विन्डोजसाठी मुक्तस्रोत सॉफ्टवेअर बद्दल माहिती/चर्चा

Submitted by मानव पृथ्वीकर on 16 March, 2019 - 09:00

विन्डोज ऑपरेटिंग सिस्टम साठी उपलब्ध असलेल्या विविध मुक्तस्रोत (ओपन सोर्स) सॉफ्टवेअर बद्दल प्रश्न, माहिती व अनुभव यांची देवाण घेवाण करण्यास हा धागा.
सामान्यांसाठी तसेच लहान कार्यालय / लघु उद्योग यांच्या साठी उपयुक्त असणारे सॉफ्टवेअर / प्रोग्राम्स याबद्दल येथे चर्चा अपेक्षीत आहे.
एखादा प्रोगाम सुचवताना त्यासोबत त्याची लिन्क दिल्यास उत्तम.
इथे कायद्याने मुक्तस्रोत असणारेच प्रोग्राम्स सुचवले जातील अशी अपेक्षा आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक विचाययचं आहे की, विंडोज 10 नंतर मायक्रोसॉफ्ट एकदम शांत आहे. नवीन ऑपरेटिंग सिस्टिम ते कधी लाँच करणार आहेत

मायक्रोसॉफ्ट ऑफिसला पर्याय उत्तम पर्याय म्हणजे लिब्रे ऑफिस हे बहुतेकांना ठाउकच असेल.
यात आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट फाइल्सही सहज उघडु शकतो आणि लिब्रे ऑफिस मध्ये तयार केलेल्या फाइल्स .doc / .docx / .xls / .xlsx / .ppt एक्स्टेन्शन मध्येही सेव्ह करु शकतो आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरणार्‍यांसोबत शेअर करु शकतो.
पण गोची आहे जर तुम्ही मॅक्रोज वापरत असाल तर. VBA मॅक्रोज लिब्रे ऑफिस मध्ये चालणार नाहीत, आणि व्हाइस अ व्हर्सा. मॅक्रोज नव्याने लिहावे लागतील.

लिब्रे ऑफिसमध्ये इन-बिल्ट PDF कन्वर्टर आहे. तसेच लिब्रे ड्रॉ हे थोडेफार PDF editing चे काम करु शकते.

PDF editing साठी वापरुन बघितलेला दुसरा प्रोग्राम म्हणजे ईन्कस्केप. पण यात एकावेळी एकच पान उघडता येते.
या दोन व्यतिरीक्त कुठला PDF Editing प्रोग्राम कुणाला असल्यास सुचवा.

मी ओपन सोर्सचा जुना फॅन आहे.
पीडीएफ एडिटिंग साठी https://pdfsam.org/ वापरून बघा. मी त्यांचं बेसिक व्हर्जन वापरलंय स्प्लिट आणि मर्ज करायला.

व्यत्यय धन्यवाद. स्प्लिट, मर्ज, रोटेट साठी चांगले आहे PDFSAM, वापरेन हेच.
मला Editing साठी पण हवे आहे. लिब्रे ड्रॉ आणि इन्कस्केप वापरुन सध्या काम भागवतो आहेत पण त्यात काही अडचणी येतात, काही फाइल्स मधील रंग पार बदलून जाणे, टेबल गायब होणे वगैरे.

तसेच PDF to Word कन्वर्टर पण शोधत आहे. काही ट्राय करुन बघितले - पण नीट काम करत नाहीत, स्कॅन्ड नव्हे तर Save as PDF केलेल्या फाइल्सही नीट कन्वर्ट करत नव्हते. मला बहुतेक अशाच फाइल्स कन्वर्ट करायच्या आहेत. टेंडर डोकुमेंट्सचे स्पेसिफिकेशन्स टेबल्स कॉपी करुन त्यात डेटा भरणे हे मुख्य काम.

लिब्रे ऑफिस प्रमाणे WPS office चांगला प्रकार आहे. डिव्हाईस सिंक ऑप्शन, लिब्रेपेक्षा कमी जागा, चांगली UI ह्या काही जमेच्या बाजू.

माइक्रो ओफिस अधिकृतपणे विंडोज फोनमध्ये मिळते म्हणून घेतलेला. पण विंडोज १० वर अपग्रेड करूनही उपयोग नाहीच कारण विंडोजचे फोनसाठीचे सपोर्ट बंद केलेत. ओक्टोबर २०१८ शेवटचे.
अॅन्ड्रोइड फोन स्टोरवर मात्र वर्ड, एक्सेल चे अपडेट्स चालू आहेत. पण सिक्युअरटि नसते.
(( माझा एक पिटुकला अनुभव लिहिला आहे.))

>>नवीन ऑपरेटिंग सिस्टिम ते कधी लाँच करणार आहेत>> - @बोकलत,

सत्या नाडेलाच्या मार्गदर्शनानुसार विंडोज १० ही ब्लॅाक्सच्या स्वरुपात लिहिण्यात आली. नाव हेच राहणार, फक्त दर मंगळवारी आतले ब्लॅाक्स गरजेप्रमाणे अपडेट करतात. जुने वर्शनस जाऊन ( सपोर्ट काढून ) ओक्टोबर अपडेट - १८०९ नावाची सध्या अद्यावत आहे असे कळले.