गझल - मीच एक आहे

Submitted by बेफ़िकीर on 22 February, 2019 - 06:33

गझल - मीच एक आहे
=====

रूपवान आहे कोणी, शीलवान आहे
मीच एक आहे ज्याचे, मन महान आहे

का हताश व्हावे मी की, भेट होत नाही
ती जगात आहे तर जग, खूप छान आहे

त्या मनात होतो तेव्हा, प्रश्न हा पडेना
या जगात अपुले नक्की, काय स्थान आहे

ज्या क्षणास दुःखांनाही, लावला लळा मी
एक एक सुख माझे तर, गपगुमान आहे

मद्य प्राशणारा कायम, सत्य बोल बोले
तो नशेत आहे ज्याला, आत्मभान आहे

अर्थ रामदासांनी का लावला चुकीचा
शब्द फक्त पुरुषांसाठी, सावधान आहे

एकट्यास सांगा 'सारे, एकटेच येथे'
दृष्टिकोन देणेसुद्धा, नेत्रदान आहे

एक मी न आलो याचा सूड केवढा हा
मैफिलीत कोणाचाही मानपान आहे

फक्त अंतराला मधल्या, ठेव अंतरावर
जन्मणे नि मरणे बाकी, समसमान आहे

खूप काळ आहे हाती, सोड या भ्रमाला
हे जहाज नाही मित्रा, हे विमान आहे

त्यास तर गझल सुचते...तो.... गझलला सुचेना
तो लहान आहे सोडा, तो लहान आहे

होय, चांगला होता पण, भावलाच नाही
'बेफिकीर'ची इतकीशी दासतान आहे

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे किल्ली

हल्ली कोणीही काहीही करत असते

आपण फक्त बघत राहायचे

धन्यवाद , तुम्ही हे आवर्जून कळवलेत याबद्दल

कुठे कुठे लक्ष असतं तुझे पल्लवी! त्याने बेफिकीर यांचे नाव टाकले आहे. अर्थात परवानगी घ्यायला हवी होती.

आवडली हीही गझल.. Happy

ज्या क्षणास दुःखांनाही, लावला लळा मी
एक एक सुख माझे तर, गपगुमान आहे
>> हा शेर खूप आवडला Happy

किल्लीतै बरं झालं बेफीजींना इकडेच कळवलंस ते. चोरीचं त्यांच्या लक्षात तरी आलं. इथे मी त्या कथेखाली टाकलेला प्रतिसाद, पण त्यांनी पाहिला नसावा.. Happy

नवीन Submitted by किल्ली on 22 February, 2019 - 21:48>> रच्याकने माझं नाव वाचून अरेच्चा झालं क्षणभर! Lol

मस्त !! पण.....

का हताश व्हावे मी की, भेट होत नाही
ती जगात आहे तर जग, खूप छान आहे >>>> इथे जग या शब्दा आधी स्वल्पविराम हवा होता असे मला वाटते. ओळ मोठ्याने म्हणून बघा. तुमच्या चूका दाखवण्याचा हेतू अजीबात नाही कारण मला कविता, गझल, कथा यातले काहीच म्हणजे काहीच कळत नाही. पण गाणे या क्षेत्रात होते काही काळ, त्यामुळे ते जरा खटकले इतकेच. दुखावला गेला असाल तर सॉरी !

तसेच ती जगात आहे ऐवजी, ती या जगात आहे असे पण वाचायला छान वाटेल कदाचीत. ते तुमच्या गझलेत बसेल का हे मात्र माहीत नाही.