Submitted by द्वैत on 29 January, 2019 - 00:54
खंत ना मागे उरावी कर असे काहीतरी
एक नवी सुरुवात व्हावी कर असे काहीतरी
हो तुझ्या लेखी तुझे कर्तृत्व आहे दांडगे
ह्या जगाने नोंद घ्यावी कर असे काहीतरी
काम असलेकीच येते आठवण आता तुझी
काळजातून याद यावी कर असे काहीतरी
जे तुझे आहेत त्यांची वाहवा मिळतेच रे
दुश्मनांनी दाद द्यावी कर असे काहीतरी
जर तुला जमलेच नाही विसरुनी जाणे तिला
ती तुला विसरून जावी कर असे काहीतरी
"द्वैत" तू शास्त्राप्रमाणे घर तुझे बांधू नको
पाखरे दारी बसावी कर असे काहीतरी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! एकदम मस्तच!!
वाह! एकदम मस्तच!!
सुरेख!
जे तुझे आहेत त्यांची वाहवा मिळतेच रे
दुश्मनांनी दाद द्यावी कर असे काहीतरी