चिकनचे लॉलिपॉपसाठी लागणारे २० पीस
४ चमचे मैदा
२ चमचे कॉर्नफ्लोअर
आल-लसुण-मिरची-कोथिंबीर पेस्ट १ मोठा चमचा
१ अंड
३ चमचे सोया सॉस
१ चमचा मिरेपूड
१ चमचा मिरची पूड
चवीनुसार मिठ
तळण्यासाठी तेल
अॅल्युमिनियम फॉईलचे छोटे तुकडे (धरण्यासाठी)
घरच्याघरी चिकन लॉलीपॉप बनवणे सोपे असते. चिकनवाल्याकडे लॉलीपॉपसाठी पिसेस हवेत सांगितल की तो बरोबर मांस वरच्या दिशेला ओढून आणि खाली हाड असे करून तुकडे करून देतो.
हे चिकनचे तुकडे आधी स्वच्छ धुवावेत.
ह्या तुकड्यांना वरच्या साहित्यातील तेल आणि अॅल्युमिनिअम फॉईल सोडून सगळे व्यवस्थित चोळून घ्यावे. साधारण एक तास तरी मुरु द्यावे.
आता कढईत तेल चांगले गरम करून मिडीयम गॅसवर हे तुकडे चांगले तळून घ्यावेत. गॅस मोठा ठेऊ नये त्यामुळे पीठ करपते. साधारण १०-१५ मिनीटे चांगले शीजू द्यावे आणि बाहेर काढून त्याच्या खालच्या हाडाला अॅल्युमिनीयम फॉईल पेपर गुंडाळुन सर्व्ह करावे.
लॉलिपॉप बनविण्याचा रेडीमेड मसालाही मिळतो. पण त्यापेक्षा घरी केलेला चांगला.
ह्यात रंग येण्यासाठी खायचा लाल रंग वापरतात पण मी वापरत नाही. त्या ऐवजी काश्मिरी मिरची पूड रंगाच काम करेल.
वॉव... जागुकाकी..! मस्तच
वॉव... जागुकाकी..! मस्तच दिसतायत हे लॉलीपॉप्स.. या वीकेंडला जरुर करुन बघेन..!!
वा ! तोंपासू
वा ! तोंपासू
जागु किती मनापासून करतेस ना
जागु किती मनापासून करतेस ना पदार्थ? सुरेख दिसतायत लॉलिपॉप
(तु च्यायला दगड शिजवून खायला घातलेस तरी गोडच लागतील बघ)
तुझ्या रेसिप्या वाचताना मला कायम ओगले आज्जी डोळ्यांसमोर येतात, का कोणजाणे.
अर्थात त्या सर्व पदार्थ शाकाहारी बनवायच्या (बहुतेक) पण त्यांच्या रेसिप्याच इतक्या ममताळू होत्या की
समोर असत्या तर खायला घालताना किती गोड वाटलं असतं असं वाटतं आणि तुझ्या रेस्प्या वाचताना पण सेम सेम वाटतं.
मी काही पाहिले नाही. मी काही
मी काही पाहिले नाही. मी काही वाचले नाही. मी काहीही प्रतिसाद देणार नाही.
शाकाहारी लोकांसाठी काय पर्याय
शाकाहारी लोकांसाठी काय पर्याय...? फ्लॉवरचे तुरे चांगले लागतील काय?
शाकाहारी लोकांसाठी काय पर्याय
शाकाहारी लोकांसाठी काय पर्याय...? फ्लॉवरचे तुरे चांगले लागतील काय?>>> +११११
मी नाही वाचणार हे,
जागुतै शाकाहार उत्तम आहार
यम्मी यम्मी लॉलीपॉप.
यम्मी यम्मी लॉलीपॉप.
मी रेडिमेड लॉलीपॉप मसाला वापरुन करते.
शाकाहारी लोकांसाठी काय पर्याय...?>>> शाकाहारी लोकांना सगळ्या मांसाहारी पदार्ठांसाथी पर्याय का हवा असतो हे एक कोडंच आहे

सोयाबीन-शाकाहारी मटन, चिकनच्या जागी बटाटे वै वै
डीजे, जाई, सस्मित धन्यवाद.
डीजे, जाई, सस्मित धन्यवाद.
दक्षिणा अग किती सुंदर प्रतिसाद आणि मला कुठे नेऊन ठेवलस. तुझ्या प्रतिसादात माया ओथंबून वाहतेय.
शालीदा
आंबट-गोड - फ्लावर, मश्रूम, पनीर, सोयाबीन चे करता येतील. हड्डी च्या जागी टुथ पीक वापरायची.
किल्ली आम्ही दोन्ही आहार घेतो.
तु च्यायला दगड शिजवून खायला
तु च्यायला दगड शिजवून खायला घातलेस तरी गोडच लागतील बघ)>> द़क्षु तै, हे वाचुन शाळेतली 'द स्टोन सूप' ही गोष्ट आठवली
शाकाहारी लोकांना सगळ्या
शाकाहारी लोकांना सगळ्या मांसाहारी पदार्ठांसाथी पर्याय का हवा असतो हे एक कोडंच आहे>>>>>> कारण आम्ही मांसाहारी नाही म्हणून !

अगं सस्मित, खरच जागूच्या कुठल्याही पाककृती छान रसरशीत असतात.
पण त्यातला मालमसाला बाजूला काढला तर व्हेजला वापरता येईल का ते आम्ही चाचपुन बघत असतो.
जागु, हे ओव्हनला करता येईल ना? ग्रिल वगैरे? कारण लॉलीपॉप खाणारे घरात दोनच मेंब्र आहेत.
त्यातला मालमसाला बाजूला काढला
त्यातला मालमसाला बाजूला काढला तर व्हेजला वापरता येईल का ते आम्ही चाचपुन बघत असतो.++११११११११
Wow, जागुले मस्त सोप्पी
Wow, जागुले मस्त सोप्पी रेसिपी
तोंपासू!!
तोंपासू!!
जागूताई मी यात किंचीत बेकींग
जागूताई मी यात किंचीत बेकींग सोडा टाकतो. सगळे लॉलीपॉप जरा मोठ्या आचेवर साधारण ६० टक्के तळून घेवून बाजुला काढतो. मग पुन्हा मंद गॅसवर पुर्ण शिजेपर्यंत तळतो. जास्त क्रिस्पी आणि चविला छान होतात.
)
(फॉईल लावल्यावर सुरेखच दिसतेय पण एवढा संयम पाळायला वेगळी साधना करावी लागेल मला.
मी काही पाहिले नाही. मी काही
मी काही पाहिले नाही. मी काही वाचले नाही. मी काहीही प्रतिसाद देणार नाही.>>> ह्य निश्चयाचं काय झाल>?
मला काय म्हणायचय ते
मला काय म्हणायचय ते जागूतैपर्यंत पोहचले.
मी कुठे काही निश्चय केला होता?
रागवुन दिला का हा प्रतीसाद ?
रागवुन दिला का हा प्रतीसाद ?
नाही पल्लवीवर रागावने शक्य
नाही पल्लवीवर रागावने शक्य तरी आहे का?
अरे मग ठीकै ! शाली, तुम्ही
अरे मग ठीकै ! शाली, तुम्ही रत्नागिरीच्या नाथाचा पत्ता द्या ना इथे.
अच्छा ! चिकन लॉलीपॉप हे अस
अच्छा ! चिकन लॉलीपॉप हे अस असतं होय ! एन्ड प्रॉडक्ट कसलं दिसतंय! जबऱ्या !!
दक्षिणा शी १००% सहमत
जागूच्या कुठल्याही पाककृती छान रसरशीत असतात. पण त्यातला मालमसाला बाजूला काढला तर व्हेजला वापरता येईल का ते आम्ही चाचपुन बघत असतो>> अगदी अगदी मी पण !
जागूताईच्या पाकृविषयी काय
जागूताईच्या पाकृविषयी काय बोलायचं! उर्दूत म्हणतात ना “तेरी आंखो को देखकर कईयोने पैमाने तोड दिए” त्या चालीत “जागूतैच्या पाकृ पाहून कित्येकांनी गळ्यातल्या (तुळशीच्या) माळा तोडल्या”

माझ्या बायकोने जागूतैकडे मांदेली खाल्यापासुन तिचा शाकाहारावरचा विश्वासच उडलाय. नशिब अजुन “जागूतै-उरण, जागूतै-उरण” म्हणत झोपेतून उठली नाही.
व्वा जागूतै! झकास रेसिपी.
व्वा जागूतै! झकास रेसिपी. फोटोज पण छान आले आहेत.
"शाकाहारी लोकांना सगळ्या मांसाहारी पदार्ठांसाथी पर्याय का हवा असतो हे एक कोडंच आहे" -
मी हे वाक्य कधी उलटं म्हणजे - ह्या शाकाहारी पदार्थाला मांसाहारी पर्याय काय असं नाही ऐकलं. 
मस्त यम्मी दिसतय !!!!
मस्त यम्मी दिसतय !!!!
वाह फारच सोपी आणि yummy
वाह फारच सोपी आणि yummy रेसिपी आहे. विकेंडला करायला हवी.
जागु, माझ्यासारख्या किचन फोबिया असणाऱ्या लोकांना पण तू कुकिंग सोपं करून देतेस. आणि नुसतं बेसिक नाही तर अशा विशेष डिशेस सुद्धा. घरचे लोक आश्चर्यचकित होताहेत की ही नवनवीन डिशेस कशी काय करायला लागली?
अगं सस्मित, खरच जागूच्या
अगं सस्मित, खरच जागूच्या कुठल्याही पाककृती छान रसरशीत असतात. Happy पण त्यातला मालमसाला बाजूला काढला तर व्हेजला वापरता येईल का ते आम्ही चाचपुन बघत असतो.>> चव फक्त मसाल्याची नसतेच मुळि, व्हेज साठी स्सोया लॉली पॉप ची बरर्राच उठाठेव असलेली क्रुती आहे मायबोलि वर, बहुधा सोया चॉप्स का?
दक्षिणा +१ ! जागुच लिखाण भारी असत मुख्य म्हणजे तिला खुप माहिती असुनही मला सगळ सगळ माहिती हा आव अजिबात नसतो.
खरच जागूच्या कुठल्याही
खरच जागूच्या कुठल्याही पाककृती छान रसरशीत असतात>>> +१.
फेरफटका - सहमत.
बाकी लॉलीपॉप मस्त... तोपासू..
Mee shakahari asunahi
Mee shakahari asunahi vachayala aale (dokyat paneer cha option gholavat :D).
Luv ur recipes..
आता बेलापूर उरण ट्रेन सुरू
आता बेलापूर उरण ट्रेन सुरू होणार आहे.
अरे किती झाडावर चढवाल.
अरे किती झाडावर चढवाल.
वर्षूतै, सोनाली, अंजली, फेरफटका, असुफ, देवकी, च्रप्स, नानबा धन्यवाद.
जागु, माझ्यासारख्या किचन फोबिया असणाऱ्या लोकांना पण तू कुकिंग सोपं करून देतेस. आणि नुसतं बेसिक नाही तर अशा विशेष डिशेस सुद्धा. घरचे लोक आश्चर्यचकित होताहेत की ही नवनवीन डिशेस कशी काय करायला लागली? स्पेशल कमेंटसाठी धन्यवाद मिरा.
प्राजक्ता धन्यवाद __/\__
रश्मी ओव्हनला नीट तळल जात का? मी कधी तळले नाही म्हणून विचारते. हा वरुन तेलाचा ब्रश मारून कदाचित तळल जात असेल. मी ओव्हनमध्ये तंदूरी केली आहे .
ब्लॅककॅट बेलापूरला रहाता का?
Pages