साहित्य संमेलनाची चर्चा

Submitted by संदीप डांगे on 13 January, 2019 - 10:09

सध्या साहित्य संमेलनाची बरीच चर्चा ऐकायला, वाचायला मिळते. तशी ती प्रत्येक साहित्य संमेलनाबद्दल येत असते. असल्या टुकार बिनकामाच्या साहित्य संमेलनापेक्षा मराठी लोकांसाठी उद्योगव्यापार संमेलनं भरवणे व त्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. त्याच्या बातम्या व्हाव्यात, यशस्वी मराठी उद्योजकांची भाषणे प्रसिद्ध व्हावीत, मुलाखती गाजाव्या, नवीन शोध, नवीन व्यवसाय यांच्याबद्दल वाचायला, ऐकायला पाहायला मिळावे, मराठी जनतेला आर्थिक शिक्षण मिळावे आणि त्यायोगे आर्थिक उत्कर्ष साधण्यास प्राधान्य द्यावे.

हि साहित्य संमेलनं नॉन इशू आहेत. वांझोट्या चर्चा, भाषणे आणि वाद याशिवाय ह्यात काहीच नसतं, तरी अशी गाजवली जातात जणू जनसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार असतो. कला-वाचन-विनोद हे 'पोट भरल्यावर' फावल्या वेळात करायचे उद्योग आहेत, जीवन मरणाचे प्रश्न नाहीत. मराठी तरुणांनी अशा कालापव्यय करणाऱ्या तमाशापासून शंभर योजने दूर राहावे.

तुमचे काय मत आहे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

' हे' (उद्योजकांची भाषणे वगैरे) किंवा 'ते' (साहित्य संमेलन) ही द्वंद्वात्मक विचारसरणी मला अयोग्य वाटते.
अशाने काही करायची सोयच राहणार नाही. कारण 'अ' करायला गेलं तर 'ब' का नको आणि 'ब' करायला गेलो तर 'क' का नको असल्या चर्चा होतील. फक्त चर्चाच होतील.
बहुआयामी समाजातल्या लोकांच्या गरजा (हौस, चैन ...) वेगवेगळ्या असतात.
' हे' (उद्योजकांची भाषणे वगैरे) किंवा 'ते' (साहित्य संमेलन) - दोन्ही होऊ द्यावे की, काय आक्षेप आहे त्याला?
जोवर समाजविघातक काही नाही, तोवर ज्या गटाला जे करावेसे वाटते ते करू द्यावे.
समाजविघातक काय वगैरे ठरवण्यासाठी आपल्या देशात घटना आणि कायदे आहेत. ते अपुरे वाटल्यास त्यावर काम करता येईल.

ऐकेकाळी स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरेंनी, साहित्यकांना 'बैल' व साहित्य संमेलनाला 'बैल बाझार' म्हणून त्यांची संभावना का केली होती हे आज त्यांचे आपआपल्यातील वाद बघून कळत आहे.