वरण फळ/ वरण चकोल्या/ डाळ ढोकळी (गुजराती शब्द)

Submitted by स्स्प on 12 February, 2019 - 00:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य:
चकोल्यांसाठी
१) १/२ ते ३/४ कप गव्हाचे पिठ
२) १/२ टिस्पून मिठ
३) १ टिस्पून तेल
आमटीसाठी:
१) तुरीचे दाणे (तुरीच्या शेंगा मधले दाणे )
२) तुरीची डाळ २ ते ३ चमचे (पोहे खायची चमची)
3) १० ते १२ हिरव्या मिरच्या + अर्धा बोटभर आले ,१० ते १५ लसूण पाकळ्या ,ह्यांची मिक्सर मधून पेस्ट करून घ्या
पेस्ट जास्त बारीक नको
4) २ मध्यम आकाराचे टमाटे

क्रमवार पाककृती: 

कृती:
1) गव्हाचे पिठ, मिठ आणि १ टिस्पून तेल घालून पोळीसाठी मळतो तशी कणिक मळून घ्यावी.
2) सर्वप्रथम कुकर मधेय तेल घेऊन तेल तापल्यावर त्यात टोमॅटो घालून परतवा , टोमॅटो शिजल्यानंतर त्यात
हिरवी मिरची आले लसूण यांची पेस्ट घालून परतवा
3) नंतर त्यात तुरीचे दाणे, तुरीची डाळ घाला अंदाजे २ मिनटे परतवा नंतर त्यात पाणी (अंदाजे १ ग्लास ) व
मीठ घालून कुकर मधेय शिजवून घ्या।( अंदाजे ३ ते ४ शिट्ट्या)
4) शिजवून झालयावर परत १ ते २ ग्लास पाणी टाकून उकळी आणावी
5) उकळी येत असताना कणकेची पोळी लाटावी. कातणाने किंवा सुरीने मध्यम आकाराचे शंकरपाळे करून
उकळत्या आमटीत घालावे. १० मिनीटे उकळी काढून चकोल्या शिजू द्याव्यात.
6) चकोल्या ताटात वाढून त्यावर साजूक तूप घालून गरमागरम सर्व्ह करावे.
टीप:
१) चकोल्यांची कणिक मळताना थोडा ओवा, लाल तिखट, दही हळद घातली तरी चांगली चव येते.

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३
माहितीचा स्रोत: 
आई ची रेसिपी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुरिचे दाणे घातलेले पहिलेच पाहिले , आम्च्याकडे आइकडे घालतात चिन्च , टोमेटो, आमसुल पैकी एक काहितरी सासरी भरपुर लसुण, तिखत मसाला आणि कोथिबिर मस्ट
यावर साजुक तुप मस्त लागत.
फोटो छान आलेत.

भारी दिसतंय!

घरी रेसिपी देतो, नक्की आवडेल!

अज्ञातवासी आम्ही घरी पाकृ द्यायच्या भानगडीत न पडता रात्री स्वहस्ते करुन खाल्ले आणि खिलवले. पण आवडता पदार्थ असल्याने ऐन वेळी वरील पाकृ टाळून नेहमीच्या पध्दतीनेच केल्या चकोल्या. Wink

91DCD8DA-2AD4-44DF-BB82-9CB21F73404E.jpeg

अज्ञातवासी आम्ही घरी पाकृ द्यायच्या भानगडीत न पडता रात्री स्वहस्ते करुन खाल्ले आणि खिलवले. पण आवडता पदार्थ असल्याने ऐन वेळी वरील पाकृ टाळून नेहमीच्या पध्दतीनेच केल्या चकोल्या.
>>>>
सुंदर झाल्या आहेत... तोंपासू
पण वरची पाकृ वेगळी आणि अजून टेस्टी दिसतेय, सो तज्ञांकडे सोपवीली आहे Wink

'पोटोबा' मध्ये हे खाल्लं होतं, पण ठीक ठीकच वाटलं. घरी जरा जास्त लाडकौतुकाने बनवलं तर छान होईल. मी मायनस तुरीचे दाणे ( कारण ते सहजी मिळत नाहीत) आणि प्लस चिंच गूळ घालून (कारण वर बऱ्याच जणांनी रेकमेंड केलं आहे) बनवेन. घरात सगळ्यांनी जोरदार रिजेक्ट केल्यामुळे निम्मी qty घेऊन, माझ्या एकटीसाठी बनवेन. चांगला वन डिश मिल ऑप्शन आहे.

वेगळा प्रकार.
आम्ही शालीने केलेय तसे करतो. जाम आवडते मला.

खूप जबरदस्त पॉवर पॅक वन डिश मिल आहे हे.बाहेर पाऊस/थंडी, आत मस्त गरम वाफाळत्या चकोल्या वर घरचं तूप घालून.स्वर्ग अजून वेगळा काय?
तुरीचे दाणे मिळणार नाहीत.नेहमीच्या रेसिपीने परवा केली होती.तुरीचे दाणे मिळवून एकदा करुन पाहीन.

मस्त मस्त.

शाली तुमचा फोटोही मस्त.

मी कोकम आणि गुळ घालते आमटीत.

मस्त.
मायबोलीवरच मसाला नावाची स्पर्धा होती मागे एकदा तेव्हा एक पाकृ आली होती. मी तेव्हापासून त्या पाकृ प्रमाणेच करते.

मायबोलीवरच मसाला नावाची स्पर्धा होती मागे एकदा तेव्हा एक पाकृ आली होती. मी तेव्हापासून त्या पाकृ प्रमाणेच करते. >>
https://www.maayboli.com/node/33983 Happy Happy हिच का Happy