने प्रज्ञासिंहला २३ ऑक्टोबर २००८ रोजी अटक करून २४ रोजी चीफ़ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट समोर हजर केले.
३) २० जानेवारी २००९ रोजी तिच्या आणि अन्य आरोपींच्या विरोधात चार्जशीट दाखल केली.
४.) जुलै २००९ मध्ये मकोका खालील आरोप विशेष न्यायालाने हटवले
५) जुलै २०१० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा मकोका लावला.
६) एप्रिल २०११ मध्ये मालेगाव सह अन्य प्रकरणांचा तपास एन आय ए कडे दिला गेला.
७) २३ सप्टेंबर २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फ़ेटाळला. तिची अटक बेकायदेशीर असल्याचा आणि एटीएसने तिचा छळ केल्याचा आरोपही न्यायालयाने अमान्य केला. हे निकालपत्र संपूर्ण वाचावं, अशी चर्चेत भाग घेणार्‍या सर्वांना विनंती.

न्यायालयाचं निकालपत्र इथे वाचता येईल.

८) यानंतर तिने मुंबई उच्च न्यायालयात प्रकृतीच्या कारणावरून जामीन अर्ज केला. हा अर्ज फ़ेटाळताना न्यायालयाने तिच्या विरोधात भक्कम पुरावा असल्याचे म्हटले.

९ ) २०१४ मध्ये दिल्ली आणि मुंबई इथे सत्तांतर झालं.
१० ) एप्रिल २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की प्रज्ञासिंह विरोधात मकोका लावण्याजोगा पुरावा नाही, तेव्हा खालच्या कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर विचार करावा.

११) जून २०१५ - नवं सरकार मालेगाव व अन्य प्रकरणांत ढील देण्यासाठी माझ्यावर दबाव आ णला जात होता - पब्लिक प्रोझिक्युटर रोहिणी सालियन
त्यांचे पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून काम करणे थांबले.

१२). नोव्हेंबर २०१५ मध्ये मकोका कोर्टाने प्रज्ञासिंह चा प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून केलेला जामीन अर्ज फ़ेटाळला.
१३) मे २०१६ - एन आय ए ने प्रज्ञासिंह विरोधातील म्कोकाखालचे आरोप पुराव्या अभावी मागे घेतले.
१४) मे २०१६ - न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रज्ञासिंहने उज्जैन येथे कुंभस्नान करता यावे म्हणून इस्पितळात उपोषण केले. तिची मागणी मान्य केली गेली.

१५) .जून २०१६ - विशेष न्यायालयाने नीट चौकशी न करणे आणि एटीएसने नोंदवलेले साक्षीदारांचे जवाब पुन्हा नोंदवने यासाठी एन आय ए वर ठपका ठेवत जामीन अर्ज फ़ेटाळला. तिच्यावरचे आरोप खरे आहेत, असे मानायला पुरेशी जागा आहे, असंही म्हटलं. एन आय ने तिच्या जामीन अर्जाला विरोध केला नव्हता.
१६) एप्रिल २०१७ - मुंबई उच्च न्यायालयाने प्रज्ञासिंह ठाकुरला जामीन मंजूर केला.
ती स्त्री आहे, आठ वर्षांपासून तुरुंगात आहे, तिला कॆन्सर झाला आहे आधाराशि वाय चालू शकत नाही, ती सध्या एका आयुर्वेदिक इस्पितळात उपचार घेते आहे, तिला दोषी ठरवण्यासारखे पुरेसे पुरावे नाहीत
१७) मार्च २०१९ -समझौता बॉम्बस्फ़ोट प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. न्यायालयाने निकालपत्रा त म्हटले आहे की अत्यंत म हत्त्वाचा पुरावा सादर केला गेला नाही, साक्षीदारांचे जवान नोंदवले गेले नाहीत.

कॅन्सरने आजारी असलेली आणि आधाराशिवाय चालू न शकणारी स्त्री आज लोकसभेची निवडणूक लढवते आहे. दहशतवादाचा आरोप असलेली व्यक्ती उद्या संसदेत मानाने प्रवेश करू शकेल.

दुसरीकडे हेमंत करकरेंवर भाजप पाठिराख्यांकडून, हिंदुत्ववाद्यांकडून विविध प्रकारे लांच्छन लावणे सुरू झाले आहे. हेमंत करकरे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले. पण आज ते पुन्हा पुन्हा मारले जात आहेत, तेही स्वत:ला देशभक्त, राष्ट्रप्रेमी म्हणवणार्‍या लोकांकडून.

शहीद हेमंत करकरे, आम्हांला क्षमा करा. या देशाचं रक्षण करताना कोणी आपले प्राण त्यागावेत, अशी आमची लायकी नाही. तुम्हांलाच काय, तु मच्या पत्नीला आणि मुलांनाही जिवंतपणी आणि मेल्यानंतरही ज्या गोष्टींचा सामना करावा लागतोय, त्या पाहून माझी मान खाली झुकते.
----------------------------------------------------------------------------------------------------------
२६.०४ .२०१९ रोजी वाढवलेला मजकूर.
मुंबईतल्या जे जे इस्पितळाचे तेव्हाचे डीन डॉ लहाने यांनी सांगितलं की प्रज्ञा सिंग ठाकुरच्या अनेक वैद्यकीय चाच ण्या केल्या, पण त्यात त्यांना कोण त्याही गंभीर आजा राची लक्षणं आढळली नाहीत. एम आर आय आणि इसीजी रिपोर्ट नॉर्मल होते. कॅन्सर साठीच्या एका तपासणीतही काहीही आढळलं नाही.
तिची तपासणी करणार्‍या डॉक्टरांच्या पथकातील एकाने सांगितलं की ती कोणत्याही डॉक्टर कडून हातही लावून घेत नव्हती. औष धोपचारही घेत नव्हती.
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/what-bull-say-tat...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अडवाणी ते मोदी प्रवास फार मोठा होता त्या तुलनेत मोदी - योगी - साध्वी हा प्रवास फारच वेगवान आहे. मध्यंतरी एका साधकाकडे शस्त्रे सापडली आणि त्याला अटक झाल्यावर लोकांनी त्याच्या समर्थ मोर्चे काढलेले. ते पाहून होत असलेल्या अधोगतीची कल्पना आली होती. इतक्या अतिवेगाने लवकर पाकिस्तान अफाणिस्तानच्या पंक्तीत बसणार आपण हे नक्की.
ही निवडणूक शेवटची संधी आहे का सगळं असंच बिघडून नासून गेलं आहे कुणास ठाऊक.

भरत, जबरदस्त लिहिलंय. पुराव्यासह लिहिलंय.
साध्वीवर अपेक्षा नाहीच. त्यांच्या सर्वोच्च नेत्याला जिथे शहिदांचं भांडवल करायला लाज नाही वाटत, तिथे साध्वीवर काय कारवाई होणार?

भरतजी, तुमच्या आणि तुमच्या सारख्या विचारशक्ती शाबूत असलेल्या माझ्यासारख्या अनेक लोकांच्या याच भावना आहेत. त्या भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम म्हणुन हा धागा! या पलिकडे, आतंकवादी कृत्य करणार्‍या व्यक्तिला तिकिट देणारे, त्याचे संमर्थन करणारे आणि त्याचा विरोध करणार्‍यांना 'हिंदुत्वाचे शत्रु' मानणारे यांच्या आतंकवादी विचारसरणिवर पश्चातापाचा ओरखडाही उमटणार नाही याची खात्री आहे.

शहीद हेमंत करकरे, आम्हांला क्षमा करा. या देशाचं रक्षण करताना कोणी आपले प्राण त्यागावेत, अशी आमची लायकी नाही. तुम्हांलाच काय, तु मच्या पत्नीला आणि मुलांनाही जिवंतपणी आणि मेल्यानंतरही ज्या गोष्टींचा सामना करावा लागतोय, त्या पाहून माझी मान खाली झुकते.>>>>> खरंच आहे. लाज वाटली ही बातमी वाचून!

भरत,
चांगले लिहिले आहे,

देशाचा पंतप्रधान , एक संशयित दहशदवाद्या ची बाजू घेऊन गावगुंड छाप विधाने करतो हे धक्कादायक आहे
मात्र त्या पेक्षा जास्त धक्कादायक आहे की अशी पार्श्वव्हूमी असणाऱ्या माणसाला लोकसभेचे तिकीट मिळते.
जर आपण या प्रकारचे समर्थन करणार असू, तर हाफीज सैद बद्दल बोलायचा आपल्याला काय नैतिक अधिकार उरतो?

त्याने किमान शत्रू राष्ट्रा मध्ये घातपात घडवले, इकडे या लोकांनी स्वतःच्या देशातच बॉम्ब फोडले.

महाभारतात प्रसंग आहे , कौरव गंधर्व हल्ला , भीम बोलतो , बरे झाले आता कौरव मरतील , पण युधिष्ठीर बोलतो ,

परस्परविरोधे तु वयं पंचश्चते शतम् |
परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकं शतम् ||.

आपण एकमेकांचे विरोधी आहोत , पण बाह्य शत्रूने हल्ला केला तर आपण एकशे पाच आहोत.

साध्वीला महाभारतातील हे ज्ञान माहीत नाही , तिला करकरेंपेक्षा पाकिस्तानी अतिरेकी जवळचा वाटला, ह्यातून तीन निषकर्ष निघतात...
1. साध्वी साध्वी नाही.
2. साध्वी हिंदू नाही.
3. साध्वी भारतीय नाही.

हा प्रश्न जे वाढवत आहेत ते साध्वी ला मदत करत आहेत .
हा प्रश्न पेटला की करकरे ची जात काढली जाईल मग मिशन पूर्ण होईल साध्वी ला आणि हेतू पूर्ण करायला आपण नकळत मदत करत आहोत

सगळ्यांना कळकळीची विनंती, फक्त मुद्दे मांडा. मुद्दे खोडा. विषयाला चिकटून रहा
इतरांवर कमेंट कराल तर धागा भलतीकडेच जाईल.

मुळात ही साध्वी, साक्षी महाराजसारखेच लोक हिंदूंचे सर्वात मोठे शत्रू आहेत.
मग बाकीचे हेलकाढू हिंदू दहशतवाद म्हणायला मोकळे. मुळात ना यांना हिंदू लोकांची कळकळ, ना राम मंदिराची! हिंदू धर्म खतरेमे है ची बोंब ठोकायची, मंदिराच्या नावाने पुन्हा मते मागायची!
मुळात भाजपला वाटतच नाही, मंदिर व्हावं असं! कारण हा प्रश्न सुटला तर पुढच्या निवडणुकीत कोणत्या तोंडाने मत मागायचं?

तर हाफीज सैद बद्दल बोलायचा आपल्याला काय नैतिक अधिकार उरतो? >> सिंबाजी, अगदी खरे आहे. पाकिस्तानात अतिरेक्यांना निवडणुकीचे तिकिट दिले गेले असे कधी वाचनात आले नाही, आपण पाकिस्तानला याप्रकरणात मागे टाकले.

हे रावण तोंडाचे शहिदांच्या नावाने मत मागतात, ह्यांच्या निर्लज्जपणाला मर्यादा नाही.

पाकिस्तानात अतिरेक्यांना निवडणुकीचे तिकिट दिले गेले असे कधी वाचनात आले नाही.
अगदी बरोबर आहे.
जागतिक स्तरावर तशी नोंद आहे की जगातील आदर्श लोकशाही फक्त पाकिस्तान मध्ये आहे .
आणि जगातील मुख्य लोकांनी सल्ला पण दिलंय पाकिस्तान चा आदर्श घेण्याचा .
फक्त मीडिया दलाल असल्या मुळे ह्या बातम्या येत नाहीत

शहीद हेमंत करकरे, आम्हांला क्षमा करा. या देशाचं रक्षण करताना कोणी आपले प्राण त्यागावेत, अशी आमची लायकी नाही. तुम्हांलाच काय, तु मच्या पत्नीला आणि मुलांनाही जिवंतपणी आणि मेल्यानंतरही ज्या गोष्टींचा सामना करावा लागतोय, त्या पाहून माझी मान खाली झुकते.
<<

कॉंग्रेसी निर्लज्ज भाटांना अशी बिनडोक विधाने करताना लाजा कश्या वाटत नाहीत हेच कळत नाही.

हिरव्या दहशतवाद्यांच्या दाढ्या करुवाळायला कॉंग्रेसने कथित भगवा/हिंदू दहशतवाद नावाचा बागुलबुवा उभा केला व एका निरपराध हिंदू महिलेला दहशतवादाशी जराही संबध नसताना एका खोट्या केस मधे अडकवून, तीला मरेस्तोवर माराहाण व अश्लिल चित्रफिती दाखवून केला नसलेला गुन्हा कबूल करायाचा प्रयत्न केला.

मात्र २००८ ते २०१४ या दरम्यान काँग्रेसच्या या प्रयत्नाना जराही दाद न देता साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल पुरोहीत व इतर निरपराध हिंदू त्यांच्या जबाबावर ठाम राहीले व शेवटी कोर्टाला जामीनावर का होईना या सर्वांना सोडून द्यावे लागले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम व्होटबॅकला खूष करण्यासाठी, कॉंग्रेसने मालेगाव बॉंब्मस्फोटातील हिरवे दहशतवादी सोडून कथित हिंदू दहशतवाद सिद्ध करण्याकरता वरिल निरपराध हिंदूना या केस मधे गोवले जर का असे नसते तर २००८ ते २०१४ अशी तब्बल ८ वर्षे कॉंग्रेसकडे होती गुन्हा सिद्ध करणे तर सोडा कोर्टात चार्जशिट दाखल करता आली नाही ह्या नालायक कॉंग्रेसला.

व शेवटी शहिद हेंमत करकरे ह्यांच्या बद्दल जे निर्लज्ज कॉंग्रेसी भाट इथे गळा काढतायत त्या करकरेंना शहिद केले ते हिरव्या दहशतवाद्यांनी ना की कथित हिंदू/भगव्या दहशतवाद्यांनी.

शहीद हेमंत करकरे , आम्हांला क्षमा करा.
२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री तुम्ही हेल्मेट चढवून जीपमध्ये बसताना टीव्हीवर दिसलात. त्यानंतर काही मिनिटांतच तुम्ही दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडल्याची बातमी पाहिली.

---
बरोबर आहे तुम्ही कॉंंग्रेसी भाटांनी व चमच्यांनी क्षमा मागणेच योग्य आहे. कारण ज्या कॉंग्रेसची तुम्ही चाटता त्या कॉंग्रेसने प्रशिक्षीत हिरव्या दहशतवाद्यांच्या Sophisticated weapons चा सामना करायला मुंबई पोलिसांना फक्त हॅलमेट व प्रथम विश्वयुद्धातील ३०३ रायफल दिली व बाकी Gears चे पैसे घोटाळे व भ्रष्टाचार करुन स्वत:च्या तुंबड्या भरल्या तेंव्हा तुमच्या सारख्यांनी क्षमा मागणेच योग्य आहे.

या कथनावर पुरेसा गदारोळ झाला. आय पी एस ऒफ़िसरांच्या संघटनेने त्याचा निषेध केला,
<<

याच साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना महाराष्ट्र एटीएसने जेलमधे Blue Film दाखवल्यावर व पाठीचा मणका तुटेपर्यंत माराहाण केली होती तेंव्हा कोणी निषेध नोंदवला होता ?

२०१४ आधी न्यायालयाने दिलेले निकाल अगदी योग्य होते मात्र २०१४ नंतर देशातील न्यायलये पक्षपाती झालेत, काय लॉजिक आहे ह्या कॉंग्रेसी चमच्यांचे ! Lol

निव्वळ राजकारणासाठी काढलेला धागा आहे. गेल्या 11 वर्षांतील साडेसहा -सात वर्षे काँग्रेसचे राज्य होते. तेव्हा कुठलेही पुरावे जमा झाले नाहीत. शरम वाटली पाहिजे काँग्रेसला , की त्यांनी हिंदू दहशतवादाचे बुजगावणे उभे करण्यासाठी निरपराध व्यक्तींना गोवले.

हेमंत करकरे, विजय साळसकर व अशोक कामटे यांना विनाचीलखत, बुलेटप्रूफ नसलेल्या गाडीतून एकत्र पाठविणारे , बडे बडे शहरोंमे ऐसी छोटी छोटी घटनाये होती रहती है असे म्हणणारे, ताज हॉटेल पाहायला रामगोपाल वर्माला सोबत नेणारे, 26/11 चा एव्हढा मोठा हल्ला होऊनही फक्त निषेध करणारे काँग्रेसचे लोक आणि त्यांचे चेलेचपाटे आता हेमंत करकरेंच्या नावाने गळा काढताहेत.. यापेक्षा मोठा विनोद काय असेल?

करकरें, कामटे व साळस्कारांना कसाबने नाही, तर काँग्रेसने मारले.

एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्या आदेशावरून साध्वी प्रज्ञा हिचा आतोनात छळ करण्यात आल्याचे आरोप खोटे असल्याचा खुलासा मानव अधिकार आयोगाने केला आहे. साध्वी प्रज्ञा हिचे आरोप सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानेही वेळोवेळी फेटाळले आहेत.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेली साध्वी प्रज्ञा भाजपच्या तिकीटावर भोपाळहून निवडणूक लढवते आहे. शुक्रवारी हेमंत करकरेंच्या नेतृत्वातील एटीएसने माझा आतोनात छळ केला असा आरोप तिने केला होता. तसंच माझ्या शापामुळेच हेमंत करकरे मारले गेले असं वादग्रस्त वक्तव्यही तिने केलं होतं.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा २००८ ते २०१७ असे ९ वर्षं तुरुंगात होती. तुरुंगात असताना अनेकदा माझा एटीएसने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप साध्वी प्रज्ञाने केला होता. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मानव अधिकार आयोगाने एका समिती गठित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आर.एस खैरे यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने २०१४-२०१५ मध्ये याप्रकरणी कसून चौकशी केली होती. सीआयडी इन्स्पेक्टर जे. एम. कुलकर्णी, दक्षता समितीच्या सदस्या रश्मी जोशी आणि इतर उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश होता. प्रज्ञाच्या आरोपांची पुष्टी करणारे कोणतेच साक्षी-पुरावे उपलब्ध नसल्याचं या समितीने आपल्या अहवालात २०१५मध्ये स्पष्ट केलं होतं.

या समितीने याबाबत अहवाल सादर करण्याच्या चार वर्षं अगोदरच सर्वोच्च न्यायालयाने साध्वी प्रज्ञाचे आरोप फेटाळले होते. न्या. जे .एम पांचाल, न्या. एच एल गोखले यांच्या खंडपीठाने मानव अधिकार आयोगाला याप्रकरणाची चौकशी करण्याचा सल्ला दिला होता. पण त्याचवेळी दोन रुग्णालयांमध्ये साध्वी प्रज्ञाची तपासणी करण्यात आली होती. तेव्हा डॉक्टरांना तिच्या शरीरावर कोणतीच जखम का सापडली नव्हती? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला होता. तसंच २००८ मध्ये २४ ऑक्टोबर आणि ३ नोव्हेंबरला तिला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा याप्रकरणी प्रज्ञाने कोणतीच वाच्यता केली नव्हती याची नोंदही सर्वोच्च न्यायालयाने केली होती.

एटीएसने साध्वी प्रज्ञाला ताब्यात घेतलं नव्हतं: मुंबई उच्च न्यायालय

२०१० मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेही याप्रकरणावर प्रकाश टाकला होता. साध्वी प्रज्ञाला एकदाही एटीएसच्या ऑफिसला नेण्यात आलं नव्हतं. तसंच तिला कोठडीत डांबून तिची चौकशीही एटीएसने केली नव्हती असंही मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं होतं. २००८मध्ये तिच्यावर कोणतेच निर्बंधही एटीएसकडून लादण्यात आले नव्हते.

कॅन्सरने आजारी असलेली आणि आधाराशिवाय चालू न शकणारी स्त्री आज लोकसभेची निवडणूक लढवते आहे. दहशतवादाचा आरोप असलेली व्यक्ती उद्या संसदेत मानाने प्रवेश करू शकेल.
<<

भ्रष्टाचार व घोटाळ्याच्या खटल्यात आरोपी असणारी व न्यायालयाच्या जामीनावर बाहेर फिरणारी दोन नालायक लोक संसदेत प्रवेश करत आहेतच ना आता ?

स्वत:ला सोयीच्या असणार्‍या हायपर लिंक देऊन, इतरांना गंडवण्याचा हातखंडा कॉंग्रेसी भाटांकडून अथवा चमच्यांकडून इतरांनी शिकावा असा आहे जसा मंदबुद्धी पप्पू तसे त्याचे भाट ! Lol

अनिरुद्ध जी, शशांक जी कुत्तेकी दूम कभीभी सिधी नही हो सक्ती. जस्ट इग्नोर.

कॅन्सरने आजारी असलेली आणि आधाराशिवाय चालू न शकणारी स्त्री आज लोकसभेची निवडणूक लढवते आहे. कॅन्सरने आजारी असलेली आणि आधाराशिवाय चालू न शकणारी स्त्री आज लोकसभेची निवडणूक लढवते आहे.
<<

कॅन्सरने आजारी असलेल्या एका महिलेला १५-१५ पोलिस, अश्लिल चित्रफीती दाखवून, न केलेला गुन्हा कबुल करायला पाठीचा मणका तुटेपर्यंत मारहाण करत होते तेंव्हा तुम्हाला असा एकादा धागा काढायची बुद्धी का नाही सुचली हो लोकसत्ताकार ?

त्या तिघांना एकत्र पाठवून शहीद केल्यानंतर काँग्रेसची या विषयावरील चुप्पी संदेह उत्पन्न करणारी आहे.

कुणास ठाऊक, काँग्रेसने पोलिसांवर दबाव टाकून निरपराध लोकांना बॉम्बस्फोट खटल्यात गोवल्यानंतर कदाचित ते अधिकारी डोईजड होऊ लागले असावेत (किंवा काँग्रेसचे घाणेरडे राजकारण मानण्यास त्यांनी नकार दिला असावा) मग काँग्रेसने अतिरेकी हल्ल्याचे निमित्त साधून त्यांना संपविले असावे. पुराव्याशिवाय पंतप्रधानांना चोर म्हणण्याची, तणावाच्या काळात परदेशी (चिनी व पाकिस्तानी) अधिकाऱ्यांना गुपचूप भेटण्याची परंपरा असलेले लोक, मोदींना गोवण्यासाठी प्रतिज्ञापत्रात खोटी गोष्ट घुसडणारे व व्यापम घोटाळ्याच्या खटल्यात खोटी कागदपत्रे न्यायालयाला सादर करणारे लोक काहीही करू शकतात.

Pages