अहो नाव सांगा ना, कोडी कसली घालताय!

Submitted by मभा दिन संयोजक on 1 March, 2019 - 02:13

अहो नाव सांगा ना, कोडी कसली घालताय!

पुस्तकांची मुखपृष्ठे ही सामान्यतः पुस्तकातल्या मजकुराला साजेशी बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आपल्या एखाद्या आवडत्या पुस्तकाचं मुखपृष्ठही आपल्या मनात घर करून बसलेलं असतं. ' स्वामी' कादंबरीवरचा थेऊरचा चिंतामणी असेल, किंवा ' राऊ' वरचा तलवार धरलेला हात असेल, ही प्रसिद्ध मुखपृष्ठंं म्हणजे त्या त्या पुस्तकाची एक ओळखच असते. आजचा आपला हा खेळ, ही ओळख किती पक्की आहे याची चाचपणी करणारा आहे.

कोडं घालणार्या भिडूने एखाद्या मराठी पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा फोटो इथे द्यायचा. पुस्तकाचं नाव अर्थातच लपवून ठेवायचं. लेखकाचं नाव लपवायचं की दाखवायचं, म्हणजेच कोडं किती सोपं किंवा कठीण करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. इतरांनी हे पुस्तक ओळखण्याचा प्रयत्न करायचा. नाहीच जमलं, तर क्ल्यू मागायचा. जो भिडू पुस्तक बरोबर ओळखेल, त्याने पुढचं कोडं घालायचं.

नियमः
१. तुम्ही तुमच्याकडच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा फोटो काढून येथे द्यायचा आहे.
२. पुस्तक तुम्ही वाचलेलं असल्यास उत्तम, म्हणजे कुणी क्ल्यू विचारला तर तो तुम्हाला देता येईल.
३. शक्यतो बर्यापैकी प्रसिद्ध पुस्तकांच्याच मुखपृष्ठांचे फोटो द्यावेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या खेळात भाग घेता येईल आणि खेळाची मजा वाढेल.

चला तर मग! पहिलं कोडं आमच्याकडून!

IMG_20190301_113507.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला खेळ.
संयोजक, प्रताधिकार समस्या येणार नाही ना ?

कोड सोडवणाऱ्या भिडूने पुढचं कोड घालायचं हे मी वाचलं नव्हतं म्हणून प्रतिसाद संपादित करत आहे
मानिम्याऊ येउद्या काहीतरी

@जिद्दु
ते मुखपृष्ठ पोस्ट करा ना.. मला बहुतेक उत्तर येत होतं

मनीमाऊ व्यस्त असतील आणि संयोजकांनी परवानगी असेल तर मी तो फोटो टाकतो . चैतन्य यांनी तो ओळखला असल्याने पुढचं कोड ते घालतील

@ जिद्दु
तुम्ही ते मुखपृष्ठ पोस्ट तर करा, लेखक ओळखले आहेत, पण पुस्तकाचं नाव सांगणं अवघड आहे

Image and video hosting by TinyPic

@स्निग्धा बरोबर ... तुम्ही आणि चैतन्य दोघांनी आता नवीन कोडी टाका . मानिम्याऊ पण टाकतीलच नंतर

Pages