चिकनचे लॉलिपॉपसाठी लागणारे २० पीस
४ चमचे मैदा
२ चमचे कॉर्नफ्लोअर
आल-लसुण-मिरची-कोथिंबीर पेस्ट १ मोठा चमचा
१ अंड
३ चमचे सोया सॉस
१ चमचा मिरेपूड
१ चमचा मिरची पूड
चवीनुसार मिठ
तळण्यासाठी तेल
अॅल्युमिनियम फॉईलचे छोटे तुकडे (धरण्यासाठी)
घरच्याघरी चिकन लॉलीपॉप बनवणे सोपे असते. चिकनवाल्याकडे लॉलीपॉपसाठी पिसेस हवेत सांगितल की तो बरोबर मांस वरच्या दिशेला ओढून आणि खाली हाड असे करून तुकडे करून देतो.
हे चिकनचे तुकडे आधी स्वच्छ धुवावेत.
ह्या तुकड्यांना वरच्या साहित्यातील तेल आणि अॅल्युमिनिअम फॉईल सोडून सगळे व्यवस्थित चोळून घ्यावे. साधारण एक तास तरी मुरु द्यावे.
आता कढईत तेल चांगले गरम करून मिडीयम गॅसवर हे तुकडे चांगले तळून घ्यावेत. गॅस मोठा ठेऊ नये त्यामुळे पीठ करपते. साधारण १०-१५ मिनीटे चांगले शीजू द्यावे आणि बाहेर काढून त्याच्या खालच्या हाडाला अॅल्युमिनीयम फॉईल पेपर गुंडाळुन सर्व्ह करावे.
लॉलिपॉप बनविण्याचा रेडीमेड मसालाही मिळतो. पण त्यापेक्षा घरी केलेला चांगला.
ह्यात रंग येण्यासाठी खायचा लाल रंग वापरतात पण मी वापरत नाही. त्या ऐवजी काश्मिरी मिरची पूड रंगाच काम करेल.
माझ्या बायकोने जागूतैकडे
माझ्या बायकोने जागूतैकडे मांदेली खाल्यापासुन तिचा शाकाहारावरचा विश्वासच उडलाय. नशिब अजुन “जागूतै-उरण, जागूतै-उरण” म्हणत झोपेतून उठली नाही.
जागू तू ना.. दर वेळेस रोमातून
जागू तू ना.. दर वेळेस रोमातून बाहेर यायला लावतेस बघ.
मस्त पाककृती.. लेकासाठी नक्कीच करून बघेन ग..
जागु, नवर्याने अद्याप मासे
जागु, नवर्याने अद्याप मासे सोडले तर बाकी नॉनव्हेज ओव्हन मध्ये केलेल नाहीये, करुन बघु मग सांगेन.
फोटो एकदम कातिल... खायची
फोटो एकदम कातिल... खायची इच्छा झाली..पण इथे ऑफिसात कुठून मिळणार...

Pages