एक नदीचे दोन किनारे...

Submitted by Kirti d tekale on 13 February, 2019 - 07:07

भेटू शकले कुठे बिचारे
एक नदीचे दोन किनारे ..

समर्पण काय असते हे ही
नदीकडूनच जरा शिका रे ..

सोडले जरी पाणी त्यावर,
झाले न तरी शांत निखारे ..?

रुजता त्याची आत आठवण,
तिला फुटतात नवे धुमारे ...

किती करतात मला बेचैन,
ते डोळ्यांचे तुझे इशारे ...

सौ. किर्ती टेकाळे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults