Submitted by किरणुद्दीन on 7 March, 2019 - 09:10
आम्हाला अजून काही दिवसांनी बाहेरगावी जायचे आहे. घरात कुत्रे आहे. त्याला नेणे शक्य नाही. आडवड्याभरासाठी अशा पाळीव प्राण्यांची देखभाल करणा-या सेवा सुविधा पुण्यात उपलब्ध आहेत का ? असल्यास काय प्रकारच्या आहेत ? काय शुल्क आकारले जाते ? कृपया याबद्दलची माहिती असल्यास इथे द्यावी ही विनंती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुण्यात असाल तर 2 3 ठिकाणे
पुण्यात असाल तर 2 3 ठिकाणे आहेत,
एक राजाराम ब्रिज जवळ
एक हिंजवडी
Fb वर पेट प्रोजेक्ट म्हणून सर्च करा,
हिंजवडी चे माझ्या मित्राने नेहमीचे आहे, रिपोर्ट चांगला आहे
ओळखीचे असेल तर खूप बरं होईल.
ओळखीचे असेल तर खूप बरं होईल. म्हणजे कसे ट्रीट करतात हे पण समजेल. आजच एका ठिकाणी जाऊन आलो. ते दिवसभर पिंज-यात ठेवतात. दोन वेळा फिरायला नेऊ म्हणालेत. पण शंका वाटते.
त्याच्या नैसर्गिक गरजांकडे दुर्लक्ष होणार नाही एव्हढेच..
राजाराम ब्रिज अगदीच सोयीचे आहे. पण चांगली सोय असेल तर लांब जायला लागले तरी हरकत नाही.
हिंजवडी, पेट सीटर्स 975/-
हिंजवडी, पेट सीटर्स 975/- प्रत्येक दिवसासाठी (ओव्हर नाईट, हॉटेल सारखा चेक इन- आउट) खाणे या किमतीत समाविष्ट.
यांचे रिपोर्ट्स चांगले आहेत,
त्या फॅसिलिटी मध्येच पूल वगैरे आहे,
मी माझ्या बिगलला Peppy Paws -
मी माझ्या बिगलला Peppy Paws - सासवड रोडला ठेवते ( फुरसुंगीच्या थोडं पुढे). दिवसाचे 700रुपये, खाणं incl. भरपूर मोकळी जागा आहे. आपला पेट जर फ्रेंडली असेल तर पिंजऱ्यात ठेवत नाहीत. खेळायला मोकळी जागा आहे, स्विमिंग पूल आहे.
दुसरं केनेल, मुंढवा ( रेल्वे क्रॉसिंग जवळ किंवा एम्प्रेस गार्डनची मागची बाजू) जवळ Pet's Hangover म्हणून आहे. चार्जेस - 500रुपये खाणं incl.
दोन्ही केनेलच्या ओनर्स मुली आहेत आणि खूप पॅशनेट आहेत.
गुगलवर शोधा किंवा हवं तर मी नंबर्स देईन.
फेसबुकवर एक चिंचवडच्या
फेसबुकवर एक चिंचवडच्या बंगल्यात केनेल आहे त्याची माहिती साठवून ठेवली आहे. शिवाय माझा मित्र एके ठिकाणी घरगुती फ्लॅटमध्ये पेट्सना सांभाळतात, तिथे ठेवतो. चार्जेस अगदीच कमी 350रुपये वगैरे आहेत. हवं तर नंबर मिळवते.
NDA रोडला ( चांदनी चौक बाजूने) एक जुना केनेल आहे. खूप जुना आणि नावाजलेला असं ऐकलं आहे. मला खूप दूर असल्याने मी कधी पहिला नाही, पण आमचे गोव्याचे फ्रेंड्स बाहेर देशात जाताना स्पेशली पुण्यात येऊन त्या केनेल मध्ये त्यांच्या पेटला ठेवतात. तुम्हाला तो सोयीस्कर असेल तर नक्की पहा आणि इथे फीडबॅक द्या.
पहिल्यांदाच ठेवणार आहे का? तर
पहिल्यांदाच ठेवणार आहे का? तर तुम्हाला आणि त्याला खूप जड जाईल. एकदम एक आठवडा ठेवू नका. आधी 1-2 दिवस ट्रायल साठी ठेवून मग बाहेरगावी जा.
स्पॉट ऑन करणं कंपल्सरी आहे. तुम्हाला माहीत असेलच. त्याची आवडती खेळणी देऊ नका. मी देऊन चूक केली होती. घरात लाडोबा असलेल्या आपल्या पेटला खेळणं दुसऱ्या कुत्र्याने घेतलं तर आवडत नाही. भांडण होतात. त्याचा बेड किंवा आवडती चादर मात्र नक्की द्या.
मला पहिल्यांदा ठेवलं तेव्हा प्रचंड रडू आलं होतं आणि ट्रिपमध्ये मजा करता आली नाही. त्याला माझी आणि मला त्याची सतत आठवण येत होती. आताही तुमच्या कुत्र्याचं काय होईल म्हणून मला काळजी वाटते आहे
सिंबा आणि मीरा धन्यवाद.
सिंबा आणि मीरा धन्यवाद. चांगली माहिती मिळाली.
चांदणी चौक मला सोयीचे आहे. सासवड रोड लांब पडेल. पण जाऊन येईन. फोन नंबर्स शोधतोच. पण हाताशी असतील तर द्यावेत ही विनंती.
Peppy Paws - Priya - 88059
Peppy Paws - Priya - 88059 89128
https://goo.gl/maps/zVHiLZJesgM2
Pet's Hangover - Ria Sayaji - 78752 82857
त्यांची फेसबुक पेजेस चेक करू शकता. बाकी डेटा बेस खूप आहे, पण अनुभवलेली केनेल्स ही दोनच.
मला पहिल्यांदा ठेवलं तेव्हा
मला पहिल्यांदा ठेवलं तेव्हा प्रचंड रडू आलं होतं आणि ट्रिपमध्ये मजा करता आली नाही. त्याला माझी आणि मला त्याची सतत आठवण येत होती. आताही तुमच्या कुत्र्याचं काय होईल म्हणून मला काळजी वाटते आहे Sad
नवीन Submitted by मीरा.. on 8 March, 2019 - 00:32
इथे 'मी ' शब्द लिहा. वेगळा अर्थ निघतोय.
मी तर कुत्र्याला दूर ठेवणे
मी तर कुत्र्याला दूर ठेवणे नको म्हणून ट्रिपच क्यानसल करते बरेच वेळा. अगदीच गरज असेल तर जाते. परवा मी ऑफिसात गेले. लेक घरीच होती झोपली होती. ती उठली तर कुत्रे रड रड रड्त होते. लेकीचा फोन आला ती इतकी काय रड्ते आहे. तसे काही झाले न्व्हते तिला मग माझ्या लक्षात आले, मी बाहेर गेले आहे असे ती लेकीला सुचवत होती. मी ऑफिस व्यतिरिक्त वेळेला तिला सोडून कुठे बाहेर गेले की अशीच रड्ते पाच मिनिटे. मग पांघरुणात लपून बसते. आम्ही दोघी बाहेर गेलो तर तिच्या साठी नेहमी च मुंबई पुणे मुंबई पहिला भाग लावून जातो. मग ती घाबरत नाही.
किरणुद्दीन, तुम्ही तुमच्या कुत्र्या बरोब्र तुमच्या किंवा घरच्या वासाचे काहीतरी द्या. रोजच्यात्याच्या बसायच्या चादरीचा अर्धा तुकडा किंवा त्याचे खेळणे जेणेकरून त्याला घरचा वास येत राहील व फार भीती वाटणार नाही.
मी कधी कुणासाठी बाहेरून गिफ्ट आणत नाही पण केनेल काकांसाठी खाउ, टीशर्ट आणते व त्यांना टिप देते जेणे करून ते कुत्र्याची जास्त काळजी घेतील. चांगले ह्युमन रिलेशन डेव्हलप राहील अशी काळजी घेते.
परत आल्यावर तुमच्या कुत्र्याला काही छान ट्रीट द्या आमचे येडे ग्लुकोज बिस्किटाचा पुडा मिळाला की खुष असते. व त्याबरोबर वेळ घालवा.
कुत्र्यांशी बोलणे खूपच महत्वाचे आहे.
बिपीनचंद्र, आता मला एडिट
बिपीनचंद्र, आता मला एडिट करता येणार नाही, पण वाक्य परत वाचल्यावर कळलं की मी काय टाइप केलं आहे.
उशिरा रात्री फक्त वाचावं, टाइप करायला गेलं की असं होतं. पण या धाग्यावर लिहिणं टाळू शकले नाही.
अमा, आमच्याकडे बऱ्याच गोष्टी तुमच्या घरासारख्याच आहेत. कोणते कपडे घातले की ऑफिसला जाणार आणि कोणते कपडे घातले की बरोबर जायचा हट्ट करायचा हे व्यवस्थित माहीत आहे. बिगल असल्यामुळे रडणं पण दणक्यात असतं. घर डोक्यावर घेतो, त्यापेक्षा बरोबर नेलं तर बरं म्हणून सगळीकडे नेते त्याला.
त्यापेक्षा बरोबर नेलं तर बरं
त्यापेक्षा बरोबर नेलं तर बरं म्हणून सगळीकडे नेते त्याला.>. भाजी आणायला नेउ शकतो. इतर ठिकाणी?! बीगल मस्त ब्रीड. मास्क सिनेमातला मायलो ना. लईच खोडकर फार व्यायाम लागतो त्याला.
हस्की पाळता यावा म्हणून माझी देश बदलायची तयारी आहे. पण सध्या तरी ओन्ड बाय अ डाक्सुन्ड.
हस्की पाळता यावा म्हणून माझी
हस्की पाळता यावा म्हणून माझी देश बदलायची तयारी आहे >> मी चुकून हत्ती वाचले. नंतर कळले कि हस्की आहे तेव्हा गुगल करून कन्फर्म करून घेतले कि तुम्हाला हस्की या ब्रीडबद्दलच बोलायचे आहे ते.
अवांतराबद्दल क्षमस्व !!!
भाजी आणायला नेउ शकतो. इतर
भाजी आणायला नेउ शकतो. इतर ठिकाणी?! >>>> शक्य तिथे सगळीकडे. अगदी रेस्टॉरंट शोधताना पण पेट फ्रेंडली शोधते.
बीगल मस्त ब्रीड. >>>> हो फार क्युट दिसतात लविंग आहे. पण अति खोडकर आणि रागीट असतात. दोन्ही वेळेस भरपूर व्यायाम दिला तरच ठीक नाही तर घरात खुप मस्ती आणि विध्वंस करतात.
सध्या तरी ओन्ड बाय अ डाक्सुन्ड >>>>> ओह, ते फारच क्युट असतात. :एक पप्पी:
हस्की मुंबईच्या हवेत अवघड, पण पुण्यात सर्रास पाळतात.
सुवर्ण मासे ,अहो हत्ती पण
सुवर्ण मासे ,अहो हत्ती पण पाळले असते. मी अगदी जंगल बुक टाइप आहे. माणसांतच जीव अवघडतो माझा.
अमा, तर मग तुम्ही
अमा, तर मग तुम्ही 'निसर्गाच्या गप्पा' सारख्याच 'पाळीव प्राण्यांच्या गप्पा' असा धागा काढा ना.
इथे एवढे विषय बोलले/लिहिले जातात, पण प्राण्यांबद्दल एखादं दुसरी कथा सोडता कधी चर्चा नसते.
मीरा पुन्हा एकदा आभार.'
मीरा पुन्हा एकदा आभार.'
अमा , तुमच्या सूचना खरोखर आवडल्या. उपयोग होईल. माझ्या घराजवळ जे हॉस्टेल्स आहेत ते थोडे महाग आहेत आणि कंजस्टेड पण आहेत. पण एक फायदा आहे. माझ्या पुतण्या दिवसातून दोनदा जाऊन भेटून येऊ शकतात. ज्यामुळे कुत्रीला (फिमेल आहे) सोडून तर गेले नाहीत ना असे वाटेल,
आज बरेच ठिकाणी गेलेलो. आपल्या अंगाला कुत्र्याचा वास असतोच. मी गेल्यावर ती कुत्री पिंज-याच्या दारावर धडका घेत होती. कसेसेच झाले. अजून एका ठिकाणी अगदी आत एक कुत्रं मोठ्याने रडत होतं. काही शांत होती.
आमची रिटर्न तिकिटंही काढून झालीत, नाहीतर हे पाहून कॅन्सलच केली असती ट्रीप,