नमस्कार मंडळी..
आपल्याला माहितीच आहे की यंदाही २७ फेब्रुवारीपासून आपण मराठी भाषा दिवस मायबोलीवर साजरा करणार आहोत. पुढच्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागण्यात थोडा हातभार लागावा म्हणून मायबोलीकरांच्या मुलांसाठी मजेचे उपक्रम आपण नेहमीच आयोजित करत असतो. ह्याच हेतूने आपण यावर्षी गोजिरे बोल हा उपक्रम घेणार आहोत. त्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे उत्साहाने सहभागी व्हाल याची आम्हाला खात्री आहे!
आपल्या घरातील चिमुकल्यांची चिवचिव हा आपल्यासाठी मोठ्याच आनंदाचा ठेवा असतो, पण आपल्याबरोबरच सगळ्या मायबोलीकरांना ह्या चिवचिवाटाचा आनंद घेता आला तर किती छान होईल बरं!
त्यासाठी तुम्ही फक्त इतकंच करायचं, खाली नमूद केलेल्या बालसाहित्यापैकी कुठलीही कविता आपल्या चिमुरड्यांच्या आवाजात रेकॉर्ड करायची आणि ते रेकॉर्डिंग आमच्याकडे पाठवायचं. हे रेकॉर्डिंग दृक्श्राव्य (व्हिडिओ) असेल तर छानच, पण तसं शक्य नसेल तर नुसतंच श्राव्य ( ऑडिओ) असेल तरीही चालेल.
या उपक्रमात सामील होण्यासाठी कृपया खालील गोष्टींची नोंद घ्यावी –
१) मायबोलीकरांच्या १० वर्षे वयापर्यंतच्या मुलांकरिता हा उपक्रम असेल.
२) एका पाल्यासाठी तीन प्रवेशिका पाठवता येतील. रेकॉर्डिंग शक्यतो ८ ते १० मिनिटांच्या आतले असावे.
३) रेकॉर्डिंग ची फाईल mp3, mp4 स्वरुपात २५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत, mabhadi2019@maayboli.com या मेल id वर पाठवावी.
४) खालील मायबोलीकर कवींच्या बालकविता/बालगीते दृक् किंवा श्राव्य माध्यमातून सादर करता येतील; तशी परवानगी त्यांनी या उपक्रमासाठी आनंदाने संयोजक मंडळाला दिलेली आहे.
शिवाजी उमाजी यांच्या बालकविता
खेळ विजेशी
https://www.maayboli.com/node/68311
ताटातलं भांडण
https://www.maayboli.com/node/68332
पावसाची गम्मत
https://www.maayboli.com/node/63881
चोरीला शिक्षा
https://www.maayboli.com/node/63067
येरे येरे पावसा
https://www.maayboli.com/node/68353
दत्तात्रय साळुंके यांच्या बालकविता
बडबडगीत
https://www.maayboli.com/node/64158
मनीमाऊ
https://www.maayboli.com/node/68908
श्री. शशांक पुरंदरे यांच्या अनेक बालकविता मायबोलीवरील बालसाहित्य विभागात आहेत. त्यांपैकी कोणतीही निवडता येईल. त्याची लिंक
https://www.maayboli.com/user/31466/created
चला तर, लागा आपल्या घरातल्या छोट्या मंडळींबरोबर तयारीला!
विशेष महत्त्वाची सूचना: वर नमूद केलेल्या लेखकांनी बालसाहित्य विभागातले त्यांचे लेखन मायबोलीच्या मराठी भाषा दिवस २०१९ च्या गोजिरे बोल या उपक्रमापुरते वापरायला परवानगी दिली आहे.
छान
छान
कविता देण्याची तयारी दाखवलेल्या कवींचे कौतुक __/\__
फक्त वरच्या पैकीच कविता का?
फक्त वरच्या पैकीच कविता का?
इतर अनेक बालकवितांपैकी निवडता येऊ शकेल का?
आमच्याकडे अनेक बालकवितांचा खजिना आहे...
नानबा,
नानबा,
प्रताधिकाराचा प्रश्न आहे म्हणून या तीन कवींकडून या उपक्रमापुरती आम्ही परवानगी घेतलेली आहे. जर कुणाला मायबोलीवरच्या इतर कुठल्या बालकविता सादर करायच्या असतील, तर त्या कवीने मायबोली संपर्क सुविधा वापरून , आपण त्या आयडीला अशी परवानगी देत असल्याची इमेल वेमांना करायला हवी. त्यानंतर ती कविता सादर करता येईल.
ओह ओके. मग हे बरोबर आहे.
ओह ओके. मग हे बरोबर आहे. मी मायबोलीबाहेरच्या लेकीच्या आवडत्या कवितांचा विचार करत होते,
मी स्वतः टाकलेली कविता असेल तर हा प्रश्न येणार नाही, राईट?
नानबा,
नानबा,
तुमची स्वतःची कविता असेल तर नक्कीच तुम्ही ती घेऊ शकता.
छान उपक्रम.
छान उपक्रम.
उपक्रमाला शुभेच्छा!
उपक्रमाला शुभेच्छा!