Submitted by जोतिराम on 24 January, 2019 - 19:48
आहे अजूनही मी
पाहित वाट राधे
डोळ्यात बोचते मज
माझेच रूप आधे
बोल मज "हे मुरारी
राधा तुझीच सारी"
भेटावयास ये मज
तोडू नकोस वादे
डोळ्यात बोचते मज
माझेच रूप आधे
मी शाम-रंग माझा
तू पुष्पगुच्छ साजा
बिलगून गंध दे मज
इतकेच शब्द साधे
डोळ्यात बोचते मज
माझेच रूप आधे
वाटे तुला ना काही
श्रीकृष्ण वाट पाही
गोपी असूच दे मग
रुसवा कशास मागे
डोळ्यात बोचुदे मज
माझेच रूप आधे
©-जोतिराम
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर शब्द गुंफण...!!!
सुंदर शब्द गुंफण...!!!
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
जोतीराम खूपच छान
जोतीराम खूपच छान
खुप सुंदर
खुप सुंदर
विनोद.,गौराक्का, अननस आणि mr
विनोद.,गौराक्का, अननस आणि mr.pandit तुम्हा सर्वांचे आभार.