Submitted by निशिकांत on 18 January, 2019 - 23:15
असंख्य धागे विणून झाले
वस्त्राला रंगवून झाले
उरलो मी उपकारापुरता
माझे जगणे जगून झाले
झोप कशाला घ्यावी आता?
स्वप्न हवे ते बघून झाले
राम न वाटे जीवनातही
उठता बसता हरून झाले
तुला शोधण्या धुक्यात जाता
दवात थोडे भिजून झाले
भिकार जीवन जगता जगता
शंभर वेळा मरून झाले
विरहाच्या प्याल्यास रिचवता
नशेमधे लडखडून झाले
करताना मुल्यांकन माझे
शुन्यासंगे गुणून झाले
समजत होतो अपुले त्यांना
अस्तिनीमधे बघून झाले
"निशिकांता"च्या तृप्त जीवनी
करायचे ते करून झाले
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त !
मस्त !
वा वा!!
वा वा!!
सुंदर!!
क्रांतीच्या एका गजलचे विडंबन करत असताना रचलेल्या दोन ओळी आठवल्या:
"करायचे ते करून झाले, भरून झाले,
उंडारुन जाहले, गावभर फिरून झाले!!
वा!! सुंदर!!
वा!!
सुंदर!!