आपण असू लाडके : मुलाखत(१)

Submitted by स्वाती_आंबोळे on 15 February, 2019 - 11:02

या मालिकेतील माहितीपर लेखः
१. गुलाबी त्रिकोणात कैद
२. इंद्रधनुष्यात किती रंग?
३. समज आणि गैरसमज

सर्वप्रथम या उपक्रमात सहभागी होत असल्याबद्दल अनेक आभार.
लैंगिक अल्पसंख्यांकांचे अनुभव, अडचणी, संघर्ष यांबद्दलची माहिती वाचकांना व्हावी आणि त्यांना समजून आणि सामावून घेण्याकडे त्यांची वाटचाल सुरू व्हावी असा या मुलखतींमागचा हेतू आहे.
यातल्या काही अनुभवांबद्दल बोलणं कदाचित नकोसं, त्रासदायक असू शकतं याची आम्हाला कल्पना आहे. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणं या किंवा अन्य कुठल्याही कारणाने अवघड वाटत असेल तर तो प्रश्न तुम्ही वगळू शकता.
मुलाखती प्रकाशित करताना तुमची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.

अ. पार्श्वभूमी

१. तुमच्या कुटुंब कुठल्या देशातलं / संस्कृतीतलं आहे?
- मूळचे आयरिश कुटुंब, अमेरिकेत लहानाची मोठी झाले.

२. घरी कोणकोण असतं? भावंडं किती?
- दोन मोठी भावंडं, घरात एकूण आईवडील आणि आम्ही भावंडं मिळून पाच माणसं.

३. आईवडील कोणत्या क्षेत्रांत काम करतात?
- वडील म्यूझिशियन / क्वायर डिरेक्टर आहेत, आई डे केअर टीचर म्हणून काम करते.

४. तुमचं वय काय?
- १५ वर्षं.

५. तुम्ही काय करता?
- मी हायस्कूलमध्ये आहे.

६. तुमचं शारीरिकदृष्ट्या लिंग (sex) कोणतं?
- स्त्री.

७. तुमचा वेगळेपणा लक्षात येण्याआधी तुमचा घरच्यांशी खुला संवाद होता असं म्हणता येईल का?
- नाही, आईवडिलांशी फारसा मोकळा संवाद कधीच नव्हता. घरात कडक शिस्तीचं वातावरण होतं.

ब. वेगळेपणाविषयी:

१. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लैंगिकतेचं भान येण्याआधी तुमच्या ओळखीतलं कोणी लैंगिक अल्पसंख्यांकांपैकी असल्याचं माहीत होतं का? तेव्हा तुमचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय होता?
- माझ्या अत्यंत जवळच्या काही मित्रमैत्रिणी बायसेक्शुअल होत्या. त्यांच्यामुळे मला मुळात असं काही असतं आणि अशा व्यक्तीही माणूस म्हणून छान असू शकतात हे कळलं.

२. तुम्ही लैंगिक अल्पसंख्यांकांच्या कुठल्या प्रकारात येता?
- मी बायसेक्शुअल आहे.

३. आपण अशा प्रकारचे आहोत हे तुमच्या कधी आणि कसं लक्षात आलं?

४. सुरुवातीला हे कळल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया काय होती? भीती? कुतुहल? शरम?
- खरंतर बरं वाटलं. त्याआधी सतत कुठेतरी काहीतरी चुकत असल्याची एक भावना छळत असायची - हे कारण लक्षात आल्यावर ती नाहीशी झाली. आईवडिलांना काय वाटेल याची मात्र खूप भीती वाटली. अजूनही वाटते.

५. तुम्ही याबाबात अधिक माहिती मिळवायचा प्रयत्न केला का? कसा?
- इन्टरनेट वापरून शक्य तितकी माहिती मिळवली.
-
६. याबद्दल मोकळेपणाने बोलता येईल, मानसिक आधार वाटेल असं कोणी तेव्हा तुमच्या आयुष्यात होतं का?
- हो, अगदी जिवाभावाच्या काही मित्रमैत्रिणी.

७. घरी कधी सांगितलंत?
- घरी अजून सांगितलेलं नाही.

८. घरच्यांची प्रतिक्रिया काय होती?

९. याबाबतीत डॉक्टरचा सल्ला प्रयत्न केला होता का? काय सल्ला मिळाला?

१०. या नवीन माहितीचा घरातल्या वातावरणावर काही परिणाम झाला का?

११. जवळच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणाशी यासंदर्भात बोललात का? त्याचा काय परिणाम झाला?
- होय. त्यांना बहुधा अंदाज असावा कारण त्यांना सांगितल्यावर अजिबात नवल वाटलं नाही. त्यांनी अगदी सहज या वस्तुस्थितीचा स्वीकार केला.

१२. यामुळे आपण वाळीत टाकले जाऊ अशी भीती कधी वाटली का?
- हो, वाटली, वाटते.

१३. यामुळे एकाकी वाटलं का?
- हो.

१४. चारचौघांपेक्षा निराळं असल्याबद्दल स्वत:चीच चीड आली का?
- हो.

क. शिक्षण/व्यवसायसंबंधी

१. शिक्षणाच्या वा नोकरीव्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या लिंगभावाविषयी किंवा लैंगिक कलाविषयी माहिती होती का? त्यामुळे कधी भेदभाव, संधी नाकारली जाणं असं काही घडलं का?
- नाही, कारण मुळात अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींव्यतिरिक्त हे कोणाला माहीतच नाही.

२. यावरून कधी कुठल्या प्रकारचा त्रास किंवा छळवणूक यांना तोंड द्यावं लागलं का?
- नाही, कारण मुळात अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींव्यतिरिक्त हे कोणाला माहीतच नाही.

३. वरील दोन्हीपैकी कुठल्याही संदर्भात संबंधित अधिकार्‍यांकडे दाद मागायची वेळ आली का? त्यावर योग्य ती कारवाई केली गेली का?

ड. व्यक्तिगत
१. तुम्हाला तुमचा जोडीदार भेटला आहे का?
- नाही.

२. या जोडीदाराची भेट कशी झाली?

३. तुम्ही जोडीदार-सूचक संकेतस्थळं (डेटिंग साइट्स) किंवा तत्सम अन्य कुठली सुविधा कधी वापरली आहे का? तो अनुभव कसा होता?
- नाही.

४. तुम्ही STD/HIV चाचण्या केल्या आहेत का? नियमीतपणे करता का?

५. कोणाशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याआधी ती व्यक्ती वरील चाचण्या केलेली आणि सुरक्षित आहे याची पडताळणी करता का?

६. लैंगिक अल्पसंख्यांकांत गणल्या जाणार्‍या जोडीदाराकडून कधी वाईट अनुभव आला असं झालं का?

७. तुम्हाला लग्न करावं, आपली मुलं असावीत असं वाटतं का?
- लग्न करायला आवडेल असं वाटतं. मुलं नकोत.

८. या सर्व प्रवासात अशी कुठली घटना आहे ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते?
- मला मी अशी आहे हे नीट समजून घेता येणं हेसुद्धा मला मोलाचं वाटतं.

९. अशी कुठली घटना आहे जी शक्य असतं तर तुम्ही स्मृतीतून पुसून टाकली असतीत?

इ. तुम्ही आणि समाज

१. तुम्ही लैंगिक अल्पसंख्यांकाच्या कुठल्या चळवळीत सहभागी आहात का?
- नाही.

२. तुमच्या वेगळेपणाविषयी तुम्ही खुलेपणाने बोलता की फक्त अगदी आवश्यक असेल तरच आणि तितकंच बोलता?
- आवश्यक तिथेच आणि तितकंच बोलते.

३. याबद्दल समाजात जागृती व्हावी असं तुम्हाला वाटतं का? त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करता का?
- हो, लोकांना माहिती व्हायला हवी असं वाटतं, पण सध्या मी त्याबाबत काही करत नाहीये.

४. आदर्श समाजाबद्दलची तुमची कल्पना काय आहे?
- ज्यात होमोफोब्ज (homophobic - होमोसेक्शुअल लोकांपासून फटकून वागणारे, त्यांचा तिरस्कार करणारे लोक) नसतील असा समाज!

तळटिपा :
१. कोणतंही उत्तर गाळण्याचा किंवा त्याबद्दल विस्ताराने न बोलण्याचा मुलाखतदात्या व्यक्तीला पूर्णपणे अधिकार आहे, ज्याचा आदर बाळगला गेला आहे. कोणत्याही माहितीसाठी कुठल्याही प्रकारचा आग्रह मुलाखत घेताना केलेला नाही.
२. मूळ मुलाखत इंग्रजीत आहे, माझ्यापरीने मराठी भाषांतर केलं आहे. जिथे रूढ मराठी शब्द सुचले नाहीत तिथे ओढाताण करण्यापेक्षा मूळ इंग्रजी शब्दच वापरले आहेत.

साहाय्य : मुलाखत घेण्यासाठी आणि शब्दांकित करण्यासाठी सायुरी सप्रे हिचे मनःपूर्वक आभार.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही आणि समाज>>> बापरे! काय काय सहन करत असतील हे लोक. तेही कारण नसताना. माझी एक मैत्रीण आहे कॉलेजच्या दिवसापासुन. तिचा त्रास मी फार जवळून पाहिला आहे. इतक्या वर्षांच्या मैत्रीनंतरही मी कधी कधी “का बोलला? कधी आला? कुठे गेला होता?’ असे शब्दप्रयोग करतो चुकून. कारण सुरवातीला आमची ओळख झाली त्यावेळी घरच्यांच्या दडपणामुळे तो मुलगा म्हणून वावरत होता. त्याच्या घरच्यांनी तिला अजुनही स्विकारले नाहीए किंबहुना सोयीस्कररित्या विसरुन गेलेत. Sad