सौदी अरेबियाविषयी माहिती हवी आहे

Submitted by Namrata Siddapur on 26 February, 2019 - 01:45

माझा नवरा कामानिमित्त १ महीना सौदी अरेबियातील यानबु येथे जाणार आहे. पहिल्यांदा सौदीअरेबिया ला जाणार म्हणुन काही प्रश्न आहेत..
१. काय न्यावे आणि काय नेऊ नये(चुकुनही)
१. कामाच्या ठिकाणी काय काळजी घ्यावी.
३.या आणि पुढील महिन्यात तापमान किती असेल दिवसा आणि रात्री)
४. नवरयाला नेहमीच खूप घाम येतो तर काय काळजी घ्यावी.
५. कोणती प्रेक्षणीय स्थळे बघावी.
६. सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी पेहरावाचे काय बंधन?
७. खाण्याच्या कोणत्या वस्तू घेउन जाता येतात ?
८. नवरयाला फक्त पोहे, मॅगी, चहा करता येतो, शुध्द शाकाहारी हॉटेल आहेत का?
९. धार्मिक पुस्तक किंवा देवाचा फोटो घेउन जाता येतो का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धार्मिक पुस्तक किंवा देवाचा फोटो घेउन जाता येतो का?.......सद्यपरिस्थिती माहित नाही.इस्लामिक देश असल्याने १५-१६ वर्षांपूर्वी देवाचे फोटो/पुस्तक चालत नव्हते.आमचा फॅमिली फ्रेंड सौदीला गेला होता, तो सांगायचा की विमानतळावर चेकिंगच्यावेळी बरेचजणांच्या कडे सापडलेली धार्मिक चिन्हें/पुस्तके डस्ट्बिनमधे फेकण्यात आली.मित्र आणि इतर काहीजण गुरुवारी एकत्र जमून अगदी हलक्या आवाजात आरती करीत.आमचा मित्र पण सव्वा ते दीड वर्षात परत आला.

बाकी माहिती माबोकर सांगतीलच.

१. काय न्यावे आणि काय नेऊ नये(चुकुनही):- खसखस, जायफळ आणि हे दोन पदार्थ घातलेले काहीही. गुंगी/ नशा आणणारे कोणतेही पदार्थ.
१. कामाच्या ठिकाणी काय काळजी घ्यावी. :- धार्मिक बाबतीत वाद घालू नयेत. सेफ्टी रिक्वायरमेंट कसोशीने पाळाव्या.
३.या आणि पुढील महिन्यात तापमान किती असेल दिवसा आणि रात्री) :- मार्च फारसा गरम पण नाही आणि थंड पण नाही. भारतात नेहमीचा एप्रिए/ मे चा उन्हाळा असतो तसेच वातवरण असेल.
५. कोणती प्रेक्षणीय स्थळे बघावी. :- बघण्यासारखे विशेष काही नाही. समुद्र किनारा आणि कॉर्निच सोडल्यास.
६. सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी पेहरावाचे काय बंधन? :- तेल वायू क्षेत्रात असाल तर फिल्ड जॉब साठी फायर रिटार्डंट ड्रेस/ coverall. बाकी ठिकाणी फॉर्मल्स, बाहेर फिरताना नेहमीचे casuals
७. खाण्याच्या कोणत्या वस्तू घेउन जाता येतात ? :- मी चितळेंच्या बाकरवडी पासून ते घरी बनवलेल्या लाडूंपर्यंत सर्व काही नेलं आहे. कधीही कोणीही अडवले नाही.
८. नवरयाला फक्त पोहे, मॅगी, चहा करता येतो, शुध्द शाकाहारी हॉटेल आहेत का? :- नाही. जुजबी स्वयंपाक शिकल्यास उत्तम. बर्‍याच हॉटेल्स मधे शाकाहारी पदार्थ मिळतात. दाक्षिणात्य पदार्थ सर्रास मिळतात.
९. धार्मिक पुस्तक किंवा देवाचा फोटो घेउन जाता येतो का? :- हे सर्वस्वी तिथे त्या वेळेस बॅग चेक करायला कोण आहे त्यावर अवलंबून आहे. पुस्त़क किंवा फोटोला काही प्रॉब्लेम येईल असे वाटत नाही. पहिल्यांदाच जात आहात तेव्हा खूपच धार्मिक नसाल तर शक्यतो टाळलेले बरे. तसेही आता सगळी महत्वाची धार्मिक पुस्तके नेटवर/ अ‍ॅपवर उपलब्ध आहेत.

नवरयाला फक्त पोहे, मॅगी, चहा करता येतो, शुध्द शाकाहारी हॉटेल आहेत का?>>>>>>>>>>..

या बाबतीत अजून एक. रेडी टू कूक प्रकारातील पदार्थ नेता येतील. तिथे पण थोडेफार मिळतात.

स्वादिष्ट आणि आरोग्यदायी सलाड्स तयार करुन खाण्याचा पण पर्याय आहे. पाककृती हव्या असल्यास माझे लेखन पहा किंवा मला विपू करा Proud