पुलवामा हल्ला.

Submitted by Filmy on 15 February, 2019 - 04:09

ह्या भ्याड हल्ल्यात ४० हून अधिक जवान मृत्युमखी पडले आहेत आणि कित्येक जखमी झाले आहेत.
ड्युटी जॉईन करायला निघालेल्या जवानांच्या वाहनांवर हल्ला झाला आहे. नेहमीपेक्षा अडीचपट अधिक जवानांचा ताफा होता. ३५० किलोची स्फोटके घेतलेला ट्रक वाहनांना जाऊन धडकतो आणि त्याचवेळी गोळीबारही होतो म्हणजे हा नक्कीच पूर्वनियोजित कट आहे आणि आपले इंटेल काय करीत आहे?

जैश ए महम्मद या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पण आपल्याकडे या अपयशाची जबाबदारी कोण स्विकारणार आहे? सरकार? ५६ इंची छातीचा लोहपुरुष? संरक्षण मंत्री? गृहमंत्री? डोवाल? लष्कर? इंटेलिजन्स एजन्सीज?

उरी नंतर गाजावाजा करून सर्जीकल स्ट्राईक केले. त्यावर राजकारण केले गेले. नुकताच चित्रपट काढून जाहिरातीही केल्या आणि आता पुन्हा तीच आवृत्ती?

हे कधी थांबणार आहे का? सरकारला पर्यायाने आपल्यालाही काय करावे लागणार आहे याची थोडीतरी कल्पना आहे का? मुळात प्रश्न काय आहे याची जाणीव तरी आहे का? जाणीव नसणाऱ्यांनाच आपण सत्तेच्या चाव्या देत आहोत का?

निषेध, राग, उद्विग्नता, उदासीनता, RIP इत्यादींच्या स्मायली आणि बाष्कळ ओळी टाकण्यापेक्षा ठोस काही होणार आहे का? कधी?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भक्तांची सिक मनोवृत्ती गेली 5 वर्षे पाहून बनलेला हा माईंड सेट आहे,
बाकी झालेली तडफड पाहून बाण निशाण्यावर लागला याची खात्री झाली.

गेल्या काही तासातील भाजप नेत्यांच्या हालचाली पाहता कोण सिक मानसिकतेचे आहे ते लोकांना कळेलच
हल्ला झाल्यावर काही तासात राहुल चे मोरफड फोटो प्रसिद्ध झाले
प्रियांका बातमी ऐकून हसली म्हणून फेक व्हिडीओ फिरले
मोदी विवध प्रचारसभांमध्ये फिरले
शहा प्रचार सभा
योगी प्रचारसभा
मनोज तिवारी व्हॅलेंटाईन डे चे नाच गाणे
हे सगळे कोणती मानसिकता दर्शवतात?

26 11 आणि मोदी प्रेस कॉन चा वर उल्लेख झाला आहेच.
SMriti बाई तेव्हा PM ना बांगड्या द्यायला निघाल्या होत्या, सध्याच्या PM ना काय द्यायचे पाठवून?

200-300kg RDX is not smuggled inside the country on people's backs. It doesn't happen in a day. Nor is it manufactured in somebody's house. If not you, then who'll ask them how this much RDX came to a highly sensitive area like Kashmir?

This is the fourth major attack in the tenure of NSA Ajit Doval after Pathankot, Nagrota and Uri. Why is he not able to prevent such attacks even after specific intelligence inputs?

It has come to light that there were intelligence inputs for this attack too. Given the fact that J&K is under governor's rule and therefore indirectly under the central government's rule. Why weren't these inputs acted upon?

Who will ask these questions? Don't get played upon.

हा जैशचा अतिरेकी मसूद अझहर म्हणजे कोण ?

तर बाजपेयीं काळात कंधार विमाणप्रकरनात बाजपेयीं/ अडवाणी/डोवाल या टीमने ज्या अतिरेक्यांना सोडले , त्यापैकी हा एक.

https://www.bbc.com/hindi/india-47242896?ocid=socialflow_facebook

मुंबई हल्ल्या नंतर, आपण किती बेसावध आहोत हे जगाला दिसले. तो अत्यंत कसोटीचा काळ होता आणि अगदी तसाच काळ आजही आहे.

आधी स्वत: कृती करावी मग इतरेजनांकडुन अपेक्षा कराव्या. २६-११ च्या हल्लेखोरांवर कारवाई सुरु असतानाच... तत्कालिन गुजराथ राज्याच्या मु म च्या भाषणाची आठवण झाली. भाषणात ०:५० नंतर त्या काळातल्या प्रधानांबद्दल निराशा व्यक्त केली... हल्ला सुरुच होता त्याच वेळी प्रेस कॉन्फरन्स.
https://www.youtube.com/watch?v=92LD42AKgV

विरोधकांचा प्रतिसाद कसा नसावा याचे हे उत्तम उदाहरण. राजकारण आणायला नको असे प्रत्येकच बाजू म्हणत असते. ते कळत किंवा नकळत पणे आणले जाते. आज या बाजूने 'कशी फजिती झाली... ' तर उद्या कडक कारवाई केल्यावर त्या बाजूने 'आम्ही किती शुर, धाडसी आहोत - इतिहासात सर्वप्रथम'.

सर्व पक्षाची बैठक आता बोलावली आहे. सहकारी विरोधी पक्षांचे सहकार्य खुप महत्वाचे आहे. विरोधकांना डावलुन, कमी लेखुन तुम्हाला लोकशाहीचा शकट पुढे नेणे शक्य नसते.

निवडणुका येणार... आणि जाणार.... एक पक्ष जिंकेल, दुसरा हरेल. या सर्व गदारोळात पराभुत होतो आहे तो भारताचा सामान्य नागरिक आणि देशाला सर्वकाळात सुरक्षित ठेवणारे सैनिक. हल्ल्यांना सामोरे जाणारे सर्वात पहिले तेच असतात. कालही ते सर्वोच्च त्याग करत होते, लढत होते आणि आजही ते त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत.

हल्ल्याची चौकशी व्यायला हवी, हल्ला का झाला, उद्देश काय होता, आणि घटनेस जबाबदार असणार्‍यांवर कारवाई व्हावी एव्हढीच अपेक्षा. संरक्षण क्षेत्रातले तज्ञ आहेत आणि ते प्रतिसाद कधी, कसा द्यायचा हे सरकारला सांगतिलच. आपण या क्षणी सर्व मतभेद विसरुन सरकारच्या पाठिशी खंबिरपणे उभे रहायचे.

<< बाजपेयीं/ अडवाणी/डोवाल या टीमने ज्या >>
------ त्या वेळी डोवाल nsa नव्हते... ब्रजेश मिश्रा या पदावर होते. जसवंतसिंह हे परराष्ट्रमंत्री होते, तेच अतिरेक्यांच्या सोबत विमानात बसुन गेले होते.

थोडे (काही मिनीटेच) टायमिंग चुकले होते... अन्यथा चंदिगडलाच त्यांच्यावर कारवाई चा विचार होता. पुढे दुबईला का कुठे नेले तिथे (मोसाद स्टाईल) पण संधी होती...

कंदाहारला प्लॅन A , प्लॅन B होता पण तालिबानांच्या विमान विरोधी तोफा तयारच होत्या असे वाचले आहे.

डोवाल एन एस ए नव्हते , ते सरकारतर्फे अतिरेक्यांशी बोलणी करणारे अधिकारी होते.
Advani recorded that “the CCS decided to send a team of three officials—Ajit Doval, a senior officer in the IB known for handling tough operations, Vivek Katju, a Joint Secretary in the Ministry of External Affairs, and CD Sahay from the RAW—to Kandahar to negotiate with the hijackers as well as the Taliban authorities.”

https://www.thecitizen.in/index.php/en/newsdetail/index/2/4275/the-real-...

52188095_10156927530525502_4392572979012173824_n.jpg

52387528_10156658409871187_1716788961826832384_n.jpg

केंद्रीय सशस्त्र पुलीस दलाला सैनिकांइतक्या सोयीसुविधा अथवा संरक्षण अथवा महत्त्व नसते. पण स्थानिक अशांत परिस्थितीत पहिले लक्ष्य होतात ती हीच दले. अंतर्गत मोठ्या सामूहिक हलवाहलवीत/जमवाजमवीत/वाहातुकीत एअर-लिफ्टिंगची सुविधा ह्यांच्यासाठी अत्यंत जरूरीची आहे.

@ संदीप डांगे

पुरावे असतीलच त्या २० लाखाच्या ट्रक सारखे !

एअर-लिफ्टिंगची सुविधा ह्यांच्यासाठी अत्यंत जरूरीची आहे.>>>>>>>>

It turns out the CRPF had indeed requested air transit for the jawans to the Ministry of Home Affairs (MHA) earlier this week. However, the request was ignored.
https://www.thequint.com/news/india/pulwama-terror-attack-crpf-request-a...

एअर-लिफ्टिंगची सुविधा ह्यांच्यासाठी अत्यंत जरूरीची आहे >> त्यापेक्षा पुतळा महत्वाचा आहे

कॉंग्रेसने मण्या अय्यर तर्फे "इनको हटाव, हमे लाव" अशी मदत पाकिस्तानकडे मागितली होती.
हा हल्ला त्या मदतीचाच एक भाग असावा असे वाटते

हा हल्ला त्या मदतीचाच एक भाग असावा असे वाटते

बाजपेयीं अन अडवणीने कँदाहार प्रकरणात अतिरेक्यांना जी मदत केली , हे त्याचे फळ आहे.

पाकिस्तान मध्ये जेव्हा अतिरेक्यांनी शाळेत स्फोट घडवून गोळीबार केला होता तेव्हा भारतीय जनतेनी (उजव्या डाव्या ,) निषेध नोंदवला होता .
तसा पाकिस्तान मधून कधीच निषेध नोंदवला जात नाही हे पण सत्य आहे

मला अजुन ऐक शंका आहे पाकिस्तान ची जनता चूक कोणाची आहे ह्याची चर्चा न करता देशाच्या पाठीमागे उभी राहते की आपल्या सारखच मुष्रफ पासून इम्रान खान पर्यंत सर्व नेत्यांची उनिधूनी काढते .
ऐक शंका

नाही पाकिस्तान मॉडेल स्टेट नाही पण भारताचा दुश्मन देश आहे ते नेत्यांच्या सर्व चुका माफ करून वर्तमान सरकारला पाठिंबा देतात tas आपल्या देशात का घडत नाही ही हूरहूर वाटते

अहो , त्याला लोकशाही असे म्हणतात,
हा कन्सेप्ट नवीन आहे का तुम्हाला?
जनतेने विरोध केला म्हणून सरकारने निर्णय बदलणे हा भाग अपमानकारक वाटतो का तुम्हाला?
की जनता विचार करते, आणि सरसकट पाठिंबा न देता मुद्दे बेस्ड पाठिंबा देते याची भीती वाटते?

लोकशाही म्हणजे देश हिताला तिलांजली आस नाही .
देशातील प्रश्न विषयी नक्की मतभेद असावेत आणि सर्वांच्या मताचा आदर करावाच पण जेव्हा देशाच्या संरक्षणाचा प्रश्न असतो तेव्हा ऐकमतच आसाल पाहिजे

आणि जर कोणता पक्ष ह्या हल्याचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी करतोय मग तो काँग्रेस,bjp,bsp, शिवसेना,trunumal काँग्रेस,communist ,sarv भारतीय आहेत कोण्ही परका नाही पण जर फायदा घेत आसेल तर निवडणूक जाहीर झाल्यावर नक्कीच वैचारिक विरोध करावा पण आता नाही ही ती वेळ नव्हे

देशातील प्रश्न विषयी नक्की मतभेद असावेत आणि सर्वांच्या मताचा आदर करावाच पण जेव्हा देशाच्या संरक्षणाचा प्रश्न असतो तेव्हा ऐकमतच आसाल पाहिजे

___ हायला.. ही अक्कल २०१४ नंतरच आलेली दिसते आहे. यापूर्वी असे कहि नव्हते . का नव्हते? कारण तेव्हा आपले आवडते लोक सत्त्तेत नव्हते. आता अशा आरोपांनी सत्ता जायला लागली तर नको, सत्त्तासुंदरी हवीच आहे. तीला ताब्यातुन निसटतांना बघून लगेच हे शहाणपण सुचायला लागले होय?

Pages