डोंगरप्रेम

Submitted by एडी on 26 February, 2019 - 22:20

मावळतीला लालीच्या साक्षीनं ती दोघच डोंगर उतरत होती, दिवसभराचा शीणवटा दोघांनाही जाणवत होता.
डोंगराची उतरण दोघांनाही एकमेकांचा स्पर्श करण भाग पाडत होती. अखेरच्या टप्प्यावर डोंगरानं त्यांना अजून जवळ येण भाग पाडलच. शेवटच्या पायरीवरून ती जवळजवळ उडी मारून डोंगरापासून विलग होत म्हणाली
ती : ए झाला यार ट्रेक पूर्ण!
तो : हम्म!
ती : काय झालंय म्हसोबा?
तो : काहीं नाही.
ती : तू कुठे जाणार आहेस आता.
तो : तळेगाव. मित्राकडे.
ती : का बसायचा प्लॅन आहे का. ह्या ह्या ह्या!
तो : काहीही हा तू पण!
ती : नाही, तुच्यासोबत बसणार नसशील तर माझ्या सोबत बस. कॉफीला.
तो : क्काय?
ती : अरे गधड्या डेट ला विचारतेय रे मी.
तो : माझी डेट आधीच ठरलीये, त्याच्याच सोबत!

निघताना त्याच्या गाडीवर ती सकाळीपेक्षा जास्तच लांब बसली. मागे डोंगर चंद्राच्या हातात हात घेऊन त्याच्याच साक्षीने फुललेलं नवीन दुनियेतल प्रेम बघत होता.

Group content visibility: 
Use group defaults

यातला अबोध , शब्दातीत ; असा काहीसा रोमन्स ... त्या रोमान्सचे एकतर्फीपण आनंदाने स्वीकारलेले... सगळ्यांना जाणवेलच असं नाही !
छान .