मायबोलीवर किती धागे काढता येतात ?

Submitted by पाटलीण बोवा on 19 January, 2019 - 06:18

मायबोलिवर एका वेळि किती धागे काढता येतात हे कुणाला माहित आहे का ?
असल्यास कृपया नियमाची लिंक द्यावी.
नसल्यास कितीही धागे काढले तर चालतील असा अर्थ आहे का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

या विषयावर मायबोली प्रशानाने धोरण ठरवणे आवश्यक वाटते कारण हा विषय पूर्वी, त्याही पूर्वी आणि त्याच्याही आधीच्या पूर्वी असा वारंवार चर्चेत आला आहे.

म्हणजे मी निरागसतेने विचारलेला प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे असे दिसते. तरी पण नियम नाही म्हणजेच कुणीही कितीही धागे काढू शकते असेच ना ? निरुद्देश असं काहीही नसतं. तसं म्हटलं तर ऋन्मेषजींचे धागे सोडले तर मग सगळं निरुद्देश होईल कारण ऋसरांच्या च्या धाग्यांना उद्देश आहे. विरंगुळा.
इतरांचे मला नवीन असल्या कारणाने माहीत नाही. पण द्वेष हा उद्देश असावा असे वाटते.

एकाच वेळी भरमसाठ कविता कि गझलचे धागे काढल्याने एक आयडी उडाला होता. काय नाव होतं आठवत नाही.

मला वाटतं राकुंचा आयडीपण याच कारणाने उडालाय ना?

एकाच वेळी भरमसाठ कविता कि गझलचे धागे काढल्याने एक आयडी उडाला होता. काय नाव होतं आठवत नाही. >>> 'तडका'कार vishal mhaske का!?

नाही हे नाव मला माहित नाही. दुसराच कोणीतरी आयडी होता. एकाच संध्याकाळ-रात्रीत १०० कि १५० धागे काढले होते...

जाऊ द्या हो.. तुम्ही मात्र भरपूर धागे काढा..
जबरदस्त टाईमपास होतो राव
मी तर शोधून वाचतोय.. पाटलांचे धागे