थोडा नाजूक विषय आहे. पण बोलायला तर हवेच. कारण त्याला सामाजिक महत्व आहे. जास्त पाल्हाळ न लावता थेट विषयावर येतो.
काहीजण (किबहुना बरेचजण) आपल्या वैवाहिक/एंगेज्ड/कमिटेड जोडीदाराविषयी इतके पजेसिव्ह का असतात? मुळात वैवाहिक/लैंगिक जोडीदाराबाबत पजेसिव्ह असणे हे नैसर्गिक आहे कि मानवी संस्कृतीचा परिणाम म्हणून आले आहे? लोक काय म्हणतील अशी भावना त्यामागे असते कि तू फक्त माझाच/माझीच अशी भावना असते? एकमेकाला आपापली स्पेस देऊन संसार करणे सुखकारक कि एकमेकाला जखडून एकमेकांवर पाळत ठेवत जगणे सुखकारक? पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आपली संस्कृती नष्ट होईल अशी काहीना भीती वाटते ती किती खरी आहे? ती संस्कृती आपलीशी करणारा एक वर्ग आणि ते करता न आल्याने चिडचिड होणारा दुसरा वर्ग अशामध्ये आपला समाज भरडला जात आहे का?
या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे. हे प्रश्न डोक्यात येण्याला कारण तसेच घडले. ती पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे सयुचित वाटते...
माझे माझ्या एका मित्राशी आणि त्याच्या बायकोशी अत्यंत मित्रत्वाचे संबंध आहेत. म्हणजे अर्थातच आधी हा माझा मित्र झाला. मग ती झाली. तशी ती आधी भेटत वगैरे होती. आमची अनेकदा नजरानजर होत होती. पण संवाद असा होत नव्हता. कारण संवादाचे काहीच कारणच नव्हते. पण काळाच्या ओघात अशा काही घटना घडल्या कि त्यामुळे हा माझा मित्र झाला. आवडीनिवडी आणि अनेक बाबींवर आमची मते जुळत असल्याने लवकरच आम्ही चांगले घनिष्ट मित्र झालो. घरी जाणेयेणे वाढले तसे त्याची पत्नी पण माझी चांगली मैत्रीण झाली. म्हणजे थट्टामस्करी करण्याइतकी निखळ मैत्री झाली. पुढे आम्ही व्हाट्सपवर पण जोडले गेलो. मेसेजेसची देवाणघेवाण होत होती. मस्करी पण चालत होती. अर्थात मैत्रीची मर्यादा ठेवूनच, हे वेगळे सांगायला नको. अन्यथा मैत्रीचे नाते राहिलेच नसते. हा आपल्या पत्नीविषयी पजेसिव्ह असेलसे कधीही वाटले नव्हते. नाहीतर काहीजण मी पाहिले आहेत. इतके सुद्धा त्यांना चालत नाही. त्यामानाने हा विचाराने फारच पुढारलेला "वाटत होता". म्हणून मी सुद्धा तिच्याशी संवाद साधताना फार कधी विचार केला नाही. तेवढा विश्वास निर्माण झाला होता आमच्यात. असे कित्येक महिने सुरु होते.
पण एक दिवस विचित्रच घडले. मी नेहमीप्रमाणे तिला मेसेज टाकला. बऱ्याच वेळाने सुद्धा तिला तो पोहोचला नसल्याचे लक्षात आल्यानंतर माझ्या मनात पाल चुकचुकली. तिचा प्रोफाईल फोटो पण गायब होता, स्टेटस सुद्धा दिसत नव्हते. मी तिची व्हाट्सप प्रोफाईल चेक केली आणि माझी शंका खरी ठरल्याचे लक्षात आले. तिने मला ब्लॉक केले होते. मला खूप आश्चर्य वाटले. थोडे वाईट सुद्धा वाटले. काय प्रकार झाला असेल याचा मी अंदाज करू शकत होतो. त्यानंतर हा मात्र भेटत होता. अगदी नेहमीप्रमाणेच. आमच्या गप्पा भेटणे वगैरे सगळे सुरूच होते. त्याच्यात काहीही म्हणजे काहीही फरक जाणवला नाही. जणू काहीच घडलेले नाही. पण ती मात्र अनेक दिवस गायब झाली होती. अधूनमधून भेटायची ती दिसेनाशीच झाली. असे पूर्वी कधी झाले नव्हते. त्यामुळे थोडी चिंता पण वाटू लागली. कारण अनेकदा ती भेटत असे दिसत असे. नक्की काय झालेय याचा मला बोध होईना. पण मित्राच्या आणि माझ्या नात्यात काहीही फरक झाला नसल्याने काही दिवसांनी मी सुद्धा विषय सोडून दिला. कुणी बोलले, बोलले. नाही बोलले, नाही बोलले. असेल काहीतरी झाले म्हणून विषय डोक्यातून काढून टाकला.
आणि एक दिवस अनेक दिवसांनी ती बाहेर दिसली. पण दुरूनच. आम्ही दोघांनीही स्माईल केले. काही झाले आहे असे दोघांपैकी कुणीच दाखवले नाही. मला नाही म्हटले तरी हायसे वाटले. कि चला फार वाईट असे काही घडलेले नसावे. त्यानंतर ते दोघेही अधूनमधून भेटत राहिले. हा तर काय नेहमीच भेटायचा. पण ती सुद्धा भेटू लागली. तिच्याशी पूर्वीइतका संवाद असा होत नव्हताच. एखादे स्माईल आणि हाय हेलो बस्स इतकेच. त्यापलीकडे काहीही बोलणे नाही. व्हाट्सपवरचे संवादसुद्धा अजूनही थांबलेलेच होते. अजूनही मी ब्लॉक होतो.
या सगळ्या प्रकारानंतर लक्षात आले कि तो स्वत:ला दाखवत होता तसा प्रत्यक्षात नव्हता. प्रत्यक्षात तो नक्कीच खूप पजेसिव्ह असणार. पण त्याचबरोबर आमच्यातल्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम होऊ नये हे सुद्धा त्याने पाहिले. हे दोन्ही मुद्दे सांभाळताना त्याला बरीच मानसिक कसरत करावी लागली असावी. किंवा कदाचित "आपण नात्यामध्ये एकमेकाला स्पेस देणारे आहोत" असे त्याला "वाटत" असावे पण प्रत्यक्षात वेळ आपल्यावर मात्र त्याला ते हाताळता आले नसेल असाही एक अंदाज आहे. माझा अजून एक मित्र आहे व त्याची पत्नी सुद्धा माझी चांगली मैत्रीण आहे. त्या दोघांच्याबाबत मात्र त्याच्यापेक्षा तीच माझी खूप चांगली मैत्रीण आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी परिस्थिती आहे. आपापली पूर्ण स्पेस त्यांनी एकमेकाला दिली आहे. नाते म्हणजे एकमेकाला जखडून ठेवणे नव्हे हे त्यांनी जाणले आहे. पण हे सर्वांनाच जमत नाही.
हे जे काही घडले यावर मला सल्ले नको आहेत. ते सगळे सोर्टआउट झाले/होईल तो भाग वेगळा. पण या सगळ्या घटनेमुळे माझ्या मनात वर धाग्याच्या सुरवातीला मांडलेले प्रश्न आले त्यावर आपली मते हवी आहेत. काहीजण आहेत (माझ्या ह्या मित्रासारखे) ज्यांना वरकरणी वाटते कि जोडीदाराला आपापली स्पेस देणे आवश्यक आहे पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर मात्र या गोष्टी हाताळता येत नाहीत. त्यांनी हे कसे हाताळावे? वगैरे वगैरे प्रश्न माझ्या मनात आले. ह्याबाबत मायबोलीकर आपली मते मांडू शकतात.
आता स्पष्टच बोलूया ,
आता स्पष्टच बोलूया ,
जोडीदार ला space द्यायची मर्यादा शारीरिक संबंधाला संपते ,
त्याचा अलीकडे space द्यायला कोणाचाच नकार नसतो ।
पण जेव्हा तिचा किंवा त्याचा शारीरिक संबंध ठेवायचा हेतू मनात असतो आणि तसे वागणं जाणवत तेव्हा जोडीदार विरोध करतो ,
आणि जगाच्या कोणत्या ही कोपरयात जोडी दारच्या शारीरिक संबंधाला space देने म्हणत नाहीत आणि ते स्वीकारलं जात नाही
आता स्पष्टच बोलूया >>>
आता स्पष्टच बोलूया >>>
राजेश भौनी लेखकास अपेक्षित
राजेश भौनी लेखकास अपेक्षित वळणावर गाडी थेट घातली आहे...
हि एक शक्यता केवळ युक्तिवाद
हि एक शक्यता केवळ युक्तिवाद करण्यासाठी ठीक आहे >>>>
मूळ धागाच युक्तीवादाचा आहे म्हटले तर असे वाटणारच.
पण खूप लोक व्हाट्सएप अकाउंट डिलीट करतात, काही महिने, वर्षभराने परत येतात. परत डिलीट करतात.
मी पण त्यातला एक.
लग्नाच्या जोडीदारासाठी
लग्नाच्या जोडीदारासाठी पझेसिव्ह का असतात हा प्रश्न पडलाय की दुस-याच्या लग्नाच्या जोडीदाराबाबत तिसरेच कुणी पझेसिव्ह असतात हा हे समजत नाहीये.
गली बॉय मध्ये आलिया कल्कीच्या
गली बॉय मध्ये आलिया कल्कीच्या डोक्यात बाटली फोडते त्याची आठवण झाली. प्रेम करून लग्न केले आहे म्हणजे त्यांची रिलेशन शिप लेव्हल
खूप डीप आहे. पझेसिव्ह पेक्षा प्रोटेक्टिव्ह म्हणा. बाय्का जरा व्हलनरेबल व खूप चटकन विश्वास ठेव णार्या असतात. त्यामुळे उगीच अन वाँटेड मेल अटेन्शन पासून वहिनींना वाचवायला त्यांच्या नवर्याने त्यांना सांगितले असेल ब्लॉक करायला. हे एक किंवा त्यांना ही जाणीव झाली असेल काहीतरी व त्यांनी ब्लॉक केले असेल. फार उहापोह न करता सेफ डिस्टन्स मेंटेन करावे. नाहीतर मैत्री खतम होउ शकते अग्लि आर्गुमेंट होउन. कोणतेच चॅट ट तितके वर्थ नाही.
एक तर एखदी व्यक्ती कमिटेड रिले शन शिप मध्ये असेल तर प्रोअॅक्टिव्हली एक पाउल मागेच घ्यावे. देअर आर अदर फिश. इफ यु आर सो इन्क्लाइन्ड. अँड सिंगल. नाहीतर इट इज अ व्हेरी स्टिकी सिचुएशन.
> जोडीदार ला space द्यायची
> जोडीदार ला space द्यायची मर्यादा शारीरिक संबंधाला संपते
काही जणांच्या मते स्पेस ची मर्यादा शारीरिक संबंधाला संपते तर अन्य काहींच्या मते व्यक्तिगत चाटिंग केले तरी संपते.
स्पेस(मोकळीक/स्वातंत्र्य) ची व्याख्या: "मी माझ्या जोडीदाराला स्पेस देतो/देते. पण... " आणि नंतर अटी टाकायच्या.
हि कसली मोकळीक? ह्या अटी प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार बनवलेल्या असतात. जसे कि...
१. मित्रमैत्रीण काय असेल ते कर पण माझ्याशीसुद्धा त्यांची ओळख हवीच
२. मित्रमैत्रीण हवे त्यांना कर पण माझ्या अपरोक्ष त्यांच्याशी चाटिंग वगैरे चालणार नाही
२. मित्र/मैत्रिणीबरोबर फिरायला वगैरे जायला हरकत नाही पण मी सुद्धा त्यात असेन तरच
३. हरकत नाहीत पण शारीरिक स्पर्श मला चालणार नाही
बघितले? प्रत्येक ठिकाणी "पण" आहे. मर्यादा आहे. ह्याला स्पेस म्हणता येईल का. म्हणजे जोडीदार ऑफिस मधून घरी आला/आली कि आपण आपल्या तेंव्हाच्या मानसिकतेनुसार ठरवणार कि त्याने/तिने स्पेस च्या मर्यादेचा भंग आज केला असेल कि नाही. कारण प्रत्यक्ष दिवसभरात काय केलंय आपण पाहिलेले नसते. मग त्या स्पेसच्या मर्यादेचे उल्लंघन दिवसभरात केले असेल पण आपल्याला संशय आला नाही तर आपण खूष. आणि उल्लंघन केले नसेल पण उगाच संशयास्पद काही आढळले तर आपला थयथयाट. स्पेस ची चुकीची व्याख्या करून आपणच आपली अडचण करून ठेवली.
> खूप लोक व्हाट्सएप अकाउंट डिलीट करतात, काही महिने, वर्षभराने परत येतात. परत डिलीट करतात.
अहो हि केस तशी नाहीये. तिने डिलीट वगैरे केलेलं नाही हे मला खात्रीने माहित आहे. आणि ते माहित करून घेणे फार अवघड पण नसते हे आपणास सुद्धा लक्षात आले असेल
> लग्नाच्या जोडीदारासाठी पझेसिव्ह का असतात हा प्रश्न पडलाय की दुस-याच्या लग्नाच्या जोडीदाराबाबत
मी धाग्यात सुद्धा सांगितलं आहे आणि नंतर सुद्धा कि मी पजेसिव्ह नाही. तो प्रश्नच नाही. विषय आहे कि वैवाहिक/लिव्ह-इन किंवा अन्य कोणत्याही तत्सम नात्यात जोडीदारा बाबत पजेसिव्ह का असतात बरेचजण. पजेसिव्ह असणे म्हणजे नाते आहे का.
स्पेसची व्याख्या, दुसऱ्याच्या
स्पेसची व्याख्या, दुसऱ्याच्या जोडीदाराशी मैत्री, नंतर मित्रापेक्षा जास्त चांगली मैत्री मित्राच्या जोडीदाराशी हा स्लिपरी स्लोप आहे आणि त्याचा अंत मैत्री साठी चांगला नाही इतकं बोलून मी माझे मोजके चार शब्द संपवते.
"त्या" दिवसापासून त्यांच्यात
"त्या" दिवसापासून त्यांच्यात दुरावा आला होता हे मला जाणवले होते. ---- हे कसं कळलं तुम्हाला? त्यांच्या घरात तुम्ही कॅमेरा लावला होतात आणि live feed बघत होतात का!
बाकी, अत्यंत चांगली मैत्री म्हणजे नक्की काय?
निधी, कशाला लेखकुला गिल्ट
निधी, कशाला लेखकुला गिल्ट फिलिंग देतेय...>> अरे मी कुठे देतेय. त्यांचे तेच घेतायत लोड करुन.
स्पेसची व्याख्या, दुसऱ्याच्या जोडीदाराशी मैत्री, नंतर मित्रापेक्षा जास्त चांगली मैत्री मित्राच्या जोडीदाराशी हा स्लिपरी स्लोप आहे आणि त्याचा अंत मैत्री साठी चांगला नाही इतकं बोलून मी माझे मोजके चार शब्द संपवते.>> +1.
नवरा-बायकोने एकमेकांबद्दल पझेसिव्ह असणे यात काय गैर आहे, तेच मला समजत नाहीये.
@ Parichit सर, सिंगल लोकांना
@ Parichit सर, सिंगल लोकांना मार्गदर्शन करणारा एखादा धागा काढा की... how to develop an irresistible personality यावर अचूक असं काहीतरी practical knowledge द्या काहीतरी
हा प्रश्न मी श्री. शशी थरूर यानापण त्यांना कळेल अशा इंग्रजीत विचारला पण त्यांनी काही उत्तर दिल नाही. तुम्ही नाही म्हणू नका
लाॅज वाला मवरा पाहाीज्
लाॅज वाला मवरा पाहाीज्
Parichit,घुमून फिरुन परत तेच
Parichit,घुमून फिरुन परत तेच ते बोलता तुम्ही. Nidhi म्हणते तसं मलाही हे गैर वाटत नाही . मनुष्य स्वभाव आहे तो. थोड्या फार प्रमाणात असतंच ते. पण तुमचे हे एकंदरीत धागे बघता तुम्ही एकूणच सर्व स्त्रियांच्या बाबतीत obsessive आहेत असं वाटतं. तसं नसेल तर शांत रहा. स्वताला तपासा. उगाच असे धागे काढून स्वताचं हसं करून घेऊ नका .
नवीन Submitted by
नवीन Submitted by भाग्यश्री१२३ on 4 March, 2019 - 13:54
- और ये लगा सिक्सर.. बॉल सिधे स्टेडियम के बाहर.
मला ऐश्वर्या आवडत असे. तिच्या
मला ऐश्वर्या आवडत असे. तिच्या नव-याने तिच्या साठी पझेसिव्ह असू नये जेणेकरून मी तिच्याबाबतीत पझेसिव्ह राहू शकेन असे मला वाटत असे. तिने माझ्याशी बोलावे, माझ्याकडे पाहून हसावे असे मला वाटायचे. जर ती नाही हसली तर मला झोप येत नसे. तिने असे का केले असेल या विचारांनी माझ्या मनात खळबळ होत असे.
( ही माझी केस आहे. कृपया दुस-यांच्या केसशी तुलना करू नये )
इतका विचार का करायचा पण कुणी
इतका विचार का करायचा पण कुणी बोलत नसेल तर? अनलेस तुमचं स्पेशल रिलेशन असेल. थोडे मनाने ओपन होणे गरजेचे असते कधी कधी.
१. बोलला तर आनन्द आहे नाही बोलला तरी आनन्द च मानायला आपण कधी शिकणार?
२. ति आता का बोलत नाही याचा विचार आपण करून का डोकं शिणवून घ्यायचं? समोर आली तात्पुरती हसली, जे असेल ते असेल, तेच खरं मानून चला... ती समोर खोटं हसली की खरं याची मीमांसा कशाला?
३. त्या नवरा बायकोत दुरावा आहे की आणखी काही, याचा विचार आपण का करा?
४. थोडे दिवस मैत्री झाली बोललो, आता बोलत नाही, पण समोर आली तर कडवटपणा नाही हे कितीतरी छान आहे. त्यातून विविध अर्थ काढून डोक्याचे दही कशाला?
५. ती व्यक्ती इतकी महत्वाची आहे का? की तिचा इतका विचार व्हावा, तो ही धागा काढून?
६. कुणी कुणाच्या बाबतीत पझेसिव्ह असावे की नाही, किती आसावे याचे गणित आपण का मांडतोय? आपण काय करतो ते पहा, योग्य वाटत असेल तर कंटिन्यु करा, अन्यथा बदल करा.
७. कुणाची स्पेस ची मर्यादा कुठे संपते आणि कुठे सुरू होते याचाही विचार आपण का करतो? आपण स्पेस म्हणून काय अपेक्षा करतो, आणि स्पेस म्हणून काय देऊ शकतो ते पहावे आणि पुढे चालावे.
८. काही लोक आपल्या आयुष्यात येतात, महत्वाचे होतात, कालांतराने अंतर पडते आपोआप ती नाती मरतात पण आपल्याला त्यांचे वाईट वाटत नाही. पण अचानक माणसे मरून जातात तेव्हा धक्का बसतो तसेच नात्याचे असते, पण मिस हॅप ची तयारी प्रत्येकाने ठेवावी.
९. काही लोक तोंडावर बोलून प्रॉब्लेम सोडवण्याची तयारी दाखवतात पण मॅक्झिमम लोक तसे करून वाईटपणा घेणे टाळतात. तुम्हाला कोणती कॅटेगरी पसंत आहे ते पहा आणि त्या प्रमाणे लोक निवडा किंवा नात्यात दोन घेणे दोन देणे ची तयारी ठेवा.
१०. सुखी रहा
कसला जबरदस्त प्रतिसाद आहे
कसला जबरदस्त प्रतिसाद आहे दक्षिणा. एकदम मुद्देसूद.
मला कधीकाळी मायबोलीवर येणारे
मला कधीकाळी मायबोलीवर येणारे धागे वाचून सुद्धा हा आयडी ब्लाॅक करावासा वाटतो............. ज्यांना WhatsApp सारख्या डायरेक्ट कम्युनिकेशनला सामोरं जावं लागत असेल त्यांची अवस्था पण माझ्या कल्पनेच्या पलिकडे आहे.
हे काय 'बी' धागे काढतात झालं
हे काय 'बी' धागे काढतात झालं
सगळेच नवरे रात्रीस खेळ चाले
सगळेच नवरे रात्रीस खेळ चाले मधले पाटणकर नसतात.
कसला जबरदस्त प्रतिसाद आहे
कसला जबरदस्त प्रतिसाद आहे दक्षिणा. एकदम मुद्देसूद.+१११११११११११११
दक्षिणा>> १०० टक्के सहमत
ती व्यक्ती इतकी महत्वाची आहे
ती व्यक्ती इतकी महत्वाची आहे का? की तिचा इतका विचार व्हावा, तो ही धागा काढून?
>> +1
आणखी एक शक्यता सांगतो -
आणखी एक शक्यता सांगतो - कदाचित तिला तुम्ही आवडत असाल, पण तुम्ही काही पुढाकार घेत नाही बघून कंटाळली असेल, केला असेल ब्लॉक ?
2019 - 03:24
2019 - 03:24
नवीन Submitted by भाग्यश्री१२३ on 4 March, 2019 - 13:54
- और ये लगा सिक्सर.. बॉल सिधे स्टेडियम के बाहर.
Submitted by हेला on 4 March, 2019 - 04:29
मला ऐश्वर्या आवडत असे. तिच्या नव-याने तिच्या साठी पझेसिव्ह असू नये जेणेकरून मी तिच्याबाबतीत पझेसिव्ह राहू शकेन असे मला वाटत असे. तिने माझ्याशी बोलावे, माझ्याकडे पाहून हसावे असे मला वाटायचे. जर ती नाही हसली तर मला झोप येत नसे
ऐशवर्या च्या सर्व विडिओ पहा त्यातील विविध प्रकारे hasnyachya क्लिप वेगळ्या करा ,
आपल्याला जे हसू पसंद आहे ती क्लिप eddit करून video वॉलपेपर म्हणून मोबाईल वर ठेवा ,
Baga रोज, कधीही ऐशवर्या तुमच्या कडे बघून हसेल ,
आणखी एक शक्यता सांगतो -
आणखी एक शक्यता सांगतो - कदाचित तिला तुम्ही आवडत असाल, पण तुम्ही काही पुढाकार घेत नाही बघून कंटाळली असेल, केला असेल ब्लॉक ?>>>> अजूनही वेळ गेलेली नाही परिचित साहेब. जा जाऊन तीला नवऱ्याच्या समोर सांगा माझ्या मनात फक्त तूच आहेस, तुझ्यासाठी मी मायबोलीवर धागा पण काढलाय, पाहिजे असेल तर मी येतो व्हायोलीन घेऊन बॅकग्राऊंड मोहबत्ते मधलं संगीत द्यायला. नाहीतर चेन्नई एक्सप्रेस मधल्या शाहरुख सारखी फायटिंग करा नवऱ्यासोबत आणि घेऊन या मायबोलीवर तीला.
तुम्हाला ती आवडते का?
तुम्हाला ती आवडते का? त्यामुळे तिची कमतरता इतकी जाणवतेय का? उत्तर हो असेल तर कधी तुम्ही तिला सांगायचा प्रयत्न केला आहे का? आवडत असल्यास कोणत्या लेव्हल पर्यंत आवडते याची क्लॅरिटी खुद्द तुम्हाला आहे का? ती क्लॅरिटी तिला देण्याइतके धाडस तुम्ही बाळगता का?
आणि ती आवडत नसेल तर माझी वरची पोस्ट पुन्हा वाचा.
त्यांचा प्रश्न फ़क्त aika घटने
त्यांचा प्रश्न फ़क्त aika घटने पुरता नाही ।
आशा घटना अनेक व्यक्ती बरोबर त्यांच्या बाबत घडला आहे ,
त्या मुळे त्यांच्या बाबतीतच आस का घडत हा मूळ प्रश्न आहे ,
आणि त्याचा दोष ते समोरच्या व्यक्तीच्या पार्टनर चाच आहे ,
आस त्यांचा आरोप आहे
कसला जबरदस्त प्रतिसाद आहे
कसला जबरदस्त प्रतिसाद आहे दक्षिणा. एकदम मुद्देसूद.> +१.
.
.
कदाचित तिला तुम्ही आवडत असाल, पण तुम्ही काही पुढाकार घेत नाही बघून कंटाळली असेल, केला असेल ब्लॉक ? >> आणि हा च्रप्स यांचा शह, पुढच्याचा वजीर आणि शह देण्याऱ्या उंटाच्या मध्ये हरभऱ्याचे झाड.
दक्षिणा, चांगला प्रतिसाद.
दक्षिणा, चांगला प्रतिसाद. एकदम मुद्देसूद.
काय हे परिचितानु
काय हे परिचितानु
Pages