साहित्य:
चकोल्यांसाठी
१) १/२ ते ३/४ कप गव्हाचे पिठ
२) १/२ टिस्पून मिठ
३) १ टिस्पून तेल
आमटीसाठी:
१) तुरीचे दाणे (तुरीच्या शेंगा मधले दाणे )
२) तुरीची डाळ २ ते ३ चमचे (पोहे खायची चमची)
3) १० ते १२ हिरव्या मिरच्या + अर्धा बोटभर आले ,१० ते १५ लसूण पाकळ्या ,ह्यांची मिक्सर मधून पेस्ट करून घ्या
पेस्ट जास्त बारीक नको
4) २ मध्यम आकाराचे टमाटे
कृती:
1) गव्हाचे पिठ, मिठ आणि १ टिस्पून तेल घालून पोळीसाठी मळतो तशी कणिक मळून घ्यावी.
2) सर्वप्रथम कुकर मधेय तेल घेऊन तेल तापल्यावर त्यात टोमॅटो घालून परतवा , टोमॅटो शिजल्यानंतर त्यात
हिरवी मिरची आले लसूण यांची पेस्ट घालून परतवा
3) नंतर त्यात तुरीचे दाणे, तुरीची डाळ घाला अंदाजे २ मिनटे परतवा नंतर त्यात पाणी (अंदाजे १ ग्लास ) व
मीठ घालून कुकर मधेय शिजवून घ्या।( अंदाजे ३ ते ४ शिट्ट्या)
4) शिजवून झालयावर परत १ ते २ ग्लास पाणी टाकून उकळी आणावी
5) उकळी येत असताना कणकेची पोळी लाटावी. कातणाने किंवा सुरीने मध्यम आकाराचे शंकरपाळे करून
उकळत्या आमटीत घालावे. १० मिनीटे उकळी काढून चकोल्या शिजू द्याव्यात.
6) चकोल्या ताटात वाढून त्यावर साजूक तूप घालून गरमागरम सर्व्ह करावे.
टीप:
१) चकोल्यांची कणिक मळताना थोडा ओवा, लाल तिखट, दही हळद घातली तरी चांगली चव येते.
(No subject)
(No subject)
अत्यंत आवडता प्रकार.
अत्यंत आवडता प्रकार.
तुरीचे दाणे टाकतात हे प्रथमच ऐकले.
चिंच गुळ हवीच.
तुरिचे दाणे घातलेले पहिलेच
तुरिचे दाणे घातलेले पहिलेच पाहिले , आम्च्याकडे आइकडे घालतात चिन्च , टोमेटो, आमसुल पैकी एक काहितरी सासरी भरपुर लसुण, तिखत मसाला आणि कोथिबिर मस्ट
यावर साजुक तुप मस्त लागत.
फोटो छान आलेत.
धन्यवाद प्राजक्ता आणि शाली
धन्यवाद प्राजक्ता आणि शाली एकदा या पद्धतीने हि करून बघा टेस्ट नक्कीच आवडेल
आमटीत चिंच गुळ घाला
आमटीत चिंच गुळ घाला
भारी दिसतंय!
भारी दिसतंय!
घरी रेसिपी देतो, नक्की आवडेल!
शुभ प्रभात .........धन्यवाद
शुभ प्रभात .........धन्यवाद अज्ञातवासी
अज्ञातवासी आम्ही घरी पाकृ
अज्ञातवासी आम्ही घरी पाकृ द्यायच्या भानगडीत न पडता रात्री स्वहस्ते करुन खाल्ले आणि खिलवले. पण आवडता पदार्थ असल्याने ऐन वेळी वरील पाकृ टाळून नेहमीच्या पध्दतीनेच केल्या चकोल्या.
भारीच दिसताय चकोल्या शाली
भारीच दिसताय चकोल्या शाली
अज्ञातवासी आम्ही घरी पाकृ
अज्ञातवासी आम्ही घरी पाकृ द्यायच्या भानगडीत न पडता रात्री स्वहस्ते करुन खाल्ले आणि खिलवले. पण आवडता पदार्थ असल्याने ऐन वेळी वरील पाकृ टाळून नेहमीच्या पध्दतीनेच केल्या चकोल्या.
>>>>
सुंदर झाल्या आहेत... तोंपासू
पण वरची पाकृ वेगळी आणि अजून टेस्टी दिसतेय, सो तज्ञांकडे सोपवीली आहे
'पोटोबा' मध्ये हे खाल्लं होतं
'पोटोबा' मध्ये हे खाल्लं होतं, पण ठीक ठीकच वाटलं. घरी जरा जास्त लाडकौतुकाने बनवलं तर छान होईल. मी मायनस तुरीचे दाणे ( कारण ते सहजी मिळत नाहीत) आणि प्लस चिंच गूळ घालून (कारण वर बऱ्याच जणांनी रेकमेंड केलं आहे) बनवेन. घरात सगळ्यांनी जोरदार रिजेक्ट केल्यामुळे निम्मी qty घेऊन, माझ्या एकटीसाठी बनवेन. चांगला वन डिश मिल ऑप्शन आहे.
वेगळा प्रकार.
वेगळा प्रकार.
आम्ही शालीने केलेय तसे करतो. जाम आवडते मला.
खूप जबरदस्त पॉवर पॅक वन डिश
खूप जबरदस्त पॉवर पॅक वन डिश मिल आहे हे.बाहेर पाऊस/थंडी, आत मस्त गरम वाफाळत्या चकोल्या वर घरचं तूप घालून.स्वर्ग अजून वेगळा काय?
तुरीचे दाणे मिळणार नाहीत.नेहमीच्या रेसिपीने परवा केली होती.तुरीचे दाणे मिळवून एकदा करुन पाहीन.
मस्त मस्त.
मस्त मस्त.
शाली तुमचा फोटोही मस्त.
मी कोकम आणि गुळ घालते आमटीत.
मस्त.
मस्त.
मायबोलीवरच मसाला नावाची स्पर्धा होती मागे एकदा तेव्हा एक पाकृ आली होती. मी तेव्हापासून त्या पाकृ प्रमाणेच करते.
धिस इज इंडियन पास्ता
धिस इज इंडियन पास्ता
मायबोलीवरच मसाला नावाची
मायबोलीवरच मसाला नावाची स्पर्धा होती मागे एकदा तेव्हा एक पाकृ आली होती. मी तेव्हापासून त्या पाकृ प्रमाणेच करते. >>
https://www.maayboli.com/node/33983 हिच का
येस स्मिता!
येस स्मिता!
आमटीत चिंच गुळ घालतो आम्ही.
आमटीत चिंच गुळ घालतो आम्ही.
एक मजेदार पदार्थ आहे पण मागे पडला आहे. समारंभाच्या बुफेत ठेवायला हवा.